google-site-verification=mhQXPDL6t29v0SBU3tM2gsf6ieXw2vbDeuweOWGfOg0 स्वातंत्र्य दिन कविता मराठी २०२२ | Independence day poem in marathi
Type Here to Get Search Results !

स्वातंत्र्य दिन कविता मराठी २०२२ | Independence day poem in marathi

 स्वातंत्र्य दिन कविता मराठी २०२२ | 15 ऑगस्ट कविता मराठी pdf | Independence day poem in marathi | 15 August kavita marathi | swatantra din kavita marathi pdf

स्वातंत्र्य दिन कविता मराठी २०२२

स्वातंत्र्य दिन कविता मराठी २०२२ :- नमस्कार मित्रांनो आज आपण १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त अतिशय सुंदर कविता मराठी बघणार आहोत. स्वातंत्र्य दिन कविता मराठी तुम्हाला शालेय जीवनात विविध प्रकारच्या स्पर्धासाठी उपयोगी पडेल. तरी तुम्ही खालील लेखात दिलेली सर्व स्वातंत्र्य दिन कविता तुम्ही शेवटपर्यंत वाचावी ही नम्र विनंती.

स्वातंत्र्य दिन कविता मराठी २०२२ | 15 August independence day poem in marathi

               सुंदर-सुंदर माझा देश.... 
            सगळ्यात वेगळा माझा देश..

             जग ज्याच्यावर गर्व करेल...
              असा अनोखा माझा देश.

                चांदी सोने माझा देश.....
            सुजलाम सुफलाम माझा देश.

                गंगा-यमुनेच्या माळेचा...
                फुलांसारखा माझा देश.

                प्रगती करेल माझा देश.....
              नियमित खुशाल माझा देश.

               इतिहासामध्ये नाव करेल......
                असा महान माझा देश.

 स्वातंत्र्य दिन कविता मराठी ( swatantra din kavita marathi)

 तिरंगा :-

प्रतिक सिद्धतेचा, शांततेचा, विजयाचा
प्राणाहून प्रिय माझा तिरंगा...

शूर वीरांच्या कर्तबगारीचा.
तिरंगा माझा, मी तिरंग्याचा....

देशप्रेम मनात झळकवी
बंधुभाव जगा शिकवी,

एकात्मतेचे बीज रुजवे
तिरंगा माझा.... अवघ्या जगात मिरवे..

सर्वधर्म समभाव मानतो तिरंगा,
भारत शांती, सत्य, अहिंसा जाणतो तिरंगा..

डौलात जगी फडकतो तिरंगा,
अभय लढाया वीरा देत असे तिरंगा.....

प्राणाहून प्रिय मला.
माझा तिरंगा... माझा तिरंगा....


स्वातंत्र्य दिन कविता मराठी (swatantra din kavita marathi)

शहीद जाहले अनेक शूरवीर रक्षण करण्या भारत भूमीचे, मुळीच नाही विसरू आपण 'बलिदान या क्रांतिवीरांचे ॥

चंदन करूच्या त्या लढवय्यांना जे लढले स्वातंत्र्यासाठी, भाऊया राष्ट्रगान आपल्या भारत मातेसाठी !!

विविधतेने नटलेला माझा भारत देश महान, विविधतेतही एकता हीच खरी भारताची शान ॥

भूमीवर या वाहे पवित्र यमुना आणि गंगा, 
उंच आकाशी फडकत राहे आमचा प्रिय तिरंगा ॥

स्वतंत्रता दिवस आहे भारताच्या विजयाचा, 
गर्व आहे मला मी भारतीय असल्याचा !!



हे सुध्दा वाचा ⤵️


FAQ
Q.1) स्वातंत्र्य दिन कधी आहे ?
Ans. स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्टला आहे.

Q.2) भारताला स्वातंत्र्य कोणत्या साली मिळाले ?
Ans. भारताला स्वातंत्र्य १५ ऑगस्ट १९४७ या साली मिळाले.

Q.3) भारताचा १५ ऑगस्ट २०२२ हा कितवा स्वातंत्र्य दिन आहे ?
Ans. भारताचा १५ ऑगस्ट २०२२ हा ७६ वा स्वातंत्र्य दिन आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad