Type Here to Get Search Results !

झाशीची राणी लक्ष्मीबाई भाषण निबंध मराठी माहिती | jhashichi rani Lakshmibai marathi mahiti

 झाशीची राणी लक्ष्मीबाई भाषण निबंध मराठी माहिती | jhashichi rani Lakshmibai marathi mahiti | jhashichi rani lakshmibai nibandh bhashan marathi

झाशीची राणी लक्ष्मीबाई भाषण निबंध मराठी माहिती


राणी लक्ष्मीबाई स्मृतीदिन २०२२: नमस्कार मित्रांनो आज आपण झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या स्मृतिदिनानिमित्त भाषण, निबंध मराठी माहिती बघणार आहोत. ही माहिती तुम्ही शेवटपर्यंत वाचावी ही नम्र विनंती.

झाशीची राणी लक्ष्मीबाई स्मृतीदिन निबंध मराठी माहिती | jhashichi rani lakshmibai nibandh marathi mahiti


बुंदेल हरबोलों के मुँह हमने सुनी कहानी थी
खूब लढी मर्दानी वह तो झांशीवाली राणी थी।

राणी लक्ष्मीबाई यांचा जन्म १९ नोव्हेंबर १८२८ ला उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे झाला. बालपणी त्यांना प्रेमाने मनु म्हटले जाई. त्यांचे वडील मोरोपंत तांबे बिठूर न्यायालयात पेशवा होते. लक्ष्मीबाईंचे वडील आधुनिक विचारसरणीचे होते. लक्ष्मीबाई अवघ्या ४ वर्षाच्या असताना त्यांच्या आई भागीरथीबाई यांचे निधन झालं त्यामुळे त्यांचा सांभाळ मोरोपंतांनी केला.

शिक्षणासोबत यांनी आत्मरक्षा, घोडेस्वारी, धनुर्विद्या यांच प्रशिक्षण घेतलं आणि त्यामुळे त्या शास्त्रविद्येत प्रवीण झाल्या. राणी लक्ष्मीबाई रोज न चुकता योगा अभ्यास करत असत. त्यांच्या रोजच्या दिनचर्येचा हा एक भाग होता. आपल्या प्रजे प्रति त्यांना फार प्रेम आणि वास्तव्य होतं. त्या प्रजेची फार काळजी घेत असत. गुन्हेगारांना योग्य शिक्षा देण्याची त्यांच्यात हिंमत होती. लक्ष्मीबाईंना घोड्याची चांगली पारख होती. मोठे राजे देखील त्यांच्या कार्याचं कौतुक करत असत.

वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी त्यांचा विवाह उत्तर भारतातील झाशीसे महाराज गंगाधरराव नेवाळकर यांच्याशी झाला आणि काशीची मनु झाशीची राणी लक्ष्मीबाई झाली. १८५१ साली यांना पुत्ररत्न झाला परंतु चार महिन्याचा असताना या बाळाचा मृत्यू झाला त्यामुळे त्यांनी एक पुत्र दत्तक घेतला. त्याचे नाव गंगाधराव ठेवण्यात आले. २१ नोव्हेंबर १८५३ साली महाराज गंगाधरराव नेवाळकर यांचे निधन झाले आणि दत्तक पुत्र लहान असल्याने राज्य कारभाराची सूत्रं राणी लक्ष्मीबाई यांनी आपल्या हाती घेतली.

झाशी ताब्यात घेण्याचा चंग बांधलेल्या ब्रिटिशांनी ७ मार्च १८५४ ला सरकारी आदेश काढला ज्यात झाशी राज्याला ब्रिटिश साम्राज्यात समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. राणी लक्ष्मीबाईने या आदेशाचे उल्लंघन करत "मे अपनी झांशी नही दूँगी" असे ब्रिटिशांना कळवले आणि त्यांच्या विरोधात संघर्ष अधिक तीव्र केला. १७ जून १८५८ मध्ये राणी लक्ष्मीबाईंनी किंग्स रॉयल आयरिश विरोधात युद्ध पुकारले आणि पूर्व क्षेत्रातील ग्वालियरचे नेतृत्व केले या युद्धात त्यांच्या महिला सैनिकांनी देखील त्यांना चांगली साथ दिली.

या युद्धात राणी जबर जखमी झाली. राणी लक्ष्मीबाईचे सैनिक त्यांना गंगादास मठात घेऊन गेले आणि त्यांना गंगाजल पाजलं. "कोणताही इंग्रज माझ्या देहाला स्पर्श करणार नाही" ही आपली अखेरची इच्छा त्यांनी व्यक्त केली. अशा तऱ्हेने १७ जून १८५८ला कोठा येथील सराई नजीक ग्वालियर मधल्या फुलबाग येथे राणी लक्ष्मीबाईंना वीरगती प्राप्त झाली.

आपल्या पवित्र अशा भारतभूमीत बरेच शूर पराक्रमी जन्माला आले या शूरवीरांन मध्ये एक अशीच राणी होऊन गेली जिने आपल्या साम्राज्याला इंग्रजांच्या हाती जाण्यापासून वाचवण्याकरता त्यांच्याशी कडवी झुंज दिली. झाशीला वाचण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली. मिळालेल्या अल्पायुष्यात ब्रिटिश साम्राज्याशी लढा देत राणीनेही रणसंग्राम पुकारला होता.

                    लक्ष्मी थी या दुर्गा थी, 
                 वो स्वयं वीरता की अवतार, 
                  देख मराठे पुलकित होते 
                   उसकी तलवारों के वार...

स्वातंत्र्यसंग्रामात आपल्या साहसाचा आणि पराक्रमाचा ज्या तऱ्हेने तिने परिचय दिला तो अत्यंत अभिमानास्पद असाच आहे. तिच्या शौर्याचे कौतुक शत्रूने देखील केली आहे. अशा या झुंजार राणीला मानाचा मुजरा.
हे सुध्दा वाचा⤵️


FAQ
Q.1) झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा जन्म कधी झाला ?
Ans. झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा जन्म १९ नोव्हेंबर १८२८ ला उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे झाला.

Q.2) झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या आई वडिलांचे नाव काय होते ?
Ans. झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या आईचे नाव भागिरथीबाई तर वडिलांचे नाव मोरोपंत तांबे हे होते.

Q.3) झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचें निधन कधी झाले ?
Ans. झाशीची राणी लक्ष्मीबाई १७ जून १८५८ ला कोठा येथील सराई नजीक ग्वालियर मधल्या फुलबाग येथे झाले.
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad