बैल पोळा निबंध मराठी माहिती | bail pola nibandh marathi pdf | पोळा निबंध मराठी | pola nibandh marathi | माझा आवडता सण बैलपोळा निबंध मराठी | bail pola essay in marathi | बेंदूर निबंध मराठी 2022
बैल पोळा २०२२ निबंध मराठी :- नमस्कार मित्रांनो आज आपण २६ ऑगस्ट २०२२ रोजी येणारा शेतकरी बांधवांचा आवडता सण म्हणजेच बैलपोळा यावर अतिशय सुंदर निबंध मराठी मध्ये बघणार आहोत. बैल पोळा निबंध मराठी माहिती तुम्हाला तुमच्या शालेय जीवनात विविध प्रकारच्या स्पर्धासाठी नक्की उपयोगी पडेल. बैल पोळा निबंध मराठी तुम्ही शेवटपर्यंत वाचावा ही नम्र विनंती.
बैल पोळा निबंध मराठी माहिती | bail pola nibandh marathi pdf
शेतकऱ्यांचा आवडता सण म्हणजे बैलपोळा.
आज पुंजले बैलाले,
फेडा उपकारचं देनं.......
बैला, खरा तुझा सनं,
शेतकऱ्या तुझं रीनं.......
अशा शब्दात बहिणाबाईंनी बैलांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली आहे.
बैल पोळा हा सण श्रावण अमावस्या या तिथीला साजरा करण्यात येतो. महाराष्ट्रात या सणाला 'पोळा' किंवा 'बैलपोळा' असे म्हणतात. तर दक्षिण महाराष्ट्रात 'बेंदूर' या नावाने हा सण ओळखला जातो.
बैल पोळ्याच्या दिवशी बैलांना अंघोळ घालतात. त्यांच्या अंगावर झूल टाकली जाते, शिंगांना गोंडे बांधतात, गळ्यात घुंगरांच्या माळा घालून अतिशय छान प्रकारे सजवले जाते. बैलांबरोबरच इतर प्राण्यांनाही सजवले जाते.
बैलपोळा या सणादिवशी शेतकरी बैलांना सर्व धान्यांची खिचडी खाऊ घालतात. त्यांच्यासाठी प्रत्येक घरात पुरणपोळीचा नैवेदय केला जातो.
वर्षभर शेतातील सर्व कष्टांची कामे बैल करतात. म्हणून एक दिवस त्यांना विसावा आणि गोडधोड खाऊ घालण्यासाठी हा सण. या दिवशी बैलांकडून कोणतेही कष्टाचे काम करून घेतले जात नाही.
सायंकाळी बैलांची वाजतगाजत मिरवणूक काढली जाते. त्यांची पूजा केली जाते.
बैल पोळा या सणाच्या निमित्ताने आपण सर्वांनी मुक्या प्राण्यांविषयी प्रेम, आपुलकी सतत ठेवूया. त्यांना आपल्याकडून त्रास होणार नाही याची काळजी घेऊया.
हे सुध्दा वाचा ⤵️
FAQ
Q.1) बैल पोळा २०२२ कधी आहे ?
Ans. बैल पोळा २६ ऑगस्ट २०२२ वार शुक्रवार रोजी आहे.
Q.2) बैल पोळा हा सण कधी साजरा केला जातो ?
Ans. बैल पोळा हा सण श्रावण अमावस्या या तिथीला साजरा करण्यात येतो.
Q.3) दक्षिण महाराष्ट्रात बैलपोळा या सणाला कोणत्या नावाने ओळखले जाते ?
Ans. दक्षिण महाराष्ट्रात 'बेंदूर' या नावाने बैल पोळा हा सण ओळखला जातो.