Type Here to Get Search Results !

जागतिक साक्षरता दिन निबंध भाषण मराठी माहिती | international letaracy day essay marathi

 जागतिक साक्षरता दिन निबंध भाषण मराठी माहिती | international litaracy day essay marathi | jagtik saksharta din nibandh marathi | आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन निबंध मराठी | 10 lines essay on world international literacy day | 8 सप्टेंबर जागतिक साक्षरता दिन १० ओळी निबंध मराठी

जागतिक साक्षरता दिन निबंध भाषण मराठी माहिती

जागतिक साक्षरता दिन २०२२ :- नमस्कार मित्रांनो आज आपण 8 सप्टेंबर रोजी येणारा दिवस म्हणजे जागतिक साक्षरता दिन याबद्दल आपण अतिशय सुंदर निबंध बघणार आहोत. जागतिक साक्षरता दिन निबंध तुम्हाला १० ओळींचा आणि पेरेग्रफ मध्ये देखील पहायला मिळेल. जागतिक साक्षरता दिन निबंध तुम्हाला शालेय जीवनात विविध प्रकारच्या स्पर्धासाठी नक्की उपयोगी पडेल. खालील लेखात दिलेला निबंध तुम्ही शेवटपर्यंत वाचावा ही नम्र विनंती.

जागतिक साक्षरता दिन निबंध मराठी | jagtik saksharta din nibandh marathi


                "विद्येविना मती गेली
                 मतीविना नीती गेली
                 नीतीविना गती गेली
                 गतीविना वित्त गेले
                 वित्ताविना शूद्र खचले"

इतके अनर्थ एका अविद्येने केले. असे महात्मा ज्योतिबा फुले म्हणायचे. शेतकऱ्यांची मुले शाळा कॉलेजात शिकायला गेली की ती शिकून शहाणी होतील व

           "विद्या आली की मती येईल, 
             मती आली की नीती येईल
             निती आली की गती येईल, 
             गती आली की वित्त येईल "
            आणि वित्त आले की आस्मानी, 
            सुलतानी संकटांशी लढण्याचे 
      सामर्थ्य ही आपोआप त्यांच्या मध्ये येईल.

आज जागतिक साक्षरता दिन आहे. जागतिक साक्षरता दिन हा प्रतिवर्षी ८ सप्टेंबर या तारखेला साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय सहकार्यातून शिक्षण, विज्ञान आणि सांस्कृतिक विकास व त्यातून शांतता व सुव्यवस्थेला उत्तेजन देण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करणाऱ्या युनेस्कोने शिक्षणाचे साक्षरतेचे महत्व लक्षात घेऊन आठ सप्टेंबर हा दिवस जागतिक साक्षरता दिन म्हणून साजरा करण्याचे ठरवले. युनेस्को मध्ये हा निर्णय 7 नोव्हेंबर इसवीसन 1965 रोजी झाला आणि 8 सप्टेंबर इसवी सन 1966 पासून जगभरात जागतिक साक्षरता दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला.

भारतात राष्ट्रीय साक्षरता मिशन च्या अनुसार जर एखादी व्यक्ती आपले नाव लिहू आणि वाचू शकत असेल तर त्या व्यक्तीला साक्षर समजले जाते वास्तविक 1988 मध्ये राष्ट्रीय साक्षरता मिशन ची सुरुवात झाली होती ती यासाठी की पंधरा ते 55 वयोगटातील 75 टक्के लोकांना 2007 पर्यंत कामापुरते साक्षर बनवण्यात यावे. आणि त्यायोगे वेळोवेळी केले गेलेल्या जनगणनेत साक्षर लोकांची टक्केवारी सुद्धा वाढली पण आजच्या जगात केवळ एवढ्याच ज्ञानावर एखादी व्यक्ती साक्षर संबोधणे चुकीचे आहे.

पूर्वीच्या काळी निरक्षर लोकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत होती. मुख्यतः सावकारांकडून अशा लोकांच्या निरक्षरतेचा फायदा घेऊन त्यांच्याकडून अंगठ्याचे ठसे घेऊन मोठ्या प्रमाणात जमीनी, आर्थिक मालमत्ता लाटण्यात आल्या. पुढे सरकारकडून सावकारांवर बंधने आली सावकारीला आळा बसला.

          "मुलगी शिकली प्रगती झाली."

एक स्त्री शिकली तर अख्ख कुटुंब शिकतं, सुशिक्षित होतं असे ज्योतिबा फुले म्हणत असत .कारण निरक्षर पालक यांमुळे कुटुंब कल्याण, वाढती लोकसंख्या, बेरोजगारी, अंधश्रद्धा अशा अनेक गोष्टी वाढत जातात.

शिक्षणाचे महत्त्व खूप आहे . एखाद्या लहान मुलाला साक्षर करून योग्य आकार दिला तर हीच मुले पुढे स्वतःचे आणि पर्यायाने देशाचे भवितव्य उज्ज्वल करतील. आज सरकारने केवळ मुलांसाठीच नाही तर महिला आणि ज्येष्ठांसाठी ही साक्षरता मोहीम हाती घेतली आहे.गावोगावी शाळा उभ्या राहात आहेत.

मुलींच्या शिक्षणासाठी योजना राबवल्या जात आहेत . घरची परिस्थिती बेताची असल्याने दिवसभर कष्ट करून शिकण्यासाठी रात्रीच्या शाळा सुद्धा सुरू केल्या आहेत.
               असं म्हणतात"
              "वाचाल तर वाचाल"

निरक्षरता दूर करण्याची जबाबदारी फक्त सरकारचीच नाही तर तुमच्या आमच्या सारख्या साक्षरांची सुद्धा आहे . आजूबाजूला वावरणाऱ्या निरक्षर समाजाला साक्षरतेचे महत्व पटवून देण्याची त्यांना साक्षर बनवण्याची जबाबदारी आपली आहे. केंद्र सरकारने सर्वांसाठी शिक्षणाचा कायदा केला आहे.

त्याची काटेकोर अंमलबजावणी करू असे आपण सर्व शपथ घेऊ. तसेच काळाप्रमाणे आपण टेक्नोसॅव्ही होणे ही महत्त्वपूर्ण आहे तेही आपण चांगल्या प्रकारे शिकू याची शपथ घेऊया.

               "आपलं फक्त एकच कर्तव्य 
                शिक्षित करूया समाज सर्व".



जागतिक साक्षरता दिन १० ओळी निबंध मराठी | 10 lines essay on international literacy day


१] जागतिक साक्षरता दिन संपूर्ण जगभरात ८ सप्टेंबर रोजी साजरा केला जातो.

२] इ.स १९६६ मध्ये पहिल्यांदा जागतिक साक्षरता दिन साजरा केला गेला.

३] साक्षरता च्या क्षेत्रात कार्य करण्यासाठी यूनेस्को च्या वतीने प्रतिवर्षी हा दिन साजरा केला जातो.

४] या दिवसाचा मुख्य उद्देश नवसाक्षरांना उत्साहित करणे हा आहे.

५] निरक्षरता हा मानवाच्या जीवनातील सर्वात मोठा अभिशाप आहे. म्हणून प्रत्येक व्यक्तीने साक्षर होणे आवश्यक आहे.

६] जेव्हा देशाचा प्रत्येक नागरिक साक्षर होईल तेव्हा देश खरा प्रगती करू शकेल.

७] साक्षरतेच्या प्रमाणात सुधारणा करण्यासाठी व नागरिकांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी भारत सरकारने ग्रामीण तसेच शहरी भागात वेगवेगळ्या योजना राबविल्या आहेत. जसे की सर्व शिक्षा अभियान, मध्यान्ह भोजन इत्यादि.

८] या दिवशी शिक्षण क्षेत्रातील विविध लोकांना पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते.

९] जगभरात जागतिक साक्षरता दिन प्रत्येक वर्षी विशिष्ट अशा विषयावर साजरा केला जातो.

१०] जागतिक साक्षरता वाढविण्या साठी सर्व जगातील नागरिकांनी एकत्र येऊन प्रयत्न केले पाहिजेत.





हे सुध्दा वाचा ⤵️


FAQ
Q.1) जागतिक साक्षरता दिन कधी साजरा केला जातो ?
Ans. जागतिक साक्षरता दिन 8 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो.

Q.2) जागतिक साक्षरता दिन पहिल्यांदा कधी साजरा केला गेला ?
Ans. इ.स १९६६ मध्ये पहिल्यांदा जागतिक साक्षरता दिन साजरा केला गेला.

Q.3) जागतिक साक्षरता दिन साजरा करण्यामागील मुख्य उद्देश काय आहे ?
Ans. जागतिक साक्षरता दिन या दिवसाचा मुख्य उद्देश नवसाक्षरांना उत्साहित करणे हा आहे.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad