google-site-verification=mhQXPDL6t29v0SBU3tM2gsf6ieXw2vbDeuweOWGfOg0 पर्यावरण संवर्धन काळाची गरज निबंध भाषण मराठी | paryavaran Samvardhan kalachi garaj nibandh marathi
Type Here to Get Search Results !

पर्यावरण संवर्धन काळाची गरज निबंध भाषण मराठी | paryavaran Samvardhan kalachi garaj nibandh marathi

 पर्यावरण संवर्धन काळाची गरज निबंध भाषण मराठी | paryavaran Samvardhan kalachi garaj nibandh marathi | निसर्ग माझा मित्र भाषण निबंध मराठी | paryavaran maza mitra bhashan nibandh marathi 

             " निसर्ग माझा मिञ
                निसर्ग माझा गुरू
                निसर्ग माझी माय 
                मीत्याचे लेकरू''
आजच्या या विज्ञानयुगात माणुस जेवढा इंटरनेटच्या जाळ्यात अडकत चालला आहे तेवढाच तो निसर्गाकडेही आकर्षित होतो.म्हणुनच या धकाधकीच्या जीवनातही माणुस दोन दिवस का होईना वेळ काढून निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवतो.

मित्रांनो, पर्यावरण म्हणजे काय हो ? पर्यावरण म्हणजे आपल्या भोवतालचा परिसर ज्यात सर्व सजीव व निर्जीव वस्तुंचा समावेश केला होतो. झाडे  तर पर्यावरणाचा आत्मा आहे.

           "एक झाड जर समोर असले
               तर घराचं संरक्षण होतं
              उन्हानं दिवसभर तडपून
               जगाला शितलता देतं.”

म्हणूनच पर्यावरण, निसर्ग आणि मानव यांच्यातील अतुट स्नेहसंबंध पुरातन काळापासुन आहे.

          सर्वोच्च संस्कृतीचे आम्ही वारसदार
          सत्य व अहिंसेचे आम्ही राखणदार
          सत्य आणि सत्याग्रह शस्त्राने लढणार
          प्रदुषणमुक्त भारत सत्यात उतरविणार


मित्रांनो आपण हल्ली ऐकत आलो आहोत . कि, पर्यावरणाचा समतोल बिघडत चालला आहे, . पण पर्यावरण म्हणजे नेमकं काय हो ? निसर्ग - सृष्टीमधील अग्नी, जल, पृथ्वी, आकाश आणि वायू या पंचमहाभुतांनी बनलेलं हे पर्यावरण. हेच पाच प्रमुख तत्वे आणि हेच या पर्यावरणाचे 100 आधारस्तंभ पण आता त्यांनाच तडा गेलायं.

                  "कचयाची दुर्गंधी झाली
                   प्लास्टिकची लाट आली
                   दारिद्र्याची साथ पसरली
                   रोगराईने उचल खाल्ली
                   प्रदुषणाने मात केली
                   भु माझी लयाला गेली "

मित्रहो, पाऊस माणसाला जगावयास मदत करतो. पण पर्यावरणाच्या न्हासामुळे हा पाऊस आपल्यावर रूसलार्य का १ पर्यावणाने आपल्याला -अन्न, वस्त्र, निवारा या मुलभूत सोयींसह अन्य अनेक ...सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. परंतू मानवाच्या स्वार्थी, अज्ञानी, बेजबाबदारपणा आणि अविचारी हव्यासाने पर्यावरणाचा बेसुमार वापर करून त्याचा -हास केल्यामुळे अनेक जटिल समस्या निर्माण झाल्या आहेत. मित्रहो आपण अन्नाशिवाय एक दिवस आणि पाण्याशिवाय एक तास राहू शकतो परंतू हवेशिवाय आपण क्षणभरही  जिवंत राहू शकत नाही. ऑक्सिजन निर्मिती करणे हे पर्यावरणातील महत्त्वाचे काम झाडे करीत असतात. वनस्पती हवेतला कार्बन डाय ऑक्साईड शोषून घेतात आणि मानवाला उपयुक्त असा ऑक्सिजन हवेत सोडतात. त्यामुळे वृक्षलागवड व संवर्धन करणे हे माणसाचेच कर्तव्य आहे.

                    उंच उंच घरे कारखाने,
                  प्रगतीची मशाल पेटलेली....
                    प्रत्येक काम यंत्राने,
                   सहज पुर्णत्वास नेलेली -
                   वेगवान प्रवास विमाने,
                  उड्डाण क्षणार्धात केलेली
                  अरण्य रेखाटतोय चित्राने,
                   सपाट भूभाग झालेली..
                   भ्रमणध्वनी चाले जोमाने
              चिमण्यांची गाणी मात्र हरवलेली
                   प्रदुषण वाढते वेगावेगाने
                 ओझोनची पातळी आटलेली.....
                    व्यासले मानवा रोगाने
                    वयोमर्यादा ही घटलेली
                     बिघडली सारी संतुलने
                     अपूर्ण स्वप्ने सजलेली
                     दिलाय निसर्ग ईश्वराने
                    सांभाळ संपत्ती भेटलेली....



हे सुध्दा वाचा⤵️


FAQ
Q.1) पर्यावरण म्हणजे काय ?
Ans.पर्यावरण म्हणजे आपल्या भोवतालचा परिसर ज्यात सर्व सजीव व निर्जीव वस्तुंचा समावेश केला होतो. 

Q.2) पंचमहाभूते कोणती आहेत ?
Ans. सृष्टीमधील अग्नी, जल, पृथ्वी, आकाश आणि वायू या पंचमहाभुतांनी बनलेलं हे पर्यावरण आहे.

Q.3)ऑक्सिजन निर्मिती करणे कोणाचे काम आहे ?
Ans.ऑक्सिजन निर्मिती करणे हे पर्यावरणातील महत्त्वाचे काम झाडे करीत असतात.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad