Type Here to Get Search Results !

महात्मा गांधी जयंती भाषण मराठी | mahatma gandhi jayanti speech in marathi

 महात्मा गांधी जयंती भाषण मराठी|mahatma gandhi jayanti speech in marathi | गांधी जयंती भाषण मराठी | Gandhi jayanti bhashan marathi | महात्मा गांधी भाषण मराठी 

महात्मा गांधी जयंती २०२२ :- नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळून देन्यास एक मोठे योगदान देणारे, अहिंसावादी विचार असणारे  राष्ट्रपिता मोहनदास करमचंद्र गांधी यांच्या जयंती निमित्त संपूर्ण माहिती बघणार आहोत.

     दरवर्षी २ ऑक्टोंबर रोजी महात्मा गांधी जयंती मोठ्या आनंदाने साजरी केली जाते म्हणूनच आम्ही महात्मा गांधी जयंती निमित्त अतिशय सुंदर,सोपे भाषण घेऊन आलो आहोत. तरी तुम्ही महात्मा गांधी जयंती भाषण (mahatma gandhi jayanti bhashan marathi) शेवटपर्यंत वाचावे ही नम्र विनंती. तुम्हा सर्वांना महात्मा गांधी जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा..

महात्मा गांधी जयंती भाषण मराठी 2022 | Mahatma Gandhi jayanti speech in marathi


महात्मा गांधी जयंती २०२२ :-

                     'खादी मेरी शान है, 
                      करम मेरी पूजा है...
                      सच्चा मेरा करम, 
                 और हिंदुस्तान मेरी जान है..."

सन्माननीय व्यासपीठ, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, उपस्थित गुरुजन वर्ग तसेच माझ्या बालमित्र आणि मैत्रिणींना माझा सप्रेम नमस्कार! आजच्या दिवशी मी तुम्हाला सर्वांचे लाडके असे ज्यांना आपण बापू म्हणून ओळखतो यांच्या विषयी माझे विचार व्यक्त करणार आहे तरी ते तुम्ही शांतचित्ताने ऐकावे अशी माझी अपेक्षा.

अहिंसा आणि सत्याच्या मार्गाने बलाढ्य शत्रूला आणि कठीण परिस्थितीला सामोरे जाऊन त्यावर विजय मिळवणाऱ्या महात्मा गांधीजींना माझा शत शत प्रणाम.आधुनिक काळातील युगप्रवर्तक नेते म्हणून महात्मा गांधीजी यांचे नाव घेतले जाते. भारतीय जनमाणसात त्यांचा खूप मोठा प्रभाव होता. हे आपल्याला गांधीयुगावरून दिसून येते.

महात्मा गांधीजी यांचा जन्म 2 ऑक्टोंबर 1869 रोजी गुजरात राज्यातील पोरबंदर या गावी झाला. महात्मा गांधी यांचे संपूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद गांधी. तरआईचे नाव पुतळीबाई असे होते.

त्यांची आई ही धार्मिक प्रवृत्तीची होती, त्यांचे बालपण हे धार्मिक वातावरणात गेले म्हणूनच गांधीजी लहानपणापासूनच धार्मिक विचाराचे होते हे आपल्याला दिसून येते. त्यांचे वडील पोरबंदर येथे दिवाण म्हणून कार्यरत होते. त्या काळात बालवयातच लग्न करण्याच्या प्रथेमुळे महात्मा गांधी यांचे लग्न वयाच्या 13 व्या वर्षी झाले. गांधीजींचा कस्तुरबा कपाळ यांच्याशी बालविवाह झाला. महात्मा गांधीजी हे लहानपणापासूनच लाजाळू स्वभावाचे व हुशार होते. महात्मा गांधी 1887 मध्ये मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. व शालेय शिक्षण संपवून वयाच्या एकोणिसाव्या वर्षी 1888 मध्ये उच्च शिक्षणासाठी इंग्लंड येथे गेले व तिथे त्यांनी बॅरिस्टर पदवी संपादन केली.

उच्च शिक्षण संपादन करून 1891 मध्ये ते भारतात परतले व त्यांनी प्रथमच भारतामधील राजकोट येथे वकिली सुरू केली. व पुढे लवकरच ते एका हिंदी कंपनीचे वकील म्हणून 1893 मध्ये दक्षिण आफ्रिका येथे गेले.

व्यापार व कामधंदा निमित्त भारतीय अनेक लोक दक्षिण आफ्रिकेमध्ये स्थायिक झालेले होते, परंतु तेथील गोऱ्या लोकांनी भारतीय लोकांवर वर्णभेदाच्या आधारे अत्यंत अन्याय जुलूम चालवला होता. ते सर्व लोक अतिशय कठीण अवस्थेत हालाखीचे जीवन जगत होते. याच प्रकारची वर्तणूक गांधीजी यांच्यासोबत सुद्धा घडली होती.

त्यांच्यावर होत असलेला हा अन्याय महात्मा गांधींना कळताच त्यांनी त्याच्या विरुद्ध आवाज उठवण्याचे ठरवले. या सरकारी अन्यायाविरुद्ध व जुलूमशाही विरुद्ध त्यांनी अहिंसक मार्गांनी लढत दिली. त्यांनी प्रथमच सत्याग्रहाचा प्रयोग करण्याचे ठरवले.

गांधीजींच्या सत्याग्रह आंदोलनात अनेक भारतीय सहभागी झाले त्यांच्या आंदोलनामुळे दक्षिण आफ्रिकेचे सरकार सुद्धा झुकले होते. भारतीयांना मानवी हक्क देण्यात आले. अशाप्रकारे महात्मा गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेमध्ये सत्याचा प्रथम प्रयोग करून अहिंसक मार्गाने अत्याचारी व जुलमी सत्तेला नमवले.

9 जानेवारी 1915 रोजी महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतील विजय संपादन करून भारतात परतले. यानंतर 1917 मध्ये त्यांनी बिहारमधील चंपारण येथील शेतकऱ्यांना त्यांचे हक्क व जुलमी कर याच्याविरुद्ध तसेच मजुरांची होणारी पिळवणूक याच्याविरुद्ध गांधीजींनी सत्याग्रहाच्या मार्गाने लढा देऊन तो जिंकला. गुजरातमधील खेडा जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या समस्येवर त्यांनी सत्याग्रहाच्या मार्गाने लढा दिला या दोन सत्याग्रहामुळे त्यांना देशभर प्रसिद्धी मिळाली.

याप्रमाणे त्यांनी ब्रिटिश सरकारविरुद्ध भारत छोड़ो, सायमन गो बॅक, असे अनेक सत्याग्रह केले. 1942 च्या 'चले जाव' या स्वातंत्र्य आंदोलन चळवळीचे नेतृत्व महात्मा गांधीजींनी केले होते. महात्मा गांधीजी आणि भारतातील अनेक स्वातंत्र्यसैनिक यांच्या प्रयत्नांना अखेर यश येऊन 15 ऑगस्ट 1947 या दिवशी भारताला स्वातंत्र्य मिळाले. अशा प्रकारे भारतीय स्वातंत्र्यामध्ये एक गांधीजींनी योगदान दिले.

नोबल पुरस्कार विजेते रवींद्रनाथ टागोर यांनी गांधीजी यांना महात्मा ही उपाधी दिली. तसेच सुभाषचंद्र बोस यांनी गांधीजींना सर्वप्रथम राष्ट्रपिता असे संबोधले. भारतातील जनता त्यांना प्रेमाने बापू असे म्हणत. गांधीजी हे सत्य, अहिंसेचे पुजारी होते. आज परमेश्वर सत्य आहे असे त्यांचे म्हणणे होते. सत्याचा शोध घेणे म्हणजेच परमेश्वराचा शोध घेणे होय, असे त्यांनी म्हटले होते.

सत्याग्रह हे गांधीजींचे शस्त्र होते. सत्याग्रह ही गांधीजींनी संपूर्ण जगाला दिलेली महत्त्वाची देणगी आहे. अन्याय व शोषणाविरुद्ध केलेल्या आत्मिक शक्तीचा वापर म्हणजे सत्याग्रह होय, असे त्यांनी म्हटले आहे. गांधीजी म्हणतात " अहिंसेच्या मार्गाने शत्रुलाही प्रेमाने जिंकता येते, अहिंसा हे अन्याय व असत्य या विरुद्ध लढण्याची सर्वात प्रभावी साधन आहे."

सर्व जगाला गांधीजींनी अहिंसेचा मार्ग दाखवला, म्हणून 2 ऑक्टोंबर हा दिवस "आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस" म्हणून साजरा केला जातो. 30 जानेवारी 1948 रोजी महात्मा गांधीजींची हत्या नथुराम गोडसे याच्या द्वारे करण्यात आली. दिल्लीतील बिर्ला भवनामध्ये गांधीजी फिरत असताना त्यांच्यावर नथुराम गोडसे यांच्या द्वारे गोळ्या चालवण्यात आल्या व यातच महात्मा गांधीजींचा मृत्यू झाला. या थोर राष्ट्रीय युगप्रवर्तक नेत्याला आदरांजली देण्यासाठी दरवर्षी ३० जानेवारी हा दिवस हुतात्मा दिन म्हणून देशभर पाळला जातो.
शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते....

               बापू सन्मान करतो आम्ही, 
                 तुमच्या महान नेतृत्वाचा...
         भारत देश गुलामगिरीतून मुक्त झाला, 
           हा दाखला आहे तुमच्या कर्तुत्वाचा...

आजच्या या दिवशी गांधीजींच्या पावन प्रतिमेला व त्यांच्या कार्याला वंदन करून मी माझ्या भाषणाला पूर्णविराम देतो.

                 जय हिंद ! जय महाराष्ट्र !



हे सुध्दा वाचा ⤵️


FAQ
Q.1) महात्मा गांधी जयंती कधी साजरी केली जाते ?
Ans. महात्मा गांधी जयंती 2 ऑक्टोंबर रोजी साजरी केली जाते.

Q.2) महात्मा गांधीजींचे पुर्ण नाव काय आहे ?
Ans. महात्मा गांधीजींचे पुर्ण नाव मोहनदास करमचंद्र गांधी हे आहे.

Q.3) महात्मा गांधीजींचा मृत्यू कधी झाला ?
Ans. महात्मा गांधीजींचा मृत्यू 30 जानेवारी 1948 रोजी झाला.






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad