google-site-verification=mhQXPDL6t29v0SBU3tM2gsf6ieXw2vbDeuweOWGfOg0 नवरात्र निबंध मराठी माहिती | Navratri Essay in marathi mahiti
Type Here to Get Search Results !

नवरात्र निबंध मराठी माहिती | Navratri Essay in marathi mahiti

 नवरात्र निबंध मराठी माहिती | Navratri Essay in marathi mahiti | नवरात्री १० ओळी निबंध मराठी | 10 lines essay on Navratri |नवरात्री मराठी निबंध २०२२ | Navaratri nibandh marathi | नवरात्री मराठी माहिती २०२२ pdf

नवरात्री २०२२ :- नमस्कार मित्रांनो आज आपण २६ सप्टेंबर २०२२ रोजी सुरू होत असलेला खुप आनंददायी उत्सव म्हणजे नवरात्री उत्सव. नवरात्री उत्सव सर्वत्र मोठ्या उत्साहात आनंदाने साजरा केला जातो म्हणून आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत नवरात्री निबंध मराठी माहिती, नवरात्रीचे नऊ रंग,साडी कलर्स, देवीची नऊ रूपे, नैवेद्य हे सर्व आपण खालील लेखात बघणार आहोत. खालील लेखात दिलेली माहिती तुम्ही शेवटपर्यंत वाचावी ही नम्र विनंती.

➡️ नवरात्रीचे नऊ रंग, देवीची नऊ रूपे नैवेद्य मराठी माहिती

 नवरात्र निबंध मराठी माहिती | Navaratri essay in marathi mahiti

आपल्या भारत देशात अनेक सण साजरे केले जातात, त्यापैकीच एक सण म्हणजे नवरात्र. हा सण भारतातील विविध भागात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. अश्विन महिन्याच्या पहिल्याच दिवशी नवरात्र उत्सवाला सुरवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सार्वजनिक मंडळामध्ये देवीच्या मूर्तीची स्थापना करतात.

नवरात्रीतील नऊ दिवस सर्वजण मोठ्या श्रद्धेने देवीची पूजा करतात सार्वजनिक मंडळाच्या ठिकाणी भजन, कीर्तन तसेच अनेक देखाव्यांचे आयोजन केले जाते. ते बघायला लोक एकत्रित येतात. बरेच लोक नऊ दिवस उपवास करून देवीचे व्रत पूर्ण करतात. नवरात्रीचे नऊ दिवस देवीला वेगवेगळ्या रंगाच्या साड्या नेसवल्या जातात: देवीप्रमाणे सर्व स्त्रियाही नऊ दिवस वेगवेगळ्या रंगाच्या साडया नेसतात. नवरात्रीमध्ये सर्वत्र सजावट पाहायला मिळते. मोठे मोठे मंडप बघायला मिळतात. विविध सार्वजनिक मंडळातर्फे सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. स्त्रिया, पुरुष तसेच लहान मुलं दांडिया, गरबा खेळतात. विविध स्पर्धांमध्ये सहभागी होतात. हया नऊ दिवशी सर्वत्र उत्साहाचे वातावरण असते. कलकत्ता, गुजरात, विहार, आसाम मध्ये या सणाला वेगळेच महत्त्व आहे. तेथे मोठ्या प्रमाणात दुर्गापूज चे आयोजन केले जाते.

देवीने राक्षस महिषासुराचा वध केला म्हणून देवीला महिषासुरमर्दिनी असे सुद्धा म्हटले जाते. दहाव्या दिवशी देवीच्या मूर्तीचे विसर्जन केले जाते या दिवसाला दसरा असेही म्हणतात हा सण एकमेकांना जवळ आणतो. वाईट गोष्टींवर मात करून नवीन गोष्टी आत्मसाद करण्याचा हा सण आहे.नवरात्री १० ओळी निबंध मराठी | 10 line essay on Navratri


१.नऊ रात्रींचा सण म्हणजे नवरात्री.

२.नवरात्री उत्सव हा देशातील एक अतिशय महत्वाचा उत्सव आहे.

३. अश्विन महिन्याच्या पहिल्या दिवसापासून या उत्सवाची सुरुवात होते.

४. देशातील विविध राज्यात हा उत्सव विविध नावांनी व वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जाती.

५. नऊ दिवस दुर्गामातेच्या नऊ रूपांची  पूजा केली जाते.

६. जाते.देवीच्या मूर्तीची स्थापना करून तिचा नऊ दिवस भक्तीभावाने जागर केला जातो .

७. देवीला नऊ दिवस नऊ वेगवेगळ्या रंगांचा पोशाख केला जातो.

८. देशभरातील देवींच्या मंदिरात भाविक दर्शनासाठी मोठया संख्येने येतात.

९. नवरात्रीत 'गरबा' हा नृत्यप्रकार अनेक ठिकाणी खेळला जातो. गरबा हे गुजरात राज्यातील पारंपारिक नृत्यं आहे. 

 १०. दुर्गामतेने महिषासूराचा वध करून दुष्ट प्रवृत्तीवर विजय मिळवला म्हणून त्या विजयाचा उत्सव नवरात्रीत साजरा केला जातो.हे सुध्दा वाचा ⤵️


FAQ
Q.1) नवरात्री कधीपासून सुरू होत आहे ?
Ans. नवरात्री 26 सप्टेंबर 2022 पासून सुरू होत आहे ?

Q.2) नवरात्री म्हणजे काय ?
Ans.नऊ रात्रींचा सण म्हणजे नवरात्री.

Q.3) नवरात्रीची सुरूवात कधीपासून होते ?
Ans. अश्विन महिन्याच्या पहिल्या दिवसापासून या उत्सवाची सुरुवात होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad