google-site-verification=mhQXPDL6t29v0SBU3tM2gsf6ieXw2vbDeuweOWGfOg0 स्वातंत्र्य दिन निबंध मराठी २०२२ | independence day essay in marathi 2022
Type Here to Get Search Results !

स्वातंत्र्य दिन निबंध मराठी २०२२ | independence day essay in marathi 2022

 स्वातंत्र्य दिन निबंध मराठी २०२२ | १५ ऑगस्ट निबंध मराठी २०२२ | independence day essay in marathi 2022 | 15 August independence day nibandh marathi | swatantra diwas nibandh marathi 2022 | स्वातंत्र्य दिन १५ ऑगस्ट मराठी निबंध 

स्वातंत्र्य दिन निबंध मराठी २०२२ :- नमस्कार मित्रांनो आज आपण १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन निबंध मराठी बघणार आहोत. स्वातंत्रता दिवसाच्या निमित्ताने संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात झेंडावंदन कार्यक्रम आयोजित केला जातो. १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व शासकीय शाळांमध्ये विविध उपक्रम राबविले जातात जसे की निबंध स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, रांगोळी स्पर्धा ईत्यादी. म्हणुनच आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत अतिशय सुंदर निबंध मराठी व हा निबंध तुम्ही शेवटपर्यंत वाचावा ही नम्र विनंती.

स्वातंत्र्य दिन निबंध मराठी | independence day essay in marathi 2022

१५ ऑगस्ट हा दिवस भारतीय इतिहासातील अत्यंत महत्वाचा दिवस आहे. या दिवशी १५ ऑगस्ट १९४७ रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक शूरवीरांनी अथक परिश्रम घेतले. महात्मा गांधीजी, पंडित नेहरू, लोकमान्य टिळक, सरदार वल्लभभाई पटेल, सुभाषचंद्र बोस, राणी लक्ष्मीबाई अशा अनेक शूर स्वातंत्र्य वीरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले जीवन समर्पित केले. भगतसिंग सारखे थोर क्रांतिकारक हसत-हसत फासावर चढले. इंग्रजांच्या जुलमी अत्याचारास कंटाळून भारतीयांनी संघटित होऊन बंड पुकारले.

गांधीजींच्या अहिंसावादी विचारसारणीतून सविनय कायदेभंग करण्यात आला. भारत छोडो' आंदोलन छेडण्यात आले. अनेक चळवळी, उठाव, सत्याग्रह, आंदोलने यातून इंग्रजांना स्वातंत्र्य वीरांनी जेरीस आणले. अखेर शूर वीरांच्या त्यागातून तसेच बलिदानातून आपला भारत देश स्वतंत्र झाला.

१५ ऑगस्ट हा भारताचा एक महत्वाचा राष्ट्रीय सण आहे. या दिवशी दिल्लीच्या लाल किल्यावर पंतप्रधानाच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकवला जातो. सर्व शाळा,महाविद्यालये व कार्यालयामध्ये ध्वजारोहण व ध्वजवंदन घेतले जाते. राष्ट्रगीत गायले जाते. देशभरात आनंदी व उत्साही वातावरण असते: दूरदर्शन तसेच सोशल मीडीयाद्वारे देशभक्तीपर गाणी, देशभक्तीपर चित्रपट इ. प्रसारित केले जते.

भारत देश आपली मातृभूमी आहे. ती अनेक शूर वीरांच्या कर्तृत्वाने स्वतंत्र झाली आहे. हे प्रत्येक भारतीयाने सदैव स्मरणात ठेवून आपल्या देशाला सर्व क्षेत्रात प्रगतीपथावर नेण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.




हे सुध्दा वाचा ⤵️


FAQ
Q.1) भारताला स्वातंत्र्य कधी मिळाले ?
Ans. भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले.

Q.2) भारतला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी कोणकोणत्या शुरविराचा सहभाग होता ?
Ans.महात्मा गांधीजी, पंडित नेहरू, लोकमान्य टिळक, सरदार वल्लभभाई पटेल, सुभाषचंद्र बोस, राणी लक्ष्मीबाई अशा अनेक शूर स्वातंत्र्य वीरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले जीवन समर्पित केले.

Q.3) भारताला स्वातंत्र्य मिळून किती वर्ष पूर्ण झाली आहेत ?
Ans.भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाली आहेत.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad