Type Here to Get Search Results !

नागरीकांसाठी हर घर तिरंगा या उपक्रमा अंतर्गत राष्ट्रध्वजासंबंधी मार्गदर्शन सुचना | har ghar tiranga upakram 2022

 नागरीकांसाठी हर घर तिरंगा या उपक्रमा अंतर्गत राष्ट्रध्वजासंबंधी मार्गदर्शन सुचना | har ghar tiranga upakram 2022 | हर घर तिरंगा अभियान मराठी माहिती 

नागरीकांसाठी हर घर तिरंगा या उपक्रमा अंतर्गत राष्ट्रध्वजासंबंधी मार्गदर्शन सुचना

हर घर तिरंगा उपक्रम २०२२ :- भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, जनतेच्या मनात या स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात, स्वतंत्र्य संग्रामातील अज्ञात/ नायक/ क्रांतिकारक/ स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटनांचे स्मरण व्हावे व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरूपी जनमानसात राहावी या उद्देशाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत दिनांक 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीमध्ये केंद्र शासनाच्या सूचनेनुसार हर घर तिरंगा हा उपक्रम राबविण्यात येत आहे या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी काही मार्गदर्शक सूचना खालील प्रमाणे आहेत.

हर घर तिरंगा उपक्रमा अंतर्गत राष्ट्रध्वजासंबंधी मार्गदर्शन सुचना 

1) दिनांक 13 ऑगस्ट 2022 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधी मध्ये प्रत्येक शासकीय, निमशासकीय व खाजगी व्यवस्थापनांवर तसेच प्रत्येक घर व इमारतींवर राष्ट्रध्वज उभारण्यात यावा.

2) नागरिकांनी राष्ट्रध्वज स्वतः विकत घेणे अपेक्षित आहे. 

3) तिरंगा फडकवितांना केशरी रंग हा वरच्या बाजूने असावा.

4) तिरंगा झेंडा उतरवितांना काळजीपूर्वक सन्मानाने उतरवावा.

5) दि. १३ ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत हर घर झेंडा उपक्रमांतर्गत लावण्यात आलेले अभियान कालावधी नंतर प्रत्येकांनी सन्मानाने व सुरक्षित ठेवावेत.

6) अभियान कालावधी नंतर झेंडा फेकला जावू नये, तो सन्मानाने जतन करून ठेवावा.

7) अर्धा झुकलेला, फाटलेला, कापलेला झेंडा कोणत्याही परिस्थितीत लावला जावू नये.

8) तिरंगा फडकवितांना दररोज संध्याकाळी झेंडा खाली उतरावयाची आवश्यकता नाही.

9) तिरंगा अर्ध्यावर फडकवण्यात येऊ नये. 

10) तिरंग्यावर काहीही लिहिण्यात येऊ नये.

11) तिरंग्याचा वापर कोणतीही वस्तू गुंडाळण्यासाठी करू नये.

12) तिरंगा मातीत किंवा पाण्यात खाली पडू नये.

13) आपल्या गावात बचत गटामार्फत या झेंड्याची विक्री केली जाणार असून त्या झेंड्याची किंमत रु. 30/- फक्त एवढी आहे.


हे सुध्दा वाचा ⤵️


FAQ
Q.1) हर घर तिरंगा उपक्रम कधीपासून राबविण्यात येणार आहे ?
Ans. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा उपक्रम दिनांक 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीमध्ये केंद्र शासनाच्या सूचनेनुसार हर घर तिरंगा हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

Q.2) हर घर तिरंगा उपक्रम का राबविला जात आहे ?
Ans. स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटनांचे स्मरण व्हावे व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरूपी जनमानसात राहावी या उद्देशाने हर घर तिरंगा हा उपक्रम राबविला जात आहे.

Q.3) हर घर तिरंगा उपक्रमा अंतर्गत राष्ट्रध्वजासंबंधी मार्गदर्शन सुचना कोठे बघाव्यात ?
Ans. हर घर तिरंगा उपक्रमा अंतर्गत राष्ट्रध्वजासंबंधी मार्गदर्शन सुचना marathimahila.com या वेबसाईटवर बघाव्यात.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad