google-site-verification=mhQXPDL6t29v0SBU3tM2gsf6ieXw2vbDeuweOWGfOg0 शिक्षक दिन भाषण मराठी pdf | teachers day speech in marathi
Type Here to Get Search Results !

शिक्षक दिन भाषण मराठी pdf | teachers day speech in marathi

 शिक्षक दिन भाषण मराठी pdf | teachers day speech in marathi  | 5 सप्टेंबर शिक्षक दिन भाषण मराठी | teachers day bhashan marathi pdf | शिक्षक दिन मराठी भाषण pdf | 5 suptember teachers day speech in marathi

शिक्षक दिन भाषण मराठी pdf

शिक्षक दिन २०२२ :- नमस्कार मित्रांनो आज आपण 5 सप्टेंबर रोजी साजरा होणारा दिवस म्हणजे शिक्षक दिन याबद्दल अतिशय सोपे भाषण बघणार आहोत.
शिक्षक दिन भाषण मराठी तुम्हाला शालेय जीवनात विविध प्रकारच्या स्पर्धासाठी नक्की उपयोगी पडेल तरी तुम्ही खालील लेखात दिलेले शिक्षक दिन भाषण शेवटपर्यंत वाचावे ही नम्र विनंती.

शिक्षक दिन भाषण मराठी pdf | teachers day speech in marathi 


               शिक्षक म्हणजे एक समुद्र.......
                 ज्ञानाचा, पावित्र्याचा, 
                एक आदरणीय कोपरा,
              प्रत्येक व्यक्तीच्या मनातला......

शिक्षक:- अपूर्णाला पूर्ण करणारा......
शिक्षक:- शब्दांनी ज्ञान वाढविणारा
शिक्षक:- जगण्यातुन जीवन घडवणारा
शिक्षक:- तत्त्वातुन मुल्ये फुलवणारा...

माझ्या आयुष्याला आकार, आधार आणि अमर्यादित ज्ञान देणाऱ्या प्रत्येक गुरूवर्यास शतशः नमन.......
मित्रांनो,

           "शिकवता शिकविता आपणास
                  आकाशाला गवसणी
               घालण्याचे सामर्थ्य देणारे
             आदराचे स्थान म्हणजे आपले......."
                         शिक्षक

५ सप्टेंबर... म्हणजे शिक्षक दिन. प्रथमतः आई या गुरूला नंतर... माझ्या वडील या गुरूंना आणि ज्यांनी माझं भविष्य घडविले... त्या तमाम शिक्षकरूपी
देवांना नमन करून मी माझ्या भाषणास सुरुवात करतो.

                "चिखलातला जन्मही
                 सुंदर सार्थकी लावावा,
                 निसर्गासारखा शिक्षक
                  प्रत्येकाला मिळावा. "

भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन
यांचा ५ सप्टेंबर रोजी जन्मदिन 'शिक्षक दिन' म्हणून साजरा करण्यात येतो. 'शिक्षक' हा भावी पिढीचा शिल्पकार असून त्यांच्याकडूनच आपल्याला ज्ञान
व जगाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी मिळत
असते. आपल्या गुरू, शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त
करण्याचा हा दिवस.
                असं म्हणतात की,
                        एक पुस्तक,
                        ए एक पेन,
                       एक विद्यार्थी,
                   आणि एक शिक्षक,
               हे संपूर्ण जग बदलू शकतात.....

शिक्षक म्हणजे,
आयुष्याला कलाटणी देणारी प्रेरणा,ध्येयपूर्तीसाठी मार्ग दाखवणारी दिशा,कधी बिकट परिस्थितीत, प्रेमाची साथ,तर कधी कौतुकांचे गोड शब्द तर कधी हातावर बसणारा छडीचा मार.

शिक्षक म्हणजे,
चांगले संस्कार करणारी मूर्ती,
संकटकाळात धैर्य देणारी स्फूर्ती,
चारित्र्यपूर्ण विद्यार्थी घडवणारा शिल्पकार,
जादूची छडी जी करते विद्यार्थ्यांची स्वप्ने साकार.

शिक्षक म्हणजे,
सखोल मूलभूत ज्ञानाचे भांडार,
दूर करी जीवनातील अज्ञानमय अंधार,
अन्यायाविरुध्द आवाज उठविणारी तलवार,
अनुभवातून निर्माण होणारा साक्षात्कार,
असे हे शिक्षकांचे आजन्म न फिटणारे उपकार.



5 सप्टेंबर शिक्षक दिन भाषण मराठी | 5 suptember teachers day speech in marathi

आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, व्यासपीठावर विराजमान झालेले माझे सर्व वंदनीय शिक्षक व पुढे बसलेल्या माझ्या मित्र - मैत्रिनींनो. आज मी तुम्हाला शिक्षक दिनाविषयी माहिती सांगणार आहे ती तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावी.
                     गुरुविन न मिळे ज्ञान 
               ज्ञानाविन न होई जगी सन्मान 
                   जीवन भवसागर तराया 
                       चला वंदू गुरुराया...

मित्रांनो, शिक्षकाचे महत्त्व प्रत्येकाच्या जीवनात असते. आई- वडील आपल्याला जन्म देतात, परंतु शिक्षक आपल्याला जगाची ओळख करून देतात. चांगल्या प्रकारे जीवन जगण्यासाठी ते आपल्याला ज्ञानाची आणि संस्काराची शिदोरी देतात. त्या शिदोरीवरच आपण आपल्या आयुष्यात यशाची उत्तुंग शिखरे सहजपणे सर करू शकतो. म्हणूनच मला म्हणावेसे वाटते...

           ज्योत पेटवण्यासाठी समईत हवी वात,
         चांदणं पाहण्यासाठी आकाशात हवी रात्र, 
                   ध्येय कठीण गाठण्यासाठी, 
                    पाहिजे शिक्षकांची साथ......

मित्रहो, देव आणि गुरु आपल्यासमोर एकत्र आले, तर सर्वप्रथम आपण गुरुंच्या पायांना स्पर्श केला पाहिजे. गुरुंचे महत्त्व आपल्या देवापेक्षाही जास्त आहे. आपण शिक्षकांना आवडेल असे वागले पाहिजे, आपण त्यांचा आदर केला पाहिजे. शिक्षक हा मेणबत्तीसारखा असतो, जो जो स्वतःला पेटवतो आणि विदयार्थ्यांना प्रकाशमान, तेजोमय करतो.

मित्रांनो, या शिक्षक दिनाला आपण सर्वजण एक संकल्प करूया. सर्व शिक्षकांच्या आज्ञेचे आम्ही पालन करू व आजन्म त्यांचा आदर राखू. 
आम्ही असे वर्तन करू की आमच्या वर्तनाने आमच्या शिक्षकांची सदैव ताठ राहील.

शिक्षक दिन १० ओळी भाषण मराठी | 10 lines on teachers'day marathi


गुरुर्ब्रम्हा, गुरुविष्णु, गुरुर्देवो महेश्वर: ।
गुरुसाक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवैनमः ॥

१. सूर्याप्रमाणे तेज दिसणारे व्यासपीठ, चंद्राप्रमाणे शितल छाया देणारे परीक्षक आणि चांदण्याप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या मित्र-मैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार !

२. आज ५ सप्टेंबर हा दिवस आपण दरवर्षी शिक्षक दिन म्हणून मोठया उत्साहात साजरा करतो.

३. ५ सप्टेंबर हा दिवस डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस आहे.

४. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे तत्वज्ञ, शिक्षक व उत्तम लेखक होते.

५. तसेच ते आपल्या भारताचे दुसरे राष्ट्रपत्ती होते.

६. त्यांनी शिक्षण क्षेत्रात मोलाचे कार्य केले म्हणून त्यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.

७. शिक्षक दिनादिवशी सर्व शिक्षकांचा सन्मान केला
जातो.

८. शिक्षक विद्यार्थ्यातील कला-कौशल्ये विकसित
करायला मदत करतात.

९. समाजाची भावी पिढी घडवण्यासाठी शिक्षक हे प्रमुख आधारस्तंभ मानले जातात.

१०. हा दिवस आपल्या गुरू, शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असतो.
धन्यवाद!


हे सुध्दा वाचा ⤵️

FAQ
Q.1) शिक्षक दिन कधी साजरा केला जातो ?
Ans. शिक्षक दिन 5 सप्टेंबरला साजरा केला जातो.

Q.2) शिक्षक दिन कोणत्या महान व्यक्तीच्या जन्मदिनी साजरा केला जातो ?
Ans. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा ५ सप्टेंबर रोजी जन्मदिन 'शिक्षक दिन' म्हणून साजरा करण्यात येतो. 

Q.3) शिक्षक दिन का साजरा केला जातो ?
Ans. आपल्या गुरू, शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शिक्षक दिन साजरा केला जातो.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad