Type Here to Get Search Results !

श्रीकृष्ण जन्माष्टमी निबंध मराठी माहिती | shri krishna janmashtami essay marathi

 श्रीकृष्ण जन्माष्टमी निबंध मराठी माहिती | shri krishna janmashtami essay marathi | कृष्ण जन्माष्टमी मराठी निबंध २०२२ | shri krishna janmashtami nibandh marathi pdf

श्रीकृष्ण जन्माष्टमी २०२२ :- नमस्कार मित्रांनो आज आपण 18 ऑगस्टला येणारा सण म्हणजे श्रीकृष्ण जन्माष्टमीचा अतिशय सुंदर निबंध मराठीतून बघणार आहोत. श्रीकृष्ण जन्माष्टमीचा निबंध तुम्हाला शालेय जीवनात निबंध लेखन स्पर्धेत नक्की उपयोगी पडेल. खालील लेखात दिलेला श्रीकृष्ण जन्माष्टमी निबंध तुम्ही शेवटपर्यंत वाचावा ही नम्र विनंती.

श्रीकृष्ण जन्माष्टमी निबंध मराठी माहिती | Shri Krishna Janmashtami essay in marathi

               दह्यात साखर साखरेत भात 
                 उंच दहिहंडी उभारून 
                 देऊ एकमेकांना साथ 
   जोशात साजरा करू श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण"


श्रीकृष्ण जन्माष्टमी हा भारतातील एक महत्त्वाचा सण आहे. या सणाला आपण गोकुळाष्टमी असेही म्हणतो. दरवर्षी हा सण भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला साजरा केला जातो.

भगवान श्रीकृष्ण हे भगवान विष्णूंचा अवतार मानले जातात. श्रीकृष्ण हे माता देवकी व पिता वासुदेव यांचे आठवे पुत्र होते. श्रीकृष्ण जन्मदिवसाचे स्मरण म्हणून ही जन्माष्टमी मोठया आनंदाने साजरी केली जाते.

त्या काळी मथुरेचा राजा कंस हा खूप अत्याचारी व अन्यायी होता. त्याला एकदा अशी आकाशवाणी झाली होती की, त्याची बहीण देवकी हिचा आठवा पुत्र त्याचा वध करेल. म्हणून कंसाने देवकी व वासुदेवला बंदी बनवून अंधार कोठडीत ठेवले. कंसाने देवकीच्या सात मुलांना मारले. देवकीला जेंव्हा आठवा पुत्र जन्मला, तेंव्हा भगवान विष्णूंनी वासुदेवला असा आदेश दिला की, या पुत्राला नंदाच्या घरी ठेव. त्यानुसार वासुदेवने आपल्या आठव्या पुत्राला यशोदा माता व नंद बाबा यांच्या घरी सुरक्षित ठेवले.

श्रीकृष्ण जन्माष्टमी दिवशी सर्वत्र भक्तीमय वातावरण असते. श्रीकृष्णांची सर्व मंदिरे सजवली जातात. यादिवशी लोक रात्रभर जागरण करतात. सर्वत्र श्रीकृष्णाचे भजन व कीर्तन केले जाते. जन्माष्टमी नंतर दुसऱ्या दिवशी गोपाळ काला असतो. या दिवशी दहीहांडी कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. 

श्रीकृष्ण जन्माष्टमी हा सण सर्वांना आनंद व उत्साह देतो. हा सण वाईट परिस्थिती असताना देखील यश कसे मिळवावे याची शिकवण देतो.



श्रीकृष्ण जन्माष्टमी १० ओळींचा मराठी निबंध | shri krishna janmashtami nibandh marathi

              राधेची भक्ती, बासरीची गोडी 
      लोण्याचा स्वाद, सोबतीला गोपिकांचा रास ,
                    मिळून साजरा करू 
          श्रीकृष्ण जन्माष्टमीचा दिवस खास."

1) श्रावण महिन्यात वध्य अष्टमी या तिथीला भगवान श्रीकृष्ण यांचा जन्म मथुरेमध्ये माता देवकी व पिता वासुदेव यांच्या पोटी कंसाच्या कारागृहात झाला.

2) भगवान श्रीकृष्ण जन्माचा दिवस आपण सर्वजण श्रीकृष्ण जन्माष्टमी किंवा गोकुळाष्टमी म्हणून साजरा करतो.

3) भगवान श्रीकृष्ण हे भगवान विष्णूचा आठवा अवतार होते.

4) माता यशोदा व पिता नंद हे भगवान श्रीकृष्णाचे पालनकर्ते होते.

5) भगवान श्रीकृष्ण यांचे बालपण गोकुळात गेले.

6) भगवान श्रीकृष्णांनी जीवनामध्ये अनेक लोकोत्तर असामान्य गोष्टी केल्या.

7) कंसाचा वध केला, जरासंधाला ठार मारले, पुतणा राक्षसि णीला भुईवर लोळविले, कालिया नागाच्या फणीवर नृत्य केले, गोकुळवासींच्या रक्षणासाठी करंगळीवर गोवर्धन पर्वत तोलून धरला इत्यादी.

8) भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी लोक उपवास करतात. रात्री बारा वाजता श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करतात.

9) श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडी बांधली जाते. 'गोविंदा आला रे आला' म्हणत ढोल, लेझीमच्या गजरात मानवी मनोरा करून गोविंदांची म्हणजेच गोपालांची पथके दहीहंडी फोडतात.

10) कृष्ण जन्माष्टमी हा आनंद, भक्ती, प्रेम, करुणा आणि सर्वधर्मसमभाव या भावनांचे मिश्रण असलेला उत्सव भारतात सर्वन उत्साहात व जल्लोषात साजरा केला जातो. हा सण नैराश्यातून उत्साहाकडे, तिमिराकडून् तेजाकडे, अधर्माकडून धर्माकडे जाण्याची प्रेरणा देतो.

           कृष्णाच्या भक्तीत होऊन जाऊ दंग 
        मात्र अतिउत्साहात करू नका नियमभंग."



हे सुध्दा वाचा ⤵️


FAQ
Q.1) श्रीकृष्ण जन्माष्टमी कधी आहे ?
Ans. श्रीकृष्ण जन्माष्टमी 18 ऑगस्ट 2022 वार गुरुवार रोजी आहे.

Q.2) श्रीकृष्णाचा जन्म कधी झाला ?
Ans. श्रावण महिन्यात वध्य अष्टमी या तिथीला भगवान श्रीकृष्ण यांचा जन्म मथुरेमध्ये माता देवकी व पिता वासुदेव यांच्या पोटी कंसाच्या कारागृहात झाला.

Q.3) श्रीकृष्ण हे भगवान विष्णूंचे कितवे अवतार आहेत ?
Ans. श्रीकृष्ण हे भगवान विष्णूंचे आठवे अवतार आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad