google-site-verification=mhQXPDL6t29v0SBU3tM2gsf6ieXw2vbDeuweOWGfOg0 स्वातंत्र्य दिन भाषण मराठी 2022 | Independence day speech in marathi
Type Here to Get Search Results !

स्वातंत्र्य दिन भाषण मराठी 2022 | Independence day speech in marathi

 स्वातंत्र्य दिन भाषण मराठी 2022 | 15 ऑगस्ट स्वातत्र्य दिन भाषण pdf | Independence day speech in marathi | swatantra din bhashan marathi 2022 | स्वातंत्र्य दिन भाषण मराठी pdf

स्वातंत्र्य दिन भाषण मराठी 2022 :- नमस्कार मित्रांनो आज आपण 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त अतिशय सुंदर भाषण बघणार आहोत. 15 ऑगस्ट  स्वातंत्र्य दिनानिमित्त संबंध देशातील शासकीय शाळांमध्ये, शासकीय कार्यालयात ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी शाळांमध्ये रांगोळी स्पर्धा, निबंधलेखन स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात येत असतात. स्वातंत्र्य दिनावरिल भाषण तुम्हाला शालेय जीवनात विविध स्पर्धाकरीता खुप उपयोगी पडेल. खालील लेखात दिलेले भाषण तुम्ही शेवटपर्यंत वाचावे ही नम्र विनंती.


स्वातंत्र्य दिन भाषण मराठी 2022 | 15 ऑगस्ट भाषण मराठी | Independence day speech in marathi

                       उत्सव तीन रंगांचा,
                 आभाळी आज सजला...
               नतमस्तक मी त्या सर्वांचा, 
               ज्यांनी भारत देश घडवला...

सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावरील मान्यवर, वंदनीय गुरुजनवर्ग व येथे उपस्थित माझ्या  देशबांधवांनो, आज १५ ऑगस्ट ! आपण सर्वजण इथे आपल्या भारताचा ७६ वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत.

सर्वप्रथम, तुम्हा सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा! मित्र हो, १५ ऑगस्ट हा भारताच्या सन्मानाचा व अभिमानाचा दिवस आहे. या दिवशी १५ ऑगस्ट १९४७ रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या अनेक वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. आपल्या भारताला स्वातंत्र्य सहजा - सहजी मिळाले नाही. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. 

महात्मा गांधीजी, लोकमान्य टिळक, सुभाषचंद्र बोस, मंगल पांडे, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, लाला लजपत राय अशा अनेक महान स्वातंत्र्यवीरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राण पणास लावले. त्या सर्व शूर स्वातंत्र्यसैनिकांमुळे आज आपण आपल्या देशात मुक्त श्वास घेत आहोत.

स्वातंत्र्यानंतर आपल्या देशाने कृषी, विज्ञान व तंत्रज्ञान, साहित्य, खेळ इ. सर्व क्षेत्रात चांगली प्रगती केली आहे. आज भारताकडे स्वतःचा आण्विक साग आहे. भारत महासत्तेच्या दिशेने वाटचाल करीत आहे.

तरीही आज भारतासमोर महागाई, भ्रष्टाचार, गरीबी सारख्या समस्या आ वासून आहेत. या समस्यांचे उच्चाटन पूर्ण झाल्याशिवाय देश सुखी, संपन्न व प्रगत होणार नाही.

चला तर मग सर्वांनी एकत्र येऊन आपल्या भारत देशाला जगातील एक आदर्श देश बनवण्यासाठी प्रयत्न करूया.शेवटी मला म्हणावेसे वाटते की,
                    तिरंगा आमुचा ध्वज,
                      उंच उंच फडकवू ..
                  प्राणपणाने लढून आम्ही, 
                     शान याची वाढवू ..

                        धन्यवाद !
          भारत माता की जय ! वंदे मातरम् !!

स्वातंत्र्य दिन भाषण मराठी link




15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रध्वज फडकावताना या गोष्टी लक्षात ठेवा ⤵️

1) ध्वज फडकावताना तो फाटलेला, मळलेला किंवा चुरगळलेला नसावा.

2) तिरंगा व्यवस्थित ठिकाणी फडकावावा. ज्या उंचीवर तो फडकावला आहे, त्याच्या बरोबरीच्या उंचीवर इतर कोणताही ध्वज फडकावू नये.

3) कोणत्याही प्रकारच्या सजावटीसाठी राष्ट्रध्वजाचा वापर करू नये. ध्वजारोहणासाठी झेंडा तयार करताना त्यात फुलं ठेवता येतील.

4) ध्वज फडकावताना नारिंगी रंग वरच्या बाजूला राहील, याची दक्षता घ्यावी. ध्वजावर काहीही लिहू नये. कोणतीही वस्तू झाकण्यासाठी त्याचा वापर करू नये.

5) राष्ट्रध्वज फरशीवर पडलेला नसावा, पाण्यावर तरंगलेला नसावा.

6) कोणत्याही प्रकारच्या वेशभूषेवर राष्ट्रध्वजाचा वापर करू नये. तो कमरेच्या खाली गुंडाळू नये. रुमाल, सोफ्याचं कव्हर, नॅपकीन, अंतरवस्त्र यासाठी कापड म्हणून त्याचा वापर करू नये.

7) जेव्हा ध्वज फडकावतो तेव्हा तो ध्वजस्तंभाच्या उजव्या बाजूला असावा.

हे सुध्दा वाचा ⤵️


FAQ
Q.1) 15 ऑगस्ट 2022 हा भारताचा कितवा स्वातंत्र्य दिन आहे ?
Ans.15 ऑगस्ट 2022 हा भारताचा 76 वा स्वातंत्र्य दिन आहे.

Q.2) 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन का साजरा केला जातो ?
Ans.१५ ऑगस्ट १९४७ रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या अनेक वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला म्हणून  15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो.

Q.3) भारताला स्वातंत्र्य मिळून किती वर्ष झाली आहेत ?
Ans.भारताला स्वातंत्र्य मिळून 76 वर्ष झाली आहेत.






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad