Type Here to Get Search Results !

लोकमान्य टिळक निबंध मराठी | Lokmanya Tilak Essay In Marathi

 लोकमान्य टिळक निबंध मराठी | Lokmanya Tilak Essay In Marathi | लोकमान्य टिळक जयंती मराठी निबंध | Lokmanya Tilak  nibandh marathi | Lokmanya Tilak jayanti marathi nibandh pdf

लोकमान्य टिळक जयंती 2022 : नमस्कार मित्रांनो २३ जुलै रोजी लोकमान्य टिळक यांची जयंती संबंध देशात विविध शासकीय शाळांमध्ये निबंध स्पर्धा, भाषण स्पर्धा राबविण्यात येत असतात. याच अनुषंगाने आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत लोकमान्य टिळक जयंती निमित्त निबंध, भाषण मराठी अतिशय सोप्या भाषेत तरी तुम्ही ही माहिती शेवटपर्यंत वाचावी ही नम्र विनंती.

लोकमान्य टिळक निबंध मराठी | Lokmanya Tilak essay in marathi

लोकमान्य टिळक हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील थोर स्वातंत्र्यवीर होते. "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच" अशी सिंहगर्जना करत त्यांनी जनतेला स्वातंत्र्य लढ्याचा मंत्र दिला.

लोकमान्य टिळक यांचा जन्म २३ जुलै १८५६ रोजी रत्नागिरीतील चिखली गावी झाला. त्यांचे खरे नाव केशव असे होते. "बाळ" हे त्यांचे टोपण नाव होते. त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर टिळक व आईचे नाव पार्वतीबाई असे होते.

टिळक लहानपणापासूनच अतिशय कुशाग्र बुद्धिमत्तेचे होते. १८७७ मध्ये त्यांनी पुण्याच्या डेक्कन कॉलेज मधून बी. ए. ची पदवी मिळवली. टिळक व आगरकर यांनी 'मराठा' व 'केसरी' ही दोन वृत्तपत्रे चालू केली. या 'टिळकांनी राष्ट्रीय वृत्तपत्रांद्वारे टिळकांनी विचारांचा प्रचार केला. लोकांनी एकत्र यावं म्हणून त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती उत्सव सुरु केले.   इंग्रज सरकार विरुद्ध आवाज उठविल्यामुळे त्यांना अनेकदा तुरुंगवास भोगावा लागला. मंडाले तुरुंगात तुरुंगवास भोगत असताना त्यांनी "गीतारहस्य" हा ग्रंथ लिहिला.

१९२० साली टिळकांची प्रकृती बिघडू लागली. १ ऑगस्ट १९२० रोजी लोकमान्य टिळक यांचे निधन झाले. आजन्म देशसेवेत गर्क असलेला भारताचा हा तेजस्वी सूर्य मावळला गेला.



हे सुध्दा वाचा⤵️


FAQ
Q.1) लोकमान्य टिळक जयंती कधी आहे ?
Ans. लोकमान्य टिळक जयंती २३ जुलै रोजी साजरी केली जाते.

Q.2) लोकमान्य टिळक यांच्या आई-वडीलांचे नाव काय होते ?
Ans. लोकमान्य टिळक यांच्या वडिलांचे नाव गंगाधर टिळक व आईचे नाव पार्वतीबाई असे होते.

Q.3) लोकमान्य टिळक यांचा जन्म कधी झाला ?
Ans. लोकमान्य टिळक यांचा जन्म २३ जुलै १८५६ रोजी रत्नागिरीतील चिखली गावी झाला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad