Type Here to Get Search Results !

रक्षाबंधन निबंध मराठी माहिती | Rakshabandhan Essay In Marathi

 रक्षाबंधन निबंध मराठी माहिती | रक्षाबंधन १० ओळी मराठी निबंध pdf|Rakshabandhan Essay In Marathi | Rakshabandhan nibandh marathi mahiti | 10 lines on rakshabandhan marathi

रक्षाबंधन निबंध मराठी माहिती

रक्षाबंधन निबंध मराठी २०२२ :- नमस्कार मित्रांनो आज आपण ११ ऑगस्ट २०२२ वार गुरुवार या दिवशी येणारा सण म्हणजेच रक्षाबंधन याविषयी अतिशय सुंदर सोपा निबंध बघणार आहोत. रक्षाबंधन निबंध तुम्हाला शालेय जीवनात नक्की उपयोग पडेल व हा निबंध तुम्ही शेवटपर्यंत वाचावा ही नम्र विनंती.

रक्षाबंधन निबंध मराठी | Rakshabandhan essay in marathi 

रक्षाबंधन हा हिंदू धर्मातील एक प्रमुख सण आहे. हा सण भाऊ बहिणीच्या प्रेमाचा सण असतो. या दिवशी बहीण आपल्या भावाला रक्षासूत्र, म्हणजेच राखी बांधते आणि भावाची प्रगती व सुखी आयुष्यासाठी प्रार्थना करते. भावाकडून पण बहिणीला संरक्षणाचे वचन दिले जाते. राखीच्या या सणाला संपूर्ण भारतात साजरा करतात.

भारतासह नेपाळ व अन्य ज्या ज्या ठिकाणी हिंदू धर्माला मानणारे लोक राहतात तेथे साजरे केले जाते. रक्षाबंधन या सणाला प्राचीन काळापासून साजरे केले जात आहे. अनेक धार्मिक ग्रंथांमध्ये रक्षाबंधनच्या उल्लेख केला आहे. आजकाल रक्षाबंधनच्या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या घरी राखी व मिठाई घेऊन जातात. राखी बांधल्या नंतर भाऊ आपल्या बहिणीला ओवाळणी म्हणून काही पैसे किंवा उपहार भेट देतो. अश्या पद्धतीने एक दुसऱ्याला वस्तू दिल्याने भाऊ बहिणी मध्ये प्रेम वाढते.

 रक्षाबंधनच्या दिवशी सर्वजण नवे कपडे परिधान करतात. सर्वांचे मन आनंदाने भरुन जाते. रक्षाबंधनाच्या एक दिवस आधी बहिणी बाजारात जाऊन चांगल्या प्रकारच्या राख्या भावांसाठी खरेदी करतात. भाऊ सुद्धा बहिणीसाठी काहीतरी उपहार विकत आणतात. रक्षाबंधन हा बहीण भावाचे प्रेम टिकवून ठेवण्याचा सण आहे. हिंदू धर्मात असे अनेक सण परंपरा फार पूर्वी पासून सुरु आहेत.
ह्या परंपरा आपल्या संस्कृतीचा भाग आहेत आणि रक्षाबंधन देखील त्यातील आज एक सुंदर परंपरा आहे. म्हणूनच माझा आवडता सण रक्षाबंधन आहे.

      रक्षाबंधनाचा सण प्रत्येक वर्षी श्रावण पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. हा सण भाऊ-बहिणीचे प्रेम आणि कर्तव्याच्या प्रतीक असतो. या दिवशी बहिणी आपल्या भावांना राखी बांधतात. भाऊ देखील बहिणीला सदैव संरक्षणाचे वचन देतो. रक्षाबंधनाचा आपल्या देशात प्राचीन काळापासून साजरा केला जात आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणी सकाळी लवकर अंघोळ करून पूजेचे ताट सजवतात, पूजेच्या ताटात कुंकू, राखी, अक्षदा, दिवा, मिठाई इत्यादी वस्तू ठेवल्या जातात. त्यानंतर घराच्या पूर्व दिशेला भावाला बसवून त्याची आरती ओवाळली जाते, डोक्याला कुंकू व अक्षदा लाऊन बहीण भावाला राखी बांधते आणि शेवटी गोड मिठाई खाऊ घातली जाते. भाऊ सुद्धा बहिणीला मिठाई खाऊ घालतो व बहिणीसाठी आणलेले उपहार तिला भेट देतो. 

पूर्वीच्या वेळी रक्षाबंधन अतिशय सात्विक पूजा पद्धतीने साजरी केली जायची. परंतु आता वेळेच्या अभावाने पूजा पद्धतीत बदल केलेले आहेत. आता लोक पूर्वीपेक्षा या सणात कमी सक्रिय होतात. दूर राहणाऱ्या बऱ्याच बहिणी रक्षाबंधनच्या दिवशी भावाला कुरियरने राखी पाठवून देतात. याशिवाय मोबाईल वर राखी पाठवून सुद्धा रक्षाबंधनच्या शुभेच्छा देखील दिल्या जातात. स्वतःला मॉर्डन दाखवण्यासाठी आपण आपली संस्कृती विसरत आहोत. आपण आपल्या पूजा पद्धती मध्ये बदल केलेला आहे. जर आपल्याला भारतीय संस्कृतीचे रक्षण करावयाचे तर जुन्या पद्धती अनुसार सण-उत्सव साजरे करायला हवे. रक्षाबंधनच्या पवित्र सणाचे महत्व लक्षात घेऊन त्याला योग्य रीतीने साजरे करायला हवे.



रक्षाबंधन १० ओळी मराठी निबंध | 10 lines on rakshabandhan marathi


१) रक्षाबंधन हा हिंदू उत्सवांपैकी एक महत्वाचा सण आहे.

२) रक्षाबंधन हा भाऊ बहिणीच्या पवित्र बंधनाचा सण मानला जातो.

३ ) रक्षाबंधन या दिवसाला नारळी पौर्णिमा असे ही संबोधले जाते.

४ ) रक्षाबंधनाचा सण श्रावण पौर्णिमेला म्हणजेच इंग्रजी दिनदर्शिकेप्रमाणे ऑगस्ट महिन्यात साजरा केला जातो.

५) समाजामध्ये लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो.

६) रक्षाबंधन दिवशी बहिण भावाच्या हाताला राखी बांधते आणि त्याचे औक्षण करते.

७) भाऊ बाह्य शत्रुंपासून व अंतर्विकारांपासून सुरक्षित राहो आणि त्याला दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना बहिण या दिवशी करते.

८) समाजात बहिण ताठ मानेने वागावी आणि तिच्या संरक्षणाची जबाबदारी भाऊ घेतो.

९) राखीचा धागा हा नुसता सुताचा दोरा नसुन ते एक शील, स्नेह, सतत संयमी ठेवणारे बंधन आहे.

१०) या दिवशी घरोघरी गोड नारळी भात करण्याची प्रथा आहे.


हे सुध्दा वाचा ⤵️

FAQ
Q.1) रक्षाबंधन २०२२ कधी आहे ?
Ans. रक्षाबंधन ११ ऑगस्ट २०२२ वार गुरुवार या दिवशी आहे.

Q.2) रक्षाबंधन कधी साजरा केला जातो ?
Ans. रक्षाबंधनाचा सण श्रावण पौर्णिमेला म्हणजेच इंग्रजी दिनदर्शिकेप्रमाणे ऑगस्ट महिन्यात साजरा केला जातो.

Q.3) रक्षाबंधन म्हणजे काय ?
Ans. रक्षाबंधन हा सण भाऊ बहिणीच्या प्रेमाचा सण असतो. या दिवशी बहीण आपल्या भावाला रक्षासूत्र, म्हणजेच राखी बांधते आणि भावाची प्रगती व सुखी आयुष्यासाठी प्रार्थना करते. भावाकडून पण बहिणीला संरक्षणाचे वचन दिले जाते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad