Type Here to Get Search Results !

वसंतराव नाईक भाषण निबंध मराठी माहिती | vasantrao naik speech essay in marathi

 वसंतराव नाईक भाषण निबंध मराठी माहिती | vasantrao naik speech essay in marathi | vasantrao naik bhashan marathi | vasantrao naik nibandh marathi

वसंतराव नाईक जयंती २०२२ :- नमस्कार मित्रांनो आज १ जुलै म्हणजे वसंतराव नाईक यांची जयंती. वसंतराव नाईक यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र कृषी दिन साजरा केला जातो. म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत वसंतराव नाईक जयंती भाषण निबंध मराठी माहिती.ही माहिती तुम्ही शेवटपर्यंत वाचावी ही नम्र विनंती.

वसंतराव नाईक भाषण निबंध मराठी | vasantrao naik speech essay in marathi

वसंतराव नाईक यांचा जन्म बंजारा समाजामध्ये सौ. होनुबाई फुलसिंग नाईक यांच्या पोटी दि. १ जुलै १९१३ रोजी गहुली (ता. पुसद, जि. यवतमाळ) या गावी झाला. वसंतराव नाईक यांचे आजोबा चतुरसिंग (राठोड) नाईक यांनी गहुली हे गाव वसविले. चतुरसिंग हे तांड्याचे प्रमुख होते. म्हणून त्यांना लोक नाईक म्हणत. वसंतरावाचे बालपण गहुली गावीच गेले.

त्यांचे प्राथमिक शिक्षण पोहरादवी, उमरी, भोजला, बान्सी या ठिकाणी झाले. त्या काळी वाहूनांची सोय नसल्यामुळे ते चार-पाच मैल चालत जाऊन मोठ्या जिद्दीने व कष्टाने शिक्षण घेतले. पुढे महाविद्यालयीन शिक्षण अमरावती व नागपूर येथे पूर्ण केले. वाचनाची उदंड आवड निर्माण झाल्यामुळे महात्मा फुले व अन्य समाजसुधारकांचे त्यांनी वाचन केले.

सन १९३३ साली नागपूर येथील नील सिटी हायस्कूलमधू मॅट्रिक परीक्षा वसंतराव नाईक उत्तीण केली. नागपूर विद्यापिठातून सन १९३७ साली बी.ए. ची पदवी घेतली. पुढे १९४० साली नागपूर विद्यापीठ विधी महाविद्यालयात एल. एल. बी शिक्षण घेऊन कायद्याची पदवी मिळवली. वकीली व्यवसायात त्यानी दिन-दुबळ्या, गोर-गरिबांना मदतीचा हात देऊन विविध अडचणीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न केले. यात त्यांना मोठे यश आले.

डॉ. पंजाबराव देशमुख या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली एक धडाडीचे समाज कार्यकर्ता म्हणून वसंतराव नाईक यांची संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात ख्याती पसरली. नोव्हेंब १९५६ रोजी द्विभाषीक मुंबई राज्याच्या मंत्रीमंडळात सहकार, कृषी, दुग्धव्यवसाय या खात्याचे मंत्री म्हणून त्यांचा समावेश झाला. त्यावेळी यशवंतराव चव्हाण हे मुख्यमंत्री होते.

अखिल भारतीय काँग्रेसचे तसेच महाराष्ट्र विभागीय कॉंग्रेस समितीचे व कार्यकारणीच्या सदस्यपदी त्यांची | निवड झाली. सन १९५५ साली वसंतराव नाईक यांनी यवतमाळ जिल्ह्यातून व विदर्भातून हजारो एकर जमीन भुदानासाठी मिळवून दिली. १९५९ साली गोर-गरीबांच्या मुलांना शिक्षणाची सोय व्हावी म्हणून, फुलसिंग नाईक महाविद्यालयाची पुसद येथे स्थापना केली.

१९६२ च्या निवडणुकीनंतरही कन्नमवारांच्या मंत्रिमंडळात ते महसूल मंत्री होते; पण कन्नमवारांच्या मृत्यूनंतर ते बहुमताने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले (१९६३). या पदावर त्यांनी १२ वर्षे काम केले. या काळात त्यांनी महाराष्ट्रात अनेक सुधारणा केल्या. महाराष्ट्राची पायाभरणी व उभारणी त्यांच्यात कारकिर्दीत झाली. प्रथमतः त्यांनी कृषिविषयक समस्या हाताळून महाराष्ट्र धान्याच्या बाबतीत कसा स्वयंपूर्ण होईल याकडे लक्ष दिले.

१ जुलै ही त्यांची जयंती कृषी दिन म्हणून साजरा करण्याचे निर्णय सन १९८९ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी घेतले. तेंव्हा पासून शासकीय स्तरावर हा दिवस साजरा होतो. तर कृषीदिन थेट शेतकऱ्यांच्या बांधावर ' साजराकरण्याची अभिनव प्रथा सन २०११ पासून 'थेट शेतकऱ्यांच्या बांधावर' मोहीमेचे प्रणेते एकनाथ पवार यांनी सुरू केली. वसंतराव नाईक यांचे निधन १८ ऑगस्ट १९७९ रोजी सिंगापूर येथे झाले.




हे सुध्दा वाचा⤵️

FAQ
Q.1) वसंतराव नाईक यांचा जन्म कधी झाला ?
Ans.वसंतराव नाईक यांचा जन्म बंजारा समाजामध्ये सौ. होनुबाई फुलसिंग नाईक यांच्या पोटी दि. १ जुलै १९१३ रोजी गहुली (ता. पुसद, जि. यवतमाळ) या गावी झाला. 

Q.2) वसंतराव नाईक यांच्या आईचे नाव काय होते ?
Ans. वसंतराव नाईक यांच्या आईचे नाव होनुबाई फुलसिंग नाईक हे होते.

Q.3) वसंतराव नाईक यांचे निधन कधी झाले ?
Ans. वसंतराव नाईक यांचे निधन १८ ऑगस्ट १९७९ रोजी सिंगापूर येथे झाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad