google-site-verification=mhQXPDL6t29v0SBU3tM2gsf6ieXw2vbDeuweOWGfOg0 श्रीकृष्ण जन्माचा पाळणा | श्रीकृष्णाचा पाळणा मराठी माहिती | shri krishna janmacha palna marathi pdf
Type Here to Get Search Results !

श्रीकृष्ण जन्माचा पाळणा | श्रीकृष्णाचा पाळणा मराठी माहिती | shri krishna janmacha palna marathi pdf

 श्रीकृष्ण जन्माचा पाळणा | श्रीकृष्णाचा पाळणा मराठी माहिती | shri krishnacha palna marathi pdf | Krishna Janmashtami 2022 | जन्माष्टमी पाळणा मराठी | गोकुळाष्टमी २०२२ 

श्रीकृष्ण जन्माचा पाळणा

श्रीकृष्ण जन्माष्टमी २०२२ :- नमस्कार मित्रांनो आज आपण श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्ताने श्रीकृष्णाचा पाळणा मराठीतून बघणार आहोत. श्रीकृष्ण जन्माष्टमीचा पाळणा तुम्ही शेवटपर्यंत वाचावा ही नम्र विनंती.

श्रीकृष्णाचा पाळणा मराठी | श्रीकृष्ण जन्माचा पाळणा | shri krishnacha palna marathi 


पहिल्या दिवशी जन्मले बाळ 
कळस सोन्याचा देते डहाळ 
कृष्ण जन्मला कंसाचा काळ 
जो बाळा जो जो रे जो ।।

दुसऱ्या दिवशी दुसरा रंग 
जसारूप सावळे गोरस रंग 
झळकतो आरस्याचा भिंग 
जो बाळा जो जो रे जो ।।

तिसऱ्या दिवशी आनंद मोठा
सांता - सावित्री बायांनो उठा
खारीक खोबरं, साखर वाटा
जो बाळा जो जो रे जो ।।

चवथ्या दिवशी बोलली बाई 
अनुसयने वाजवली टाळी
कृष्ण जन्मला यमुना स्थळी 
जो बाळा जो जो रे जो ।।

पाचव्या दिवशी सटवाईचा वेढा 
लिंबू नारळ देवीला फोडा 
तान्हा बाळाची दृष्ट गं काढा 
जो बाळा जो जो रे जो ।।

सहाव्या दिवशी कलीचा मारा 
राधा कृष्णाला घालती वारा
चला यशोदा आपुल्या घरा 
जो बाळा जो जो रे जो ।।

सातव्या दिवशी सटवीचा महाल 
तेथे सोनेरी मंडप लाल यशोदा 
मांडीवर श्रीकृष्ण डोलं 
जो बाळा जो जो रे जो ।।

आठव्या दिवशी अटकीचा थाढ 
भुलल्या गवळणी तिनशेसाठ 
श्रीकृष्णाची पाहतात वाढ
जो बाळा जो जो रे जो ।।

नवव्या दिवशी नववीचा खंड 
तान्ह्या बाळाने घेतला छंद
 वासुदेवाचा सोडवावा बंध 
जो बाळा जो जो रे जो ।।

दहाव्या दिवशी दहावीची रात 
तेहतीस कोटी देव मिळुनी येती 
उतरून टाकती माणिक मोती
जो बाळा जो जो रे जो ।

अकराव्या दिवशी नारद बोले 
देवा तुम्ही हो किती झोपले 
मथुरा नगरीत देवकीचे हाल 
जो बाळा जो जो रे जो "

बाराव्या दिवशी बाराचं नारी 
पाळणा बांधिला यशोदा घरी 
त्याला लावली रेशमी दोरी
जो बाळा जो जो रे जो ।।

तेराव्या दिवशी बोलली बाळी
श्री कृष्ण जन्मला यमुना स्थळी 
गवळणी संगे लावितो खळी 
जो बाळा जो जो रे जो ।।

चौदाव्या दिवशी तोफा गर्जती 
शंकर-पार्वती नदीवर येती
बाळाच्या डोळ्यात काजळ 
घालती जो बाळा जो जो रे जो ||

पंधराव्या दिवशी नौबत वाजे 
श्रीकृष्णावरती घातला साज 
यशोदा मातेला आनंद आज 
जो बाळा जो जो रे जो ।।

सोळाव्या दिवशी सोहळा केला
गुरु महाराज विध्या बोलला
श्री कृष्णाचा पाळणा गाईला 
जो बाळा जो जो रे जो ।।



हे सुध्दा वाचा ⤵️


FAQ
Q.1) श्रीकृष्ण जन्माष्टमी २०२२ कधी आहे ?
Ans. श्रीकृष्ण जन्माष्टमी १८ ऑगस्ट २०२२ ला आहे.

Q.2) श्रीकृष्णाच्या आई वडिलांचे नाव काय होते ?
Ans. श्रीकृष्णाच्या आईचे नाव देवकी व वडिलांचे नाव वासुदेव हे होते.

Q.3) श्रीकृष्णाचा जन्म कधी झाला ?
Ans.श्रावण महिन्यात वध्य अष्टमी या तिथीला भगवान श्रीकृष्ण यांचा जन्म झाला.






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad