Type Here to Get Search Results !

स्वराज्य महोत्सव मराठी माहिती | swarajya mahotsav marathi mahiti | घरोघरी तिरंगा अभियान मराठी माहिती

 स्वराज्य महोत्सव मराठी माहिती  | swarajya mahotsav marathi mahiti pdf|घरोघरी तिरंगा अभियान मराठी माहिती | हर घर तिरंगा अभियान शासन निर्णय महाराष्ट्र | स्वराज्य महोत्सव शासन निर्णय महाराष्ट्र २०२२ 

स्वराज्य महोत्सव २०२२ :- भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर देशात सर्वत्र "आजादी का अमृत महोत्सव" स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. १५ ऑगस्ट, २०२३ पर्यंत सुरू राहणाऱ्या या उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रम, विविध पातळीवर आयोजित करणे अपेक्षित आहे. महाराष्ट्र राज्यातही या उपक्रमांतर्गत विविध पातळीवर कार्यक्रमांचे आयोजन सुरू आहे. सदर महोत्सवाच्या आखणी नियोजन व प्रभावी अंमलबजावणी याकरिता केंद्र शासनाच्या धर्तीवर मा. मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली धोरण समिती तसेच मा. मंत्री (सांस्कृतिक कार्य) यांच्या अध्यक्षतेखाली कोअर समिती व यांच्या अध्यक्षतेखाली अंमलबजावणी समिती व मा. पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली मा. मुख्य सचिव जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आल्या आहेत. दि. १७.०२.२०२२ रोजीच्या कोअर समितीमधील बैठकीत समितीच्या मान्यवर सदस्यांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या उपक्रमांतर्गत आयोजित करावयाच्या कार्यक्रमासंदर्भात विविध सूचना केल्या होत्या. या सुचनेपैकी एक महत्त्वाची सूचना म्हणजे स्वातंत्र्याचा स्वराज्य महोत्सव" साजरा करावा, अशी होती. त्यास अनुसरुन राज्यात दिनांक ९ ऑगस्ट २०२२ ते १७ ऑगस्ट, २०२२ या कालावधीत (अ) राज्यस्तरावर, (ब) जिल्हा स्तरावर, (क) तालुका स्तरावर, (ङ) ग्रामस्तरावर स्वराज्य महोत्सव" अंतर्गत विविध कार्यक्रम आयोजित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

हर घर तिरंगा व स्वराज्य महोत्सव शासन निर्णय :

भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. या गौरवशाली पर्वानिमित्त दिनांक १२ मार्च, २०२१ ते दिनांक १५ ऑगस्ट, २०२३ या कालावधीत "आजादी का अमृत महोत्सव" स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या उपक्रमाचे आयोजन करण्याबाबत केंद्र शासनाने सर्व राज्यांना कळविले आहे. त्यानुसार राज्यात सदर कालावधीमध्ये "भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव" साजरा करण्याबाबत शासन निर्णय/ शासन परिपत्रक / शासन पत्रांद्वारे यापूर्वीच वेळोवेळी सूचना दिलेल्या आहेत. जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात व देशभक्तीची जाज्वल भावना कायम स्वरुपी मनात राहावी व त्याचे संस्मरण व्हावे या उद्देशाने भारतीय "स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत दिनांक ९ ऑगस्ट, २०२२ ते दिनांक १७ ऑगस्ट, २०२२ या कालावधीमध्ये राज्यात "स्वराज्य महोत्सव" अंतर्गत विविध उपक्रम / कार्यक्रम राबविण्याचे निश्चित केले आहे. "स्वराज्य महोत्सव" अंतर्गत (अ) राज्यस्तर, (ब) जिल्हास्तर, (क) तालुका स्तर, (ङ) ग्रामस्तरावर आयोजित करावयाच्या विविध उपक्रम / कार्यक्रम यांचे स्वरुप परिशिष्ट "अ "ब" "क" व "ड" मध्ये निश्चित केले आहे. त्यानुसार "स्वराज्य महोत्सव" अंतर्गत विविध कार्यक्रम / उपक्रमाचे यशस्वीरित्या जास्तीत जास्त जनसहभागातून आयोजन करण्यात यावे..

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक सांकेतांक क्रमांक २०२२०६३०१४२५५०२८२३ असा आहे. हे शासन परिपत्रक डिजिटल स्वाक्षरीने सांक्षाकित करून काढण्यात येत आहे.

स्वराज्य महोत्सव उपक्रम मराठी माहिती | swarajya mahotsav upakram marathi


Sr.No. दिनांक कार्यक्रम आयोजन
1) 8 ऑगस्ट 2022 विशेष ग्रामसभा/वार्ड सभा
2) 9 ऑगस्ट 2022 हर घर तिरंगा/सडा, रांगोळी/ घराला तोरण प्रभात फेरी / स्वातंत्र्य सैनिकांचे मार्गदर्शन.
3) 10 ऑगस्ट 2022 स्वच्छता मोहीम / महिला मेळावे
4) 11 ऑगस्ट 2022 महिला बचत गट मार्गदर्शन / गावाचा इतिहास, राष्ट्राचा इतिहास
5) 12 ऑगस्ट 2022 मोबाईल दुष्परिणाम मार्गदर्शन चर्चा / अर्थ साक्षरता विषयक शिबीर
6) 13 ऑगस्ट 2022 गोपाळांची पंगत /शेद्रीय शेती मार्गदर्शन/शेतकरी मेळावा मार्गदर्शन
7) 14 ऑगस्ट 2022 पर्यावरण संवर्धन शपथ / वृक्षारोपण
8) 15 ऑगस्ट 2022 प्रभात फेरी / शालेय स्पर्धा
9) 16 ऑगस्ट 2022 किशोरी मेळावे / सांस्कृतिक कार्यक्रम प्रबोधन, देशभक्ती कार्यक्रम स्वराज्य फेरी
10) 17 ऑगस्ट 2022 स्वराज्य महोत्सव सांगता समारोह, देशभक्ती पिक्चर दाखवने.


हे सुध्दा वाचा ⤵️


FAQ
Q.1) स्वाराज्य महोत्सव कधीपासून सुरू होत आहे ?
Ans. स्वाराज्य महोत्सव 8 ऑगस्ट पासून सुरू होत आहे.

Q.2) भारताला स्वातंत्र्य मिळून किती वर्ष झाली आहेत ?
Ans. भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली आहेत.

Q.3) स्वातंत्र्य दिन कधी साजरा केला जातो ?
Ans. 15 ऑगस्ट.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad