Type Here to Get Search Results !

लाल बहादूर शास्त्री भाषण निबंध मराठी | lal bahadur shastri speech in marathi | lal bahadur shastri essay in marathi pdf

 लाल बहादूर शास्त्री भाषण निबंध मराठी | lal bahadur shastri speech in marathi | लाल बहादूर शास्त्री मराठी माहिती | lal bahadur shastri bhashan nibandh marathi pdf | lal bahadur shastri essay in marathi pdf | लाल बहादूर शास्त्री जयंती निमित्त १० ओळी निबंध | 10 lines essay on lal bahadur shastri jayanti

लाल बहादूर शास्त्री जयंती २०२२ :- नमस्कार मित्रांनो आज आपण “जय जवान जय किसान" हा नारा देणारे महान व्यक्तिमत्व लाल बहादूर शास्त्री जयंती निमित्त संपूर्ण माहिती बघणार आहोत. 
       लाल बहादूर शास्त्री जयंती दरवर्षी २ ऑक्टोंबर रोजी साजरी केली जाते म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत लाल बहादूर शास्त्री जयंती भाषण मराठी (lal bahadur shastri bhashan marathi) and लाल बहादूर शास्त्री जयंती निबंध मराठी (lal bahadur shastri nibandh marathi pdf) बघणार आहोत. तुम्हा सर्वांना लाल बहादूर शास्त्री जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा...

लाल बहादूर शास्त्री भाषण निबंध मराठी | lal bahadur shastri speech essay in marathi


लाल बहादूर शास्त्री जयंती २०२२ :-

                 सादगी और इमानदारी, 
            यही है शास्त्री जी की पहचान...
                सत्ता पाकर भी नही था,
               उन्हे तनिक भी अभिमान....

“जय जवान जय किसान" ही घोषणा देऊन सर्व देशवासीयांचे बळ सेनादलामागे उभे करणारे, युद्धात पाकिस्तानला खडे चारुन भारताचा मान व शान जगात वाढविणारे असे स्वाभिमानी, विनयशील, कणखर परंतु उदार मनाचे थोर देशभक्त म्हणजे लालबहादूर शास्त्री होय.

उत्तर प्रदेशमधील मोगलसराई या गावी एका गरीब कुटुंबात दोन ऑक्टोबर 1904 रोजी लाल बहादूर यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शारदाप्रसाद श्रीवास्तव तर आईचे नाव रामदुलारी होते. शारदा प्रसाद प्राथमिक शाळेत शिक्षक होते. शास्त्रींच्या जन्माच्या 18 महिन्यानंतरच त्यांच्या वडिलांचे निधन झाले.

लालबहादूर शाळेत मन लावून अभ्यास करायचे. अभ्यासात हुशार असल्यामुळे लालबहादूर यांनी मॅट्रिक झाल्यानंतर बनारस विद्यापीठात प्रवेश घेऊन तत्वज्ञान या विषयात “शास्त्री " ही पदवी मिळवली. पुढे तेच त्यांचे आडनाव बनून लालबहादूर शास्त्री भारतभर विख्यात झाले.

राजकीय आणि व्यक्तिगत आयुष्यात गांधीजींच्या विचारांचा त्यांच्या मनावर फारच प्रभाव पडला. ऐन तारुण्यात त्यांनी खूप पैसे मिळवून ऐष आरामात राहण्यापेक्षा देशसेवेला वाहून नेण्याचे ठरविले. भारत सेवक समाज या सेवाभावी संस्थेचे ते सक्रिय सभासद झाले.

लाल बहादूर शास्त्रींनी महात्मा गांधीजींच्या सर्व आंदोलनात सक्रिय पद्धतीने पुढाकार घेतला. 1921 मधील असहयोग आंदोलन, 1930 मधील दांडीयात्रा, 1942 मधील भारत छोडो आंदोलनात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. साधेपणाचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे 'लाल बहादूर शास्त्री' होय.

"मूर्ती लहान पण कीर्ती महान" या उक्तीचा प्रत्यय घडवून देणारे लालबहादूर शास्त्री हे एक महान नेतृत्व होते. आपल्या देशाप्रती समर्पित सेवेमुळे लालबहादूर शास्त्री निष्ठा आणि समतेसाठी जनमानसात लोकप्रिय झाले. नम्र, दृढ आणि जबरदस्त आंतरिक शक्ती असलेले शास्त्रीजी सामान्य लोकांची भावना समजून घेऊन खऱ्या अर्थाने त्यांचे मित्रच बनले.

अनेक लहान मोठ्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडत त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला. देश स्वतंत्र झाल्यावर ते दिल्लीत आले. देशाचे गृहमंत्री, वाणिज्य मंत्री, रेल्वेमंत्री, म्हणून काम करताना त्यांच्या सचोटीपूर्ण आणि कार्यक्षम नेतृत्वाने ते लोकप्रिय झाले.

शास्त्रींनी आपल्या दूरदर्शी वृत्तीने देशाला विकासाच्या मार्गावर नेले. अशा विनयशील व्यक्तीच्या मागे त्यांचे गुरु महात्मा गांधींच्या राजकीय शिकवणीचा मोठा पगडा होता. शास्त्री नेहमी म्हणत असत की कठोर मेहनत ही प्रार्थनेसमान आहे. अशा उदार मनाच्या थोर देशभक्ताने भारतीय संस्कृतीचे खऱ्या अर्थाने प्रतिनिधित्व केले.



लाल बहादूर शास्त्री जयंती निमित्त १० ओळी निबंध | 10 lines essay on lal bahadur shastri jayanti

१) लालबहादूर शास्त्री हे भारतीय स्वातंत्र्यलढयातील स्वातंत्र्यसैनिक व भारतीय प्रजासत्ताकाचे दुसरे पंतप्रधान होते.

२) लालबहादूर शास्त्री यांचा जन्म २ ऑक्टोबर १९०४ साली वाराणसी येथे झाला.

३) त्यांचे प्राथमिक शिक्षण मिर्झापूर आणि माध्यमिक शिक्षण वाराणसीला झाले.

३) त्यांचे प्राथमिक शिक्षण मिर्झापूर आणि माध्यमिक शिक्षण वाराणसीला झाले.

४) शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात सुधारणा करणे हे त्यांचे ध्येय होते.

५) १९४६ साली लालबहादूर शास्त्री उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री झाले.

६) १९५१ साली पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्यांना काँग्रेसचे सदस्य केले.

७ ) ९ जून १९६४ साली त्यांनी पंतप्रधान पदाची सुत्रे हाती घेतली.

८ ) लालबहादूर शास्त्रींनी देशाला “जय जवान जय किसान" हे घोषवाक्य दिले.

९) २ जानेवारी १९६६ साली हृदयविकाराने त्यांची जीवनज्योत मावळली.

१०) देशासाठी केलेल्या कार्यासाठी त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले.




हे सुध्दा वाचा ⤵️


FAQ
Q.1) लाल बहादूर शास्त्री जयंती कधी साजरी केली जाते ?
Ans. लाल बहादूर शास्त्री जयंती 2 ऑक्टोंबर रोजी साजरी केली जाते.

Q.2) लाल बहादूर शास्त्री यांचा जन्म कधी झाला ?
Ans. लालबहादूर शास्त्री यांचा जन्म २ ऑक्टोबर १९०४ साली वाराणसी येथे झाला.

Q.3) लाल बहादूर शास्त्री यांनी कोणते घोषवाक्य दिले ?
Ans.लालबहादूर शास्त्रींनी देशाला “जय जवान जय किसान" हे घोषवाक्य दिले.

Q.4) लाल बहादूर शास्त्री यांचा मृत्यू कधी झाला ?
Ans. २ जानेवारी १९६६ साली हृदयविकाराने त्यांची जीवनज्योत मावळली.








टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad