google-site-verification=mhQXPDL6t29v0SBU3tM2gsf6ieXw2vbDeuweOWGfOg0 जागतिक आदिवासी दिन भाषण निबंध मराठी माहिती | jagtik adivasi din bhashan marathi pdf
Type Here to Get Search Results !

जागतिक आदिवासी दिन भाषण निबंध मराठी माहिती | jagtik adivasi din bhashan marathi pdf

 जागतिक आदिवासी दिन भाषण निबंध मराठी माहिती | jagtik adivasi din bhashan marathi pdf | jagtik adivasi din speech essay in marathi | जागतिक आदिवासी दिन मराठी माहिती 

जागतिक आदिवासी दिन भाषण निबंध मराठी माहिती

जागतिक आदिवासी दिन २०२२ :- नमस्कार मित्रांनो आज ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन यानिमित्ताने आपण भाषण निबंध मराठी माहिती बघणार आहोत.
जागतिक आदिवासी दिन भाषण तुम्हाला तुमच्या शालेय जीवनात नक्की उपयोगी पडेल तरी तुम्ही जागतिक आदिवासी दिन भाषण शेवटपर्यंत वाचावे ही नम्र विनंती.

जागतिक आदिवासी दिन भाषण निबंध मराठी | Jagtik adivasi din bhashan marathi


                  जंगलाचा मी रहिवासी
                   नातं माझं निसर्गाशी, 
               झाडे, वेली, पशू-पक्षी सारे 
                   आहेत माझे मित्र खरे, 
                     मंजुळ पावरी वाजे 
             आम्ही आहोत जंगलाचे राजे !!

नमस्कार मित्रांनो,
आज ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन. सर्वप्रथम माझ्या सर्व आदिवासी बांधवांना आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

9 ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी जगभरात आदिवासी बांधव एकत्र येऊन आपापल्या संस्कृती प्रमाणे वेशभूषा, गायन, नृत्य करून हा दिवस साजरा करतात. मानवाची जसजशी उत्क्रांती होत गेली तसतसा मानव पृथ्वीवर निरनिराळ्या खंडापर्यंत प्रवास करू लागला. तेथील वातावरणाशी त्याने जुळवून घेतले. हळूहळू शब्द, बोली आणि पुढे भाषा,संवाद अशी उत्क्रांती होत गेली. आजही जगाच्या कानाकोपऱ्यात अनेक आदिम जमाती आपली बोलीभाषा, रुढी परंपरा जपत निसर्गाच्या सानिध्यात राहत आहेत. आधुनिक दुनियेच्या झगमगटापासून आजही अनेक लोक कोसो दूर आहेत. अनेक वर्षांनंतर संयुक्त राष्ट्रसंघासमोर जी बाब समोर आली ती अतिशय धक्कादायक होती. ती बाब म्हणजे जगातील अनेक मूळ निवासी समुहांनी निसर्ग  जपण्याचे मोलाचे कार्य केले. परंतु आधुनिक समाजाच्या मुख्य प्रवाहात येऊ न शकल्यामुळे या आदिम जमाती शिक्षण, आरोग्य, रोजगार व इतर अनेक सोयीसुविधा पासून वंचीत राहिले आहेत. या गोष्टींचे गांभीर्य लक्षात घेऊन संयुक्त राष्ट्र संघाने 9 ऑगस्ट 1994 या दिवशी जागतिक आदिवासी दिवस म्हणजेच International Day of Indigenous People घोषित केला.

तेव्हापासून जगभरातील आदिवासी बांधवांना मूलभूत सुविधा व त्यांचे हक्क मिळावे यासाठी जागतिक स्तरावर प्रयत्न सुरू झाले. भारतात मात्र संविधानानुसार 1950 पासूनच आदिवासी जमातींच्या विकासाची भूमिका समोर ठेवून तरतूद करण्यात आली होती. संविधानामधील सर्वाधिक अनुच्छेद आदिवासी समाजाच्या हीत रक्षणासाठी आहेत. आदिवासी समाजाची एक स्वंतत्र जीवनशैली, रुढी, प्रथा, परंपरा आणि सामाजिक कायदे आहेत. अनेक ठिकाणी स्वशासनावर आधारित अशी समाजव्यवस्था अस्तित्वात होती. मात्र ब्रिटिश राजवटीत जमीन व जंगलावरील त्यांचा हक्क हिरावला गेला व त्यांच्या स्वयंपूर्ण समाजव्यवस्थेवर याचा प्रतिकूल परिणाम झाला. त्यामुळे त्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. आदिवासी समाजाला आपले हक्क व न्याय मिळवून देण्यासाठी पेसा कायदा अस्तित्वात आला आहे. पेसा कायद्याचे प्रमुख सूत्र आदिवासींची संस्कृती, प्रथा परंपरा याचे जतन, संवर्धन करणे व ग्रामसभेच्या माध्यमातून आदिवासी बांधवांची स्वशासन व्यवस्था बळकट करणे हे आहे.

जागतिक आदिवासी दिन भाषण मराठी https://youtu.be/oNxWmWxQahY



हे सुध्दा वाचा ⤵️


FAQ
Q.1) जागतिक आदिवासी दिन कधी साजरा केला जातो ?
Ans. जागतिक आदिवासी दिन ९ ऑगस्टला साजरा केला जातो.

Q.2) जागतिक आदिवासी दिन आदिवासी बांधव कसा साजरा करतात ?
Ans.जागतिक आदिवासी दिन जगभरातील  आदिवासी बांधव एकत्र येऊन आपापल्या संस्कृती प्रमाणे वेशभूषा, गायन, नृत्य करून हा दिवस साजरा करतात.

Q.3) संयुक्त राष्ट्र संघाने जागतिक आदिवासी दिन कधी घोषित केला ?
Ans. संयुक्त राष्ट्र संघाने 9 ऑगस्ट 1994 या दिवशी जागतिक आदिवासी दिवस म्हणजेच International Day of Indigenous People घोषित केला.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad