google-site-verification=mhQXPDL6t29v0SBU3tM2gsf6ieXw2vbDeuweOWGfOg0 राज्य सरकारचा मोठा निर्णय ! - लम्पी व्हायरसमुळे जनावरांचा मृत्यू झाल्यास, पशुपालकांना नुकसान भरपाई मिळेल | government big decision on lumpi virus
Type Here to Get Search Results !

राज्य सरकारचा मोठा निर्णय ! - लम्पी व्हायरसमुळे जनावरांचा मृत्यू झाल्यास, पशुपालकांना नुकसान भरपाई मिळेल | government big decision on lumpi virus

 राज्य सरकारचा मोठा निर्णय - लम्पी व्हायरसमुळे जनावरांचा मृत्यू झाल्यास, पशुपालकांना नुकसान भरपाई मिळेल | government big decision on lumpi virus

तुम्हाला माहिती असेल, गेल्या काही दिवसांपासून राज्यातील जनावरांवर लम्पी चर्मरोगाचे संकट आले आहे - यामध्ये अनेक जनावरांचा मृत्यू झाल्याने राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

‘लम्पी’ चर्मरोगाचा प्रादुर्भावाने जनावरांचा मृत्यू झाल्यास, पशुपालकांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

 त्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यासाठी 1 कोटी रुपयांची तरतूद करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.


काय सांगितले राज्य सरकारने ?

लम्पी व्हायरसमुळे जनावरांचा मृत्यू झाल्यास, संबंधित शेतकरी वा पशुपालकांना राष्ट्रीय आपत्ती निवारण धोरणातील निकषांनुसार राज्य शासनाच्या निधीतून भरपाई दिली जाणार आहे..

 तसेच या निर्णयाच्या अंमलबजावणी करण्यासाठी संबधित जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली जाणार आहे.

 जिल्हा नियोजन समित्यांनी 2022-23 मधील उपलब्ध निधीतून 1 कोटी रुपयांचा निधी तातडीने उपलब्ध करुन द्यावा, असे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत.

दरम्यान लम्पी चर्मरोगाच्या नियंत्रणासाठी आवश्यक लस, औषधी, साधनसामुग्रीवर हा निधी खर्च केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले


*राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत* - पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदांच्या भरतीबाबत चर्चा करण्यात आली. राज्यस्तरीय पशूधन पर्यवेक्षकाची 286 पदे, तसेच जिल्हा परिषद स्तरावरील 873, अशी एकूण 1159 रिक्त पदे बाह्य स्रोताद्वारे भरली जाणार आहेत.


🙏 *राज्य सरकारने घेतलेला हा निर्णय* - सर्व शेतकऱ्यांसाठी खुप महत्वाचा आहे - आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा.


हे सुध्दा वाचा ⤵️

FAQ
Q.1) राज्य सरकारने लम्पी रोगाबद्दल कोणता निर्णय घेतला ?
Ans. ‘लम्पी’ चर्मरोगाचा प्रादुर्भावाने जनावरांचा मृत्यू झाल्यास, पशुपालकांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

Q.2) राज्यस्तरीय पशूधन पर्यवेक्षकांची किती पदे भरली जाणार आहेत ?
Ans.राज्यस्तरीय पशूधन पर्यवेक्षकाची 286 पदे, तसेच जिल्हा परिषद स्तरावरील 873, अशी एकूण 1159 रिक्त पदे बाह्य स्रोताद्वारे भरली जाणार आहेत.

Q.1) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब लम्पी रोगाबद्दल काय म्हणाले ?
Ans. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यासाठी 1 कोटी रुपयांची तरतूद करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad