Type Here to Get Search Results !

नागपंचमी निबंध मराठी माहिती | Nagpanchami essay in marathi

 नागपंचमी निबंध मराठी माहिती pdf|  Nagpanchami essay in marathi | Nagpanchami nibandh marathi mahiti pdf

नागपंचमी निबंध मराठी 2022 :- नमस्कार मित्रांनो आज आपण नागपंचमी सनाविषयी अतिशय सुंदर मराठी निबंध बघणार आहोत. नागपंचमी निबंध मराठी तुम्हाला शालेय जीवनात विविध स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त ठरणार आहे. तरी तुम्ही नागपंचमी निबंध शेवटपर्यंत वाचावा ही नम्र विनंती.

नागपंचमी निबंध मराठी | Nagpanchami nibandh marathi 

नागपंचमी निबंध मराठी 2022 :- श्रावण महिन्यात येणारा पहिला महत्वाचा सण म्हणजे नागपंचमी. हा सण श्रावण महिन्याच्या पाचव्या दिवशी सर्वत्र आनंदात व उत्साहात साजरा केला जातो. दरवर्षी स्त्रिया तसेच मुली या सणाची खूप आतुरतेने वाट पाहत असतात.

मुली या सणाची खूप आतुरतेने वाट पाहत असतात.
नागपंचमीच्या दिवशी ग्रामीण भागातील स्त्रिया वारुळाजवळ जाऊन नागाची आरती व पूजा करतात. नागदेवतेला दूध, लाह्या तसेच पुरणाची दिंड इ. यांचा नैवेद्य दाखवतात. झिम्मा फुगडी खेळतात.नागपंचमीची गाणी म्हणतात. शहरी भागातही स्त्रिया देवापुढे नागदेवते चा फोटो काढून किंवा नागदेवतेचे चित्र भिंतीवर चिकटवून त्याची पूजा करतात. या सणाच्या आदल्या दिवशी स्त्रिया हातावर मेहंदी काढतात तसेच आपल्या भावाच्या प्रगतीसाठी व चांगल्या आरोग्यासाठी उपवास करतात. त्यास भावाचा उपवास असेही म्हणतात.

नागपंचमीचा सण हा नागाबद्दल आदर, प्रेम व कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. साप हा शेतक-याचा मित्र आहे. तो शेतातील उंदीर तसेच इतर नुकसानकारक जीव खाऊन आपला उदरनिर्वाह करती. सापाला क्षेत्रपालही म्हणतात. आज दिवसेंदिवस सापांची संख्या कमी होत आहे. त्यामुळे आपल्याला कोठेही साप आढळल्यास सर्पमित्रांना बोलावून त्याला लोकवस्ती पासून दूर किंवा जंगलात सोडावे..

नागपंचमीचा सण आपल्याला प्रेमाने कोणालाही जिंकता येते हे शिकवतो तसेच भूतदया आणि सहिष्णुतेची अनमोल शिकवण देतो.




हे सुध्दा वाचा ⤵️


FAQ
Q.1) नागपंचमी 2022 कधी आहे ?
Ans. नागपंचमी 2022 दिनांक 2 ऑगस्ट वार मंगळवार या दिवशी आहे.

Q.2) नागपंचमी हा सण का साजरा केला जातो ?
Ans. नागपंचमीचा सण हा नागाबद्दल आदर, प्रेम व कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. 

Q.3) नागपंचमी हा सण कधी साजरा केला जातो ?
Ans. नागपंचमी हा सण श्रावण महिन्याच्या पाचव्या दिवशी सर्वत्र आनंदात व उत्साहात साजरा केला जातो.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad