google-site-verification=mhQXPDL6t29v0SBU3tM2gsf6ieXw2vbDeuweOWGfOg0 हरतालिका व्रत पुजा विधी मुहूर्त साहित्य मराठी माहिती | hartalika puja vidhi muhurt marathi mahiti
Type Here to Get Search Results !

हरतालिका व्रत पुजा विधी मुहूर्त साहित्य मराठी माहिती | hartalika puja vidhi muhurt marathi mahiti

 हरतालिका व्रत पुजा विधी मुहूर्त साहित्य मराठी माहिती | hartalika puja vidhi muhurt marathi mahiti | hartalika puja kashi karavi | हरतालिका पुजा कशी करावी २०२२ | हरतालिका व्रत २०२२

हरतालिका तृतीय २०२२ :- नमस्कार मित्रांनो सर्व सौभाग्यवतींसाठी अतिशय महत्त्वाचे मानले जानारे व्रत म्हणजे हरतालिका व्रत होय. यंदा हे हरतालिका व्रत 30 ऑगस्ट मंगळवार रोजी आलेले आहेत.शाश्त्रानुसार भाद्रपद शुक्ल पक्ष तृतीय तिथीला हरतालिका व्रत केले जाते. हरतालिका हे व्रत भगवान शिव शंकर आणि माता पार्वतीला समर्पीत केले आहे.

हरतालिका व्रत सौभाग्यवती महिलांबरोबरच कुमारीकाही उत्तम वर प्राप्तीसाठी हे व्रत करतात. मान्यतेनुसार माता पार्वतीने हे व्रत भगवान शिव यांना पति रूपात प्राप्त करण्यासाठी केले होते. माता पार्वतीच्या कठोर तपाला प्रसन्न होऊन भगवान शिव यांनी त्यांना पत्नि रूपात स्वीकार केले होते. तो दिवस होता हरतालिकेचा, तेव्हापासून हरतालिका ही साजरी केली जाते.

हरतालिकेच्या दिवशी भगवान शिव,माता पार्वतीसहीत पार्वतीच्या सखींचे तसेच श्रीगणेशाचे विधीवत पूजन केले जाते. हे व्रत सर्वात कठीणतर व्रत मानले गेलेले आहे. तर आजच्या या लेखात आपण हरतालिका पूजन कसे करावे, पुजनाचा मुहूर्त काय आहे, पुजेसाठी कोणती सामग्री आवश्यक आहे, व व्रत कधी सोडावे,विसर्जन कसे करावे, ही संपूर्ण माहिती बघणार आहोत.

हरतालिका व्रत पुजन कसे करावे | hartalika vrat puja marathi

मित्रांनो हरतालिका व्रताचे पुजन हे सकाळी करणे अत्यंत फलदायी मानले जाते. कारण माता पार्वतीनेही हे पुजन सकाळच्या वेळेतच केलेले होते. माता पार्वतीने सकाळच्या वेळी स्वत: च्या हाताने शिवलिंग पार्थीव तयार करून त्यांच्या ते पुजन करत असत. परंतु काही कारणास्तव सकाळी पुजन करणे न झाल्यास आपण सायंकाळी म्हणजेच प्रदोशकाळात देखील केली तरी चालणार आहे.

हरतालिका पुजनाचा मुहूर्त | hartalika puja muhurt marathi

सकाळचा व सायंकाळचा हरतालिका पूजनाचा मुहूर्त आज आपण जानुन घेणार आहेत.

 पुजनाचा मुहूर्त सकाळी 6.12 मी ते सकाळी 8.50 मी हा सकाळच्या पुजनाचा मुहूर्त आहे. तसेच प्रदोष काळ मुहूर्त आहे संध्या. 6.34 मी ते 8.50 मी हा प्रदोष काळच्या पुजनाचा मुहूर्त आहे. याच काळात आपली संपन्न करून घ्यायची आहे.

हरतालिका व्रत सुरू करण्याआधी सूर्यदेवतेला अरगी देऊन आपण या व्रताचा संकल्प करून नंतर हा व्रत सुरू करायचा आहे.

हरतालिका व्रत पुजा सामग्री | hartalika vrat puja samagri 

हरतालिकेची पुजा करण्यासाठी लागणारी साहित्य सामग्री आज आपण बघणार आहोत.

हरतालिका व्रत पुजा सामग्री :- चौरंग, रांगोळी, तांदूळ, पाण्याचा कलश, ताम्हण, पळी, पंचपाळ, तसराळ, आसन, निरांजन, शंख, घंटा, समई, कापूरारती, हळदीकुंकू, अष्टगंध, गुलाल, बुक्का, चंदन, अक्षता, उदबत्ती, कापूर, तुपाच्या व तेलाच्या वाती, अत्तरफाया, विड्याची पाने, सुपाऱ्या, बदाम, खारका, नारळ, फळे, खडीसाखर, गूळखोबरे, पंचामृत, कापसाचे वस्त्र, कोरे वस्त्र, तसेच फणी, काजळ, गळेसरी, कांकणे, आरसा इत्यादी सौभाग्यद्रव्ये. याव्यतिरिक्त फुले, दूर्वा, तुलसीपत्रे, व झाडांची पाने बेल, आघाडा, मधुमालती, दूर्वा, चाफा, कण्हेर, बोर, रुई, तुळस, आंबा, डाळिंब, धोतरा, जाई, मरवा, बकुळ, अशोकाची पाने अशाप्रकारची पाने देखील शिवपुजनासाठी लागणार आहेत. 

हरतालिका पुजा विधी मराठी | hartalika puja vidhi marathi 

हरतालिकेची प्रत्यक्ष पुजा विधी जानुन घेऊया. तर हरतालिकेच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचे आहे. आपले स्नानादिनित्य निवृत्त होऊन स्वच्छ वस्त्र परिधान करावे, पुजास्थळ स्वच्छ करावे, त्याठिकाणी रांगोळी काढवी, तसेच केळीच्या पानाचा मंडप सजवावा,शुशोभत करावे, त्यानंतर एक फुल घ्यावे,ते फूल गंगाजल मध्ये बुडवून संपूर्ण पुजा सामग्रीवर तसेच पुजा स्थळी व स्वत: वरही गंगाजल शिंपडायच आहे. त्यानंतर पाट किंवा चौरंग ठेवून त्यावर वस्त आंथरावे व पाटावर मातीने किंवा वाळूने शिवलिंग सह माता पार्वती तसेच सखींसह प्रतीमा तयार करावी. उजव्या बाजूला श्रीगणेश मुर्त
 किंवा श्रीगणेश स्वरूप सुपारीची स्थापना करावी. सुपारी स्थापणा करण्याआधी त्याखाली आपण तांदूळ ठेवायचे व नंतरच स्थापना करायची आहे. धुप दिप लावावा, कलश स्थापन करायची आहे कलशामध्ये आपल्याला हळकुंड, सुपारी,अक्षता, सिक्का टाकायचा आहे. नंतर त्यांच्यामध्ये पाच आंब्याची पाने ठेवून नारळ ठेवायच आहे व कलश स्थापन करायचा आहे. पुजास्थळी पाच विड्याची पाने ठेवून त्यावर हळकुंड, सुपारी,बदाम,खारीक सिक्का ठेवायचा आहे. 

सर्वात अगोदर स्वत: ला टिळा लावून घ्यायचा आहे. उजव्या हातामध्ये पळीने जल घ्यायचे आहे. ते तीन वेळा आपण आजमन करायचं आहे. त्यावेळी पुन्हा ते जल हातामध्ये घेऊन जमिनीवर सोडायचे आहे.हात स्वच्छ करायचे आहेत. त्यानंतर विड्यांना हळदीकुंकू लाऊन एक एक विडा ठेवायचा आहे.

सर्वप्रथम आपल्याला दिपपुजन व भुमीपुजन करून घ्यायचे आहे. भुमीला हळदीकुंकू लावयच आहे दिपला हळदीकुंकू लावायच आहे त्यांच पुजन करून घ्यायचं आहे. त्यानंतर श्रीगणेशाचे पुजन करायचे आहे. त्यांना पंचामृताने स्नान घालावे व पुन्हा गंगाजलनी स्वच्छ करून पुजा स्थळी स्थापण करायचं आहे. त्यांना हळदकुंकू लावावे, त्यांना केज वश्त्र अर्पण करावे,जानवे अर्पण करावे, त्यांना दुर्वा अर्पण करावे, फुले अर्पण करावे आणि नमस्कार करायचा आहे. त्यानंतर महादेव पार्वती यांचे पुजन करायचे आहे. माता पार्वतीस व संखींस हळदीकुंकू, वस्र, अक्षता अर्पण करायचा आहे. त्यांना गजरे फुल अर्पण करायचे आहेत. त्यांना त्यांची शृगार सामग्री अर्पण करायची आहे व आपण आणलेली जी काही सौभाग्य सामग्री त्यांना अर्पण करायची आहे. त्यानंतर मग भगवान शिव शंकर यांचे पुजन करायचे आहे त्यांना बुका, भस्म,गुलाल, केजवस्र अर्पण करायचे आहेत. त्यांना आवडते पांढरे फूल अर्पण करायचे आहे. त्यानंतर आपण जी पाने आणलेली आहेत ती एक एक करून अर्पण करायची आहेत आणि एक एक पान अर्पण करत असताना आपण ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचं आहे. पाने अर्पण करून झाल्यानंतर आपण फुले अर्पण करायची आहेत.

संपूर्ण पुजन झाल्यानंतर आपण मनोभावे प्रार्थना करायची आहे. भगवान शिव माता पार्वती व श्रीगणेशसमोर आपल्या मनातील ईच्छा प्रकट करायची आहे. तसेच आपल्या या पुजनामध्ये नकळत चुक झाली असेल व काही कमी राहीली असेल तर त्याबद्दल क्षमा प्रार्थना देखील करायची आहे. त्यानंतर संपूर्ण कुटुंबासह कथा पठण वआरती करायची आहे. त्यानंतर खडीसाखरेचा नैवेद्य आपण दाखवू शकता किंवा फळांचा नैवेद्य दाखवून शकता. अशाप्रकारे पुजन संपन्न करायचं आहे व पुजन झाल्यानंतर आपल्याला कमीतकमी 108 वेळा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. तसेच दिवसभर आपण शिवचरित्राचे वाचन करू शकता,शिवमंत्राचा जप करू शकता.



हे सुध्दा वाचा ⤵️


FAQ
Q.1) हरतालिका तृतीय व्रत कधी आलेले आहे ?
Ans. यंदा हे हरतालिका व्रत 30 ऑगस्ट मंगळवार रोजी आलेले आहे.

Q.2) हरतालिका व्रत कधी केले जाते ?
Ans. शाश्त्रानुसार भाद्रपद शुक्ल पक्ष तृतीय तिथीला हरतालिका व्रत केले जाते.

Q.3) हरतालिका व्रत कोणाला समर्पीत केले आहे ?
Ans.हरतालिका हे व्रत भगवान शिव शंकर आणि माता पार्वतीला समर्पीत केले आहे.



टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
  1. Every spin earns you factors toward priceless rewards like food offers, Free Play, promotion entries, special occasion invites, and hotel stays at partner destinations around the world. Enhance your gaming expertise with our first-class service and take your sport to a whole new stage, in a personal setting dedicated to our thecasinosource.com most unique gamers. We supply the premier gaming expertise in Pittsburgh with over sixty five desk games, including craps, blackjack, roulette and lots of|and a lot of} extra of your favorite games in spacious and cozy surroundings. You'll discover a number of} progressive video poker games on the casino ground. For instance, if a computerised slot is designed to have a 97% RTP, the average winnings amount will range around $3 for every $270 wagered.

    उत्तर द्याहटवा

Top Post Ad

Below Post Ad