google-site-verification=mhQXPDL6t29v0SBU3tM2gsf6ieXw2vbDeuweOWGfOg0 जागतिक लोकसंख्या दिन २०२२ निबंध भाषण मराठी माहिती | world population day 2022
Type Here to Get Search Results !

जागतिक लोकसंख्या दिन २०२२ निबंध भाषण मराठी माहिती | world population day 2022

 जागतिक लोकसंख्या दिन २०२२ निबंध भाषण मराठी माहिती | world population day 2022 information in marathi | jagtik loksankhya din 2022 marathi mahiti | जागतिक लोकसंख्या दिन मराठी माहिती

जागतिक लोकसंख्या दिन :- नमस्कार मित्रांनो आज ११ जुलै जागतिक लोकसंख्या दिन संपूर्ण जगात साजरा केला जातो. जागतिक लोकसंख्या दिन जगभरातील लोकसंख्या वाढीची समस्या नियंत्रणात आणण्यासाठी जनजागृती करणारा हा दिवस आहे. यादिवशी जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत जागतिक लोकसंख्या दिन भाषण, निबंध मराठी माहिती व ही माहिती तुम्ही शेवटपर्यंत वाचावी ही नम्र विनंती.

जागतिक लोकसंख्या दिन मराठी माहिती निबंध | jagtik loksankhya din marathi mahiti nibandh

लोकसंख्या म्हणजे मानव प्रजातीची एकूण संख्या. लोकसंख्या वाढ ही एक अतिशय भीषण समस्या जगासमोर आ वासून उभी आहे. जगभरात दर सेकंदाला सरासरी चार पेक्षा जास्त बालके जन्माला येतात. १ जानेवारी २०२२ रोजी जगाची लोकसंख्या ७ अब्ज ८६ कोटी ८८ लाख एवढी होती. २०२३ पर्यंत हा आकडा ८ अब्ज १० कोटी ८६ लाख होण्याची शक्यता आहे. लोकसंख्येच्या बाबतीत भारत चीन नंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. सध्या भारताची लोकसंख्या १४० कोटी ६४ लाख ८७ हजार एवढी आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे नैसर्गिक साधनसंपत्ती वरचा ताण खूप वाढला आहे. ही निसर्ग संपदा संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. जगभरात दरवर्षी ११ जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा केला जातो. यादिवशी लोकसंख्या वाढीमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांकडे लक्ष वेधले जाते आणि त्यावर विचारमंथन केले जाते. लोकसंख्या नियंत्रणासाठी नवनवीन प्रयन्न सुरू केले जातात ११ जुलै १९८७ रोजी जगातील पाच अब्जावे बालक युगोस्लाव्हिया येथे जन्माला आले होते. या पाच अब्जाव्या बालकाची जगभरात विशेष चर्चा झाली यामुळे वाढणाऱ्या लोकसंख्येविषयी जनमानसात जागृती निर्माण झाली. अखेर युनोने पण याची दखल घेऊन १९८९ सालापासून हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून घोषित केला.

   लोकसंख्या नियंत्रणासाठी जागतिक स्तरावर सर्व देशांनी एकत्र येऊन ठोस उपाययोजना करण्याची तीव्र गरज निर्माण झाली आहे. लोकसंख्येच्या अनियत्रित वाढीमुळे अतिशय जटिल अशा सामाजिक व पर्यावरणीय समस्या निर्माण झाल्या आहेत. वाढते शहरीकरण, वाढते प्रदूषण, बेरोजगारी, गरिबी, अन्नधान्याची कमतरता वाढती गुन्हेगारी, आरोग्य सुविधांचा अभाव, दरडोई कमी होत जाणारे जमिनीचे क्षेत्र या व इतर अनेक समस्या वाढत्या  लोकसंख्येमुळे निर्माण झाल्या आहेत भारतासारख्या . देशात लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी कठोर कायद्याची व काटेकोर अंमलबजावणीची तातडीने गरज आहे . लोकसंख्येचे आकडे अगदी ओव्हरफ्लो होऊन वाहत आहेत. १९२७ साली जगाची लोकसंख्या होती फक्त 2 अब्ज, ती आज ८ अब्जाच्या घरात पोहचली आहे. जगाच्या एकूण लोकसंख्येच्या साठ टक्के लोक आशियामध्ये आहेत. अमेरिकेचे क्षेत्रफळ भारताच्या तिप्पट आहे पण लोकसंख्या मात्र भारताच्या लोकसंख्येच्या पंचवीस टक्के आहे. त्यामुळे या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन सर्वांनी एकजुटीने लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी संकल्प करायला हवा . ' एक कुटुंब एक मूल ' ही काळाची मोठी गरज आहे. त्याचा प्रचार प्रसार व अवलंब करणे जरुरीचे बनले आहे.




हे सुध्दा वाचा⤵️


FAQ
Q.1) जागतिक लोकसंख्या दिन कधी साजरा केला जातो ?
Ans. जागतिक लोकसंख्या दिन जगभरात दरवर्षी ११ जुलै रोजी साजरा केला जातो.

Q.2) भारताची लोकसंख्या किती आहे ?
Ans.भारताची लोकसंख्या १४० कोटी ६४ लाख ८७ हजार एवढी आहे.

Q.3) युनोने जागतिक लोकसंख्या दिन कधीपासून सुरू करण्याची घोषणा केली ?
Ans. युनोने लोकसंख्या वाढीची दखल घेऊन १९८९ सालापासून हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून घोषित केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad