Type Here to Get Search Results !

राजर्षी शाहू महाराज भाषण मराठी माहिती | Rajarshi shahu Maharaj bhashan marathi

 राजर्षी शाहू महाराज भाषण मराठी माहिती | Rajarshi shahu Maharaj bhashan marathi | राजर्षी शाहू महाराज जयंती भाषण मराठी | Rajarshi shahu Maharaj jayanti bhashan marathi

राजर्षी शाहू महाराज जयंती २०२२ : नमस्कार मित्रांनो आज आपण २६ जुन या दिवशी साजरी होणारी जयंती म्हणजेच राजर्षी शाहू महाराज जयंती संपूर्ण भारतात मोठ्या आनंदाने साजरी केली जाते. राजर्षी शाहू महाराज जयंती निमित्त आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत अतिशय सुंदर भाषण,हे भाषण तुम्ही शेवटपर्यंत वाचावे ही नम्र विनंती.

♦️ प्रकारची माहिती बघण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा                               👇
                        Joint watsup group 



राजर्षी शाहू महाराज भाषण मराठी | Rajarshi shahu Maharaj bhashan marathi


आजच्या कार्यक्रमाचे सन्मानीय अध्यक्ष व्यासपीठावर उपस्थित मान्यवर आणि विद्यार्थी मित्रहो, आज 26 जून म्हणजेच राजर्षी शाहू महाराज यांची जयंती.

कोल्हापूर संस्थानात आरक्षण देणारा पहिला राजा... जे. पालक आपल्या मुलांना शाळेत घालणार नाहीत त्यांना १ रुपयाचा दंड ठोकणारा राजा.. अंधश्रद्धा कर्मकांड दैववाद यावर प्रहार करणारा राजा. डॉ. बाबासाहेब आबेडकर यांच्या घरी जाऊन सन्मान करणारा, राजा. बहुजन आणि सर्वसामान्य लोकांच्या मुलांना सक्तीचे आणि मोफत शिक्षण देणारा राजा. समाजातील सर्व घटकांना समान वागणूक मिळावी म्हणून शाळा,पाणवठे, दवाखाने सर्वाना खुला करून देणारा राजा.. जातीपातीच्या भिंतीमध्ये गाडलेल्या आणि गंजलेल्या महाराष्ट्रात आंतरजातीय विवाहास मान्यता देणारा राजा..... . सती जाणा ऱ्या स्त्रियांना सन्मानाचा मार्ग म्हणून विधवा पुनर्विवाहाचा कायदा करणारा राजा.. कलावंतांना राजाश्रय देणारा राजा.....बाळ तू शिकलानाहीस तरी चालेल पण तू टाकीत जा असा म्हणणारा राजा.. सहकारी संस्था निर्माण करणारा राजा... बहुजनांच्या मुलांसाठी वसतिगृह बांधणारा राजा.. सर्व क्षेत्रात वेगळा ठसा उमटवणारा राजा...रयतेचा पोटच्या पोराप्रमाणे सांभाळ करणारा राजा..... असा सर्वगुणसंपन राजा म्हणजेच छत्रपती राजर्षी शाहू महाराज.

राजर्षी शाहू महाराज या नावाची आख्या महाराष्ट्राला ओळख आहे. त्यामुळे त्यांची नव्याने ओळख करून देण्याची गरज नाही : पण खंत ही आहे की आजची तरुण पिढी त्यांना केवळ नावाने ओळखते. त्यांची कार्ये त्यांनी मांडलेले विचार याची त्यांना म्हणावी तितकी माहिती नाही. माहिती ती कशी असणार ? आजचा तरुण व्हाट्सअप्प फेसबूकवर फक्त महाराजांचा फोटो Dp म्हणून ठेवण्यात व्यस्त आहे एक दिवस स्टेटस ठेवले किंवा फेसबुक वर एखादी पोस्ट शेअर केली.की झाली जयंती असे मानणाऱ्या तरुणाला त्यांचे चरित्र वाचायला वेळ आहे तरी कोठे ? वाळीत टाकल्याप्रमाणे जगणाऱ्या दलित समाजाच्या त्या काळी खंबीरपणे पाठीशी उभ्या राहणाचा या लोकनायकाची जाती पातीच्या अंधान्या जगात पुन्हा अडकत जाणाऱ्या महाराष्ट्र देशाला आज पुन्हा नव्याने ओळख करून देण्याची गरज आहे.

राजर्षी शाहू महाराज हे चौथे शाहू महाराज होत.... राजर्षी शाहू महाराज हे चौथे शाहू महाराज होत. महाराजांचा जन्म 26 जून 1874 चा. कागलच्या घाटगे घराण्यातील अप्पासाहेब आणि राधाबाईर यांच्या पोटी यशवंत या नावाने महाराजांनी जन्म घेतला. तेंव्हा कोल्हापूरमध्ये राजे चौथे शिवाजी महाराज कारभार पाहत होते. पण दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर 17 मार्च 1884 रोजी चौथ्या शिवाजी महाराजांच्या पत्नी आनंदीबाई यांनी यशवंतांना दत्तक घेतले आणि नव्याने त्यांचे शाहू असे नामकरण केले. 2 एप्रिल 1894 रोजी त्यांचा राज्यारोहण समारंभ पार पडला आणि शाहू कोल्हापूर संस्थानचे राजर्षी शाहू महाराज झाले. शाहू महाराजांना राजर्षी ही उपाधी कानपूरच्या कुर्मी क्षत्रिय समाजाने दिली होती. ज्या दिवसापासून शाहू महाराजांनी पदभार स्वीकारला तेंव्हापासून 1922 सालापर्यंत तब्बल 28 वर्षे कारभार करत कोल्हापूर संस्थानात रयतेचे राज्य निर्माण केले. शाहू महाराजांच्या मनात सामान्य जनतेबद्दल अतिशय कळवळा होता. विशेष करून बहुजन समाजाची तत्कालीन स्थिती सुधारणे हे त्यांचे प्राथमिक ध्येय होते. त्या दिशेने पाऊल टाकीत त्यांनी सर्वप्रथम त्या समाजातील घटकांना साक्षर करण्याचे शिवधनुष्य उचलले. समाजात शिक्षणाचा मोठ्या स्तरावर प्रसार केला. संपूर्ण कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मुख्य म्हणजे मोफत केले. त्यासाठी म्हणून त्यांनी उज्जभ्रू वर्णाच्या आणि अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा चालवण्याची जी पद्धत होती ती बंद केली.

मागासलेल्या वर्गांना विकासाच्या प्रवाहात आणायचे असेल तर त्यांच्यासाठी राखीव तरतूद केली पाहिजे अशी कल्पना महात्मा फुले यांनी केली होती ती. प्रत्यक्षात, शाहू महाराजांनी सत्यात उतरवली. 6 जुलै 1902 रोजी कोल्हापूर संस्थानातील मागास जातींना 50% जागा. राखीव करण्याचा ऐतिहासिक निर्णय जाहीर केला. समाजातील सर्व घटकांना समानतेची वागणूक मिळावी. म्हणून त्यांनी शाळा, दवाखाने, पाणवठे, विहिरी, सार्वजनिक इमारती सर्वांसाठी खुल्या केल्या, डेक्कन रयत असोसिएशन ही देखील शाहू महाराजांचीच देणं होय. 1917 साली त्यांनी विधवा पुनर्विवाहाचा कायदा संमत करून घेतला.

वेदोक्त मंत्र म्हणण्याच्या अधिकारावरून झालेला वेदोक्त संघर्ष राजर्षी शाहूंच्याच काळात झाला हे महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनातील वादळाच होते. या प्रकरणामुळे सत्यशोधक चळवळ याला अजून प्रेरणा मिळाली. बहुजन अस्पृश्य समाजाच्या सर्वांगीण विकास साधण्याचे कार्य करताना त्यांनी एका अर्थाने महात्मा फुले यांचीच परंपरा पुढे चालवली. शाहू छत्रपती स्पिनिंग अँड विव्हिंग मिल शाहूपुरी व्यापरपेठ गुळाची बाजारपेठ शेतकऱ्यांसाठी सहकारी संस्था राधानगरी धरणाची उभारणी असे प्रयोग त्यांनी कोल्हापूर संस्थानात राबवले. राजर्षी शाहूंनी कोल्हापूर संस्थानात संगीत, चित्रपट,चित्रकला लोककला आणि कुस्ती या क्षेत्रातील कलावंतांना राजाश्रय देऊन त्यांना प्रोत्साहन देण्याचे कार्य केले. शाहू महाराजांनी कोल्हापूर आणि बेळगाव या भागातील स्वातंत्र्यवीरांना वेळोवेळी आर्थिक आणि इतर मदददेखील केली.

अशा या थोर राजाने 6 मे 1922 रोजी अखेरचा श्वास घेतला. त्या. दिवशी संपूर्ण समाज जणू पोरका झाला. पण त्यांचे विचार आणि कार्य मात्र नेहमीच समाजाला प्रेरणा देत राहिले आहेत. आणि यापुढे देत राहतील हे मात्र नक्की.



हे सुध्दा वाचा⤵️

FAQ
Q.1) राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म कधी झाला ?
Ans.राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म 26 जून 1874 साली झाला.

Q.2) राजर्षी शाहू महाराज यांच्या आई वडिलांचे नाव काय होते ?
Ans.राजर्षी शाहू महाराज यांच्या आईचे नाव राधाबाई व वडिलांचे नाव अप्पासाहेब हे होते.

Q.3) राजर्षी शाहू महाराज यांचा मृत्यू कधी झाला ?
Ans. राजर्षी शाहू महाराज यांचा मृत्यू 6 मे 1922 रोजी झाला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad