Type Here to Get Search Results !

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निबंध भाषण मराठी | swatantryacha amrut mahotsav essay speech in marathi

 स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निबंध भाषण मराठी | swatantryacha amrut mahotsav essay speech in marathi | स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव भाषण मराठी pdf | स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निबंध pdf मराठी 2022 | swatantryacha amrut mahotsav bhashan marathi | swatantryacha amrut mahotsav nibandh pdf marathi 

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव 2022 :- नमस्कार मित्रांनो आज आपण भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव यावर अतिशय सुंदर असे निबंध भाषण मराठी बघणार आहोत. आपल्या भारत देशाला इंग्रजांपासुन स्वातंत्र्य मिळवून 75 वर्ष पुर्ण झाले असल्यामुळे संपूर्ण भारतात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. खालील लेखात दिलेला निबंध 15 ऑगस्ट दिवशी तुम्हाला खुप उपयोगी पडेल. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निबंध तुम्ही शेवटपर्यंत वाचावा ही नम्र विनंती.


राष्ट्रध्वज फडकावताना या गोष्टी लक्षात ठेवा ⤵️

1) ध्वज फडकावताना तो फाटलेला, मळलेला किंवा चुरगळलेला नसावा.

2) तिरंगा व्यवस्थित ठिकाणी फडकावावा. ज्या उंचीवर तो फडकावला आहे, त्याच्या बरोबरीच्या उंचीवर इतर कोणताही ध्वज फडकावू नये.

3) कोणत्याही प्रकारच्या सजावटीसाठी राष्ट्रध्वजाचा वापर करू नये. ध्वजारोहणासाठी झेंडा तयार करताना त्यात फुलं ठेवता येतील.

4) ध्वज फडकावताना नारिंगी रंग वरच्या बाजूला राहील, याची दक्षता घ्यावी. ध्वजावर काहीही लिहू नये. कोणतीही वस्तू झाकण्यासाठी त्याचा वापर करू नये.

5) राष्ट्रध्वज फरशीवर पडलेला नसावा, पाण्यावर तरंगलेला नसावा.

6) कोणत्याही प्रकारच्या वेशभूषेवर राष्ट्रध्वजाचा वापर करू नये. तो कमरेच्या खाली गुंडाळू नये. रुमाल, सोफ्याचं कव्हर, नॅपकीन, अंतरवस्त्र यासाठी कापड म्हणून त्याचा वापर करू नये.

7) जेव्हा ध्वज फडकावतो तेव्हा तो ध्वजस्तंभाच्या उजव्या बाजूला असावा.


स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निबंध भाषण मराठी | swatantryacha amrut mahotsav essay speech in marathi


“एकच तारा समोर, आणिक पायतळी अंगार, 
गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार!"


कवी कुसुमाग्रज यांनी केलेल्या या आवाहनाचे सार्थक होण्यास 15 ऑगस्ट 1947 चा दिवस उजाडला पक्षी पिंजऱ्यातून उडाला. स्वातंत्र्याची रम्य प्रभात झाली. असंख्या बलिदानांचे सार्थक झाले आणि भारताला पारतंत्र्यातून मुक्तता मिळून स्वातंत्र्य मिळाले. बघता-बघता स्वातंत्र्याचा प्रवास 75 वर्षांचा होता आहे.. आज आपण भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहोत. एखाद्या राष्ट्राच्या जीवनात 75 वर्षांचा कालखंड हा जरी फार मोठा टप्पा नसला तरी, राष्ट्रातील नागरिकांच्या जीवनात स्वातंत्र्याची 75 वर्ष पूर्ण करणे अनन्यसाधारण महत्वाचे आहे.


स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात आपली स्वातंत्र्याविषयी कोणती स्वप्ने होती? स्वातंत्र्याकडून आपल्या कोणत्या अपेक्षा होत्या, ? आज सत्य "काय आहे? कुठे होती आपण आणि आता कुठे आहोत ? उणिवा काय राहिल्या आणि आता भविष्यात कशी पावले उचलावी लागतील ? याचा विचार आपल्याला करायला लागेल. स्वातं त्र्याच्या अमृत महोत्सवात आपण काय कमावलं   आणि काय गमावलं ? याचे सिंहावलोकन करण्याच्या टप्प्यावर आपण येऊन पोहोचली आहोत. भारत हा नैसर्गिक साधनसंपत्ती आणि खनिज समृद्ध देश आहे. माथी हिमालय उभा आहे. पायी सागराच्या लाटा लोळण घाळत आहेत. देशातून गंगा-गोदावरी, ब्रह्मपुत्रा सारख्या रक्त वाहिन्या वाहत आहेत. निजीत पक्षी आकाशी भरारी मारतो आहे. सैनिक आणि जवान डोळ्या त तेल घालून देशाची सीमा रक्षण करत आहेत. किसान लोकराजा बनला आहे. आपल्या देशाला शिमला, कुलु, मनाली, उटी सारखी समृद्ध पर्यटन स्थळे लाभली आहेत. एकूणच आपला भारत "देश" सुजलाम सुफलाम आहे.


आपल्या देशाला पैराणिक आणि ऐतिहा - सिक संस्कृतीचा वारसा लाभला आहे. अनेक जाती, धर्माचे, भाषांचे लोक येथे गुण्यागोविंदाने एकत्र नांदत आहेत. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत कबीर यांच्यासारख्या थोर संतांची समी असलेल्या आपल्या देशाची संस्कृती आज जागतिक पातळीवर सर्वश्रेष्ठ संस्कृती मानली जाते. भारत एकाच वेळी अध्यात्मात आणि  विज्ञानातही अग्रेसर होत आहे. अनेक खेळ प्रकारात भारताने जागतिक दर्जाची कामगिरी केळी आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात गेली 15 वर्ष साहित्य, कला, क्रीडा, संस्कृती या क्षेत्रामध्ये नामवंत लेखक, साहित्यिक व कलावंतांनी आपला अमीट ठसा उमटवला आहे.


पण असे असले तरी एकीकडे प्रगती होत आहे आणि दुसरीकडे अनेक गोष्टी आपल्याला वेदना देत आहेत. स्वातंत्र्यासाठी अनेक शूर वीरांनी ऐन तारुण्यात बलिदान दिले. आपले संपूर्ण आयुष्य स्वातंत्र्यासाठी खर्च केले. स्वातंत्र्यासाठी त्यांनी रक्ताचा सडा सांडला.पण आम्ही मात्र रक्ताचा धाऊक बाजार मांडला.. . असं कधीकधी उगाचच वाटते. आज चीन-पाकिस्तान सारख्या परकीय शक्ती सीमेवर आक्रमणाच्या तयारीत असतात. देशांमध्ये दहशतवादी हल्ले होतात. उरी, पुलवामा सारख्या रक्ताळलेल्या आठवणी आपल्याला दुःख देतात. या देशातल्या शेतकऱ्याला आपल्या हक्कांसाठी आंदोलन करावे लागते. अनेक गरिबांना एक वेळचे जेवण सुद्धा मिळत नाही. स्वर्गासारखा काश्मीर गुलाबाच्या सुगंधाने दरवळत रहाण्याऐवजी रक्तात रंगताना पाहायला मिळतो. धर्माच्या नावावरून जातीय दंगली होतात, तेव्हा स्वातंत्र्याच्या ठिकर या ठिकर या उडतात. भारत मतिच्या हृदयाचे शेकडों तुकडे होतात. एकाच आईची लेकरे एकमेकांच्या रक्तासाठी तहानलेली असतील तर...... त्या आईची काय अवस्था होत असेल... ...? या सा-या आक्रमणांमध्ये अतिशय सामान्य माणूस भरडला जातो. जळणारी झोपडी आणि करपणारे रक्त मात्र भारतीयच आहे..... हे आपण का विसरती ? हा खरा प्रश्न आहे. भ्रष्टाचाररूपी यंत्रणेमुळे मोठी व्यवस्था पीखरली जाते. रीज मोठ्या अधिकाऱ्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक होते, तेव्हा ज्यांच्या हाती आपण देशाची प्रशासन व्यवस्था सोपवली आहे... तेच भ्रष्टाचाराने बरबटलेले पाहून असंख्य वेदना होतात. तुरूंगात असताना अनेक गुन्हेगार निवड णुका जिंकतात दरवर्षी मोठमोठे घोटाळे उघडकीस येतात. सामान्य माणसाच्या हक्काची भाकरी गिळंकृत करणारी मंडळी या देशाचे मरिकरी आहेत सत्यमेव जयत हे ब्रीदवाक्य आपल्या देशाची शन आहे. परंतु अशा दृष्ट प्रवृत्तींमुळे देश शोकग्रस्त होती. कधीकधी देशासाठी फासावर चढणारे तरुण, अवघ्या चौदाव्या वर्षी शरीरावर गोळी करणार शिरीष कुमार सारखे तरुण पाहिले तर आजच्या या तरुण पिढीकडे हस्तांतरित करण्यात आलेल्या स्वातंत्र्याचा अर्थ त्यांना कधी कळेल का? असा प्रश्न पडतो.


स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात आप ल्याला एक गोष्ट मान्यच करावी लागेल की- भारतीय स्वातंत्र्याने आपल्याला खूप काही दिले आहे. परंतु जी असमाधानाचा, असंतोषाचा सूर निघत आहे... त्याला आपणच जबाबदार आहोत आपली आर्थिक, सांस्कृतिक, औद्योगिक प्रगती झाली.. पण पण मूल्यांचा -हास होत गेला. म्हणूनच एकीकडे आपण वैज्ञानिक प्रगतीच्या मार्गान झपाट्याने परिवर्तन करीत आहोत. परंतु त्याच वेळी दुसन्या बाजूने वेगाने वाढणाऱ्या भौतिक व अभौतिक समस्यांच्या दृष्ट विळख्यात आपण अडकल्याने स्वातंत्र्याचा श्वास गुदमरतोय, अशी अवस्था झाली आहे. म्हणूनच स्वातंत्र्याच्या या अमृत महोत्सवी वर्षानिमित देशातील जनतेला एवढेच आव्हान करतो.


हे सुध्दा वाचा ⤵️


FAQ
Q.1) स्वातंत्र्य दिन कधी साजरा केला जातो ?
Ans. स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्टला साजरा केला जातो.

Q.2) भारताला स्वातंत्र्य कधी मिळाले ?
Ans. भारताला स्वातंत्र्य 15 ऑगस्ट 1947 ला मिळाले.

Q.3) स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव का साजरा केला जातो ?
Ans. भारताला स्वातंत्र्य मिळुन 75 वर्ष पूर्ण झाली असल्यामुळे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad