Type Here to Get Search Results !

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे निबंध मराठी | lokshahir annabhau sathe essay marathi

 लोकशाहीर अण्णाभाऊ साठे निबंध मराठी | lokshahir annabhau sathe essay in marathi | lokshahir annabhau sathe nibandh marathi | अण्णाभाऊ साठे मराठी निबंध | Annabhau sathe jayanti 2022 marathi nibandh 

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती २०२२:- नमस्कार मित्रांनो येत्या 1 ऑगस्ट २०२२ वार सोमवार रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती सर्वत्र साजरी केली जाते. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे निबंध, भाषण, कविता मराठी माहिती. खालील लेखात दिलेला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्यावरील निबंध तुम्ही शेवटपर्यंत वाचावी ही नम्र विनंती.

अनुक्रमणिका toc

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे निबंध मराठी | lokshahir annabhau sathe essay in marathi 

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे मूळ नाव तुकाराम संपूर्ण जग त्यांना अण्णा भाऊ या टोपण नावानेच ओळखते. अण्णाभाऊ साठे यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे असे होते. अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगांव या गावी झाला.

अण्णाभाऊ साठे यांच्या वडिलांचे नाव भाऊराव साठे तर आईचे नाव वालुवाई साठे असे होते. अण्णा भाऊ साठे हे शाळेत शिकलेले नाहीत. केवळ दीड दिवस ते शाळेत गेलेले. नंतर तेथील सुवर्णाद्वारे होणाऱ्या भेदभावामुळे त्यांनी शाळा सोडून दिली. त्यांनी दोन लग्न केलीत. त्यांची पहिली पत्नी कोंडाबाई साठे तर दुसरी पत्नी जयवंता साठे होत. त्यांना एकूण तीन आपत्य होती मधुकर, शांता आणि शकुंतला.

मोजकेच शिक्षण घेतलेले अण्णाभाऊ लहानपणीच आपल्या वडिलांसोबत मुंबई येथे आले. मुंबईला अंगावर पडेल ते काम त्यांनी केले. गिरणीमध्ये झाडूवाल्याची नोकरी पासून ते कोळसे वेचण्यापर्यंत सर्व कामे त्यांनी केली.

"गरिबीने ताटतुट केली आम्हा दोघांची, झाली तयारी माझी मुंबईला वेळ होती ती भल्या पहाटेची बांधाबांध जाण्याची तुकड्याची" झाली भाकर या कवितेतून त्यांनी आपला मुंबई प्रवासाचा अनुभव व्यक्त केलेला
दिसतो.

🔰अण्णाभाऊ साठे यांचे मराठी साहित्य लेखन :-

अण्णाभाऊ यांनी आपल्या जीवनकाळात विविधांगी लेखन केले. त्यांनी जवळपास २१ कथासंग्रह आणि ३० पेक्षा अधिक कादंबऱ्या लिहिल्या. मराठी साहित्यातील लोकनाट्य, पोवाडे, लावणी, प्रवास वर्णन, कथा, कविता, गीते इ. क्षेत्रांत त्यांनी सक्षम आणि समृद्ध लेखन केले. अन्नाभाऊंच्या साहित्यात समाजातील वैर नष्ट करण्याचे सामर्थ्य आपल्याला दिसून येते. त्यांनी तत्कालीन सामाजिक पस्थितीवर आपल्या लेखणीच्या माध्यमातून प्रकाश टाकण्याचे काम केले.

तमाशाला सांस्कृतिक वारसा मिळवून देण्याचे श्रेय भाऊंना जाते. तमाशात काम करताना स्त्रियांचे होणारे शोषण या विषयावरील त्यांची वैजयंता' हि कादंबरी, तर भीषण दुष्काळात ब्रिटीशांचे खजिने व धान्य गोदाम लुटून गोरगरिबांना व श्रमिकांना वाटणाऱ्या तरुणाची कथा सांगणारी 'फकीरा' ह्या त्यांचा काही प्रसिद्ध कादंबऱ्या आहेत.

अण्णाभाऊ साठे यांच्या 'फकीरा' या कादंबरीला १९६१ सालचा राज्य सरकारचा उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार मिळालेला आहे. गोरगरीब, शेतकरी, शेतमजूर, श्रमिक यांच्या वेदना जाणून घेऊन त्यांवर केलेले लेखन हे अण्णाभाऊ यांची विशेषता. शिवाय ज्यांना लिहिता वाचता येत नाही त्यांच्यासाठी त्यांना कळेल अशा भाषेत त्यांनी पोवाडे, लावण्या व गीते
लिहिली.

♦️लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या काही प्रसिद्ध कादंबऱ्या :- 

लोकशाहीर म्हणून अण्णाभाऊंच्या अनेक कादंबऱ्याा प्रसिद्ध आहेत. 
  • आबी
  • गुलाम
  • जिवंत काडतुसे
  • पाझर
  • रानगंगा
  • वारणेचा वाघ
  • वैर
  • फकीरा
  • वैजयंता 

🎯अण्णाभाऊ साठे यांचे कथासंग्रह :-

कादंबऱ्या बरोबरच अण्णाभाऊ साठे यांनी अनेक कथा संग्रह लिहिले त्यात....
  • कृष्णा काठच्या कथा
  • गजाआड
  • नवती
  • खूळवाडा
  • आबी
  • पिसाळलेला माणूस
  • फरारी
  • बरबाद्या कंजारी
  • निखारा
  • चीरानगरची भूतं
असे हे थोर साहित्य सम्राट, लोकशाहीर, विचारवंत, समाजसुधारक अशा कितीतरी उपाधी धारण केलेले अण्णाभाऊ साठे यांचे निधन 18 जुलै 1969 रोजी झाले. अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याला आणि त्यांच्या विचारांना विनम्र अभिवादन.



हे सुध्दा वाचा⤵️


FAQ
Q.1) लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्म कधी झाला ?
Ans. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगांव या गावी झाला.

Q.2) लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे पूर्ण नाव काय होते ?
Ans. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे असे होते. 

Q.3) लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे निधन कधी कधी झाले ?
Ans. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे निधन 18 जुलै 1969 रोजी झाले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad