गुरुपौर्णिमा कविता चारोळ्या शायरी मराठी | Guru purnima kavita charolya shayari marathi | Guru purnima poem in marathi | गुरुपौर्णिमा मराठी कविता चारोळ्या मराठी
गुरूपौर्णिमा २०२२ :- नमस्कार मित्रांनो आज आपण १३ जुलै २०२२ रोजी साजरा होणारा सण म्हणजे ''गुरुपौर्णिमा'' या बद्दलची कविता, चारोळ्या, शायरी मराठी माहिती बघणार आहोत. गुरुपौर्णिमा निमित्त दिलेल्या कविता, चारोळ्या,शायरी ही तुम्हाला शालेय जीवनात खुप उपयोगी पडतील तरी तुम्ही खालील लेखात दिलेली माहिती शेवटपर्यंत वाचावी ही नम्र विनंती.
गुरुपौर्णिमा कविता मराठी | Guru purnima kavita poem marathi
कवितेचे नाव : गुरुपौर्णिमा
जमलोय आज सर्व गुरुपोर्णिमेला
वंदन करितो आम्ही
सर्व गुरुजनांना....!
अजाण मुले होतो आम्ही,
घडलो सुजाण, तुमच्या आशीर्वादांनी...!
होता तुमचा हात, आमुच्या पाठीवरती,
म्हणूनच जिंकलो आम्ही..
कसोटी आयुष्याची...!
प्रथम गुरु आई- बाबा,
ज्यांनी केले आम्हांस स्वतःच्या पायावर उभा.
शाळेतील शिक्षक माझे निरंतर गुरु
ज्यांनी केले आमुचे शुन्यातून विश्व सुरु... !.
ज्यांनी मला दिले कळत- नकळत ज्ञान
अश्या माझ्या सर्व गुरूंना
माझा प्रणाम !!!
कवितेचे नाव :- छडी
नजरेपुढे कठोर होते, नजरेआडून पाझरते
सर, तुमची छडी अजून भविष्याला सावरते !!
पुस्तकांची हाक येते दप्तराच्या कंठातून
संस्कारांच्या कंपासपेटीत आयुष्याला सामावून
शिष्य म्हणून, युवक म्हणून, 'माणूस' म्हणून घडवते
सर, तुमची छडी अजून भविष्याला सावरते !!
तेव्हा तुम्ही बाकावरती उभं केलं नसतं जर
विचारांची पोहोच कधी गेली नसती ध्येयावर
अडथळयांचा डोंगर एका क्षणामध्ये झुकवते
सर, तुमची छडी अजून भविष्याला सावरते !!
आठवणींच्या फळयावरती अजून आहेत सुविचार
शिस्तीच्या त्या गणिताला ममत्वाचा गुणाकार
नजरेमध्ये सूर्य घेऊन आभाळ व्हायला शिकवते
सर, तुमची छडी अजून भविष्याला सावरते !!
गुरुपौर्णिमा चारोळ्या मराठी | Guru purnima Charolya marathi
जगात सर्व नात्याहून न्यारे,
असते नाते गुरू-शिष्याचे... !
झुकून नमन करतात सारे,
जिथे इतिहास लिहिले जातात भविष्याचे...!
सजीव-निर्जीवांकडून मिळालेली,
प्रेरणा ही गुरुच असते...!
मनामध्ये उठलेला आशेचा ध्यास
अन् नवनिर्माणाची आसही गुरुच असते...!
काय कीर्ती वर्णावी,
गुरूंच्या अगम्य महतीची...!
कठीण प्रसंगीही आठवण होते,
फक्त त्यांच्याच सोबतीची....!!
दिशादर्शक बाण असतो गुरू...
संस्कारांची खाण असतो गुरू...!
प्रगतीचे पंख असतो गुरू...
कर्तृत्वाच्या रणांगणावरील शंखनाद असतो गुरू....!!
गुरू असतो अंधाऱ्या रात्रीची प्रकाशवाट...
गुरू असतो चैतन्याची सोनेरी पहाट...!
तू हारू नको, लढ म्हणत
तुफानावर स्वार होणारी उत्साही लाट...!!
गुरू असतो ध्यास कीर्तीचा...
गुरू असतो श्वास पूर्तीचा....
गुरू असतो मार्ग यशाचा...
गुरू असतो किरण आशेचा..!!
गुरू असतो सुगंध सत्कार्याचा..
गुरू असतो वारा औदार्याचा...!
गुरू असतो जबाबदारीचा सागर..
गुरू असतो जाणिवांचा जागर....!
गुरू असतो अधिकाराचे अधिष्ठान
गुरू असतो सद्विचारांचे प्रतिष्ठान...!!
हे सुध्दा वाचा⤵️
FAQ
Q.1) गुरुपौर्णिमा कधी आहे ?
Ans. गुरुपौर्णिमा १३ जुलै २०२२ वार बुधवार रोजी आहे.
Q.2) दरवर्षी गुरुपौर्णिमा कधी साजरी केली जाते ?
Ans.दरवर्षी गुरुपौर्णिमा आषाढ महिन्यातील शुद्ध पौर्णिमेला साजरी केली जाते.
Q.3) गुरुपौर्णिमा साजरी का करतात ?
Ans. गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गुरुपौर्णिमा साजरी करतात.