google-site-verification=mhQXPDL6t29v0SBU3tM2gsf6ieXw2vbDeuweOWGfOg0 स्वातंत्र्य दिन चारोळ्या शायरी मराठी | swatantra din charolya shayari marathi
Type Here to Get Search Results !

स्वातंत्र्य दिन चारोळ्या शायरी मराठी | swatantra din charolya shayari marathi

 स्वातंत्र्य दिन चारोळ्या शायरी मराठी 2022 | swatantra din charolya shayari marathi 2022 | independence day charolya shayari in marathi 

स्वातंत्र्य दिन चारोळ्या मराठी २०२२ :- नमस्कार मित्रांनो आज १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त अतिशय सुंदर चारोळ्या शायरी मराठीतून आपण बघणार आहोत. स्वातंत्र्य दिन चारोळ्या मराठी तुम्ही तुमच्या शालेय जीवनात अनेक स्पर्धांमध्ये नक्कीच उपयोगी पडतील.तरी तुम्ही खालील लेखात दिलेली सर्व स्वातंत्र्य दिन चारोळ्या शायरी तुम्ही शेवटपर्यंत वाचावे ही नम्र विनंती.

स्वातंत्र्य दिन चारोळ्या शायरी मराठी 2022 | swatantra din charolya marathi

 तीन रंगाचा आमुचा तिरंगा,केशरी, पांढरा अन् हिरवा...
 नभी फडकत गातो,नित्य पराक्रमाची गाथा...

भारतीय इतिहासात, तो दिवस अमर झाला. ... 
१५ ऑगस्टला,आमुचा भारत स्वतंत्र झाला...

ना जातीसाठी लढले, ना धर्मासाठी लढले,
शूर भारतीय वीर,फक्त देशासाठी लढले....

तिरंगा आमुचा मान आहे, पराक्रमाचे गान आहे. भारताची शान आहे,तिरंगा आमुचा प्राण आहे...

अनेक जातीधर्म सोबती,आनंदाने हा राहतो....
देश माझा भारत,विविधतेत एकता साधतो...

१५ ऑगस्ट देशभक्तीपर चारोळ्या मराठी 

रंग बलिदानाचा त्या तिरंग्यात पहावा उत्साह देशप्रेमाचा अंगी संचारावा, जयघोष भारताचा आसमंती गुंजावा सण हा स्वातंत्र्याचा सदैव चिरायू व्हावा !

असंख्यांनी केले सर्वस्व त्याग तुझ्यासाठी अनेकांनी दिले बलिदान.... वंदन तयासी करूनिया आज गाऊ भारतमातेचे गुणगान....

ज्या भूमीवर वाहते गोदावरी, कृष्णा, यमुना, गंगा हिमालयाच्या शिखरावर सदैव फडकतो अभिमानाने तिरंगा...

स्वातंत्र्यवीरांना करुया शत शत प्रणाम ज्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान...

उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला,
नतमस्तक मी त्या सर्वांसाठी ज्यांनी भारत देश घडविला..

अनेक स्वातंत्र्यवीरांनी झेलल्या गोळ्या आपल्या निधड्या छातीवर, म्हणून आज आपण स्वाभिमानाने उभे आहोत या मातीवर....

स्वातंत्र्य, समता, बंधुता हाच आहे घटनेचा पाया, लोकशाही बळकट करण्या संविधानाचा जागर करूया....

हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई जेथे बंधुभावाचे व्रत आहे, त्या सुंदर देशाचे नाव फक्त भारत आहे..

शाळा सजवा, काढा रांगोळ्या करू या तयारी आली हो आली 26 जानेवारी....

आओ झुककर सलाम करे उनको जिनके हिस्से मे ये मूकाम आता है खुशनशीब होता है वो खून जो देश के काम आता है....

जगले ते देशासाठी अन देशासाठीच हुतात्मा झाले, भारत मातेला त्यांनी गुलामीतून मुक्त केले....

भारत देश आहे आमचा महान सदैव आम्हा स्फूर्ती देते आमचे संविधान...

मतभेद सारे विसरूया बंधने सारे तोड्या, एक मनाने एक भावनेने आज पुन्हा एक होऊया..

स्वतंत्रता से सब खुशहाली है समता से सब एक समान, बंधुता हमको बांधे रखती गणतंत्र होता बलवान...

गणराज्य दिनाला ध्वजवंदन हे अखंडतेची महती, व्यक्त करतो आदर आम्ही भारतीय संविधानाप्रति..

विविधतेत एकता आहे आमची शान, म्हणूनच आहे आमचा भारत देश महान..

अनेकांनी केला सर्वस्वाचा त्याग दिले देशासाठी बलिदान वंदन तयासी करूया आज गाऊ भारतमातेचे गुणगान...

स्वातंत्र्य दिन चारोळ्या शायरी मराठी (swatantra din charolya marathi)


 "तिरंगा झेंडा फडफडे जय जय कार बोला 15 ऑगस्ट आज आमुचा भारत स्वतंत्र झाला.

या जन्माचा नजराना, माय भूमीस पेश व्हावा तिरंगाच व्हावा गणवेश माझा.

देश विविध रंगाचा, देश विविध ढंगाचा देश विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा.

दे सलामी... या तिरंग्याला ज्यामुळे तुझी शान आहे, हा तिरंगा नेहमी राहू दे उंच जोपर्यंत तुझा जीव आहे.

स्वातंत्र्याची ध्वजा फडकते सूर्य तळपतो प्रगतीचा भारत भूमीच्या पराक्रमाला आमुचा मानाचा मुजरा..

मुक्त आमुचे आकाश सारे झुलती हिरवी राने वने स्वैर उडती पक्षी नभी आनंद आज उरी निनादे..

निशाण फडकत राही निशाण झळकत राही देशभक्तीचे गीत आमचे दुनियेत निनादत राही..

आठवण स्मरावी त्यांची बलिदान ते केले क्रांतीसाठी झटले अन क्रांतिवीर जे झाले..

किती आक्रोश तो जाहला किती रक्तांच्या नद्या वाहिल्या सडा पडला मृतदेहांचा तेव्हा स्वातंत्र्यदिन उदयास आला..




हे सुध्दा वाचा ⤵️


FAQ
Q.1) स्वातंत्र्य दिन 2022 कधी आहे ?
Ans. स्वातंत्र्य दिन 2022 हा 15 ऑगस्टला आहे.

Q.2) स्वातंत्र्य मिळाल्यापासून किती वर्ष पूर्ण झाली आहेत ?
Ans. स्वातंत्र्य मिळाल्यापासून 75 वर्ष पूर्ण झाली आहेत.

Q.3) स्वातंत्र्य दिन पहिल्यांदा कधी साजरा झाला ?
Ans. स्वातंत्र्य दिन पहिल्यांदा 15 ऑगस्ट 1947 ला साजरा केला जातो.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad