google-site-verification=mhQXPDL6t29v0SBU3tM2gsf6ieXw2vbDeuweOWGfOg0 नवरात्रीचे नऊ रंग,देवींची नऊ रूपे मराठी माहिती | Nine colours of Navratri 2022
Type Here to Get Search Results !

नवरात्रीचे नऊ रंग,देवींची नऊ रूपे मराठी माहिती | Nine colours of Navratri 2022

 नवरात्रीचे नऊ रंग,देवींची नऊ रूपे मराठी माहिती | Nine colours of Navratri 2022 | नवरात्री कलर्स २०२२ मराठी माहिती|Navratri colours 2022 marathi mahiti | नवरात्री नऊ देवीची रूपे, नऊ नैवेद्य| नवरात्री नऊ दिवसांच्या नऊ माळा | नवरात्री २०२२ मराठी माहिती | Navratri 2022 marathi mahiti

नवरात्री २०२२ :- नमस्कार मित्रांनो आज आपण सगळ्यांचा आवडता सण म्हणजे नवरात्री उत्सव याबद्दलची माहिती बघणार आहोत. नवरात्री उत्सव येणाऱ्या 26 सप्टेंबर 2022 पासून ते 4 सप्टेंबर 2022 पर्यंत चालू राहणार आहे. नवरात्रीच्या या नऊ दिवसांत जे काही नऊ रंग असतात, देवीची नऊ रूपे असतात, नवरात्री नऊ माळा आणि नऊ नैवेद्य याबद्दलची माहिती आपण खालील लेखात जाणून घेणार आहोत.

नवरात्रीचे नऊ कलर्स 2022 मराठी माहिती | Navratri nine colours 2022 marathi information


दिनांक माळ देवीचे स्वरूप रंग
26 सप्टेंबर 2022 पहिली माता शैलपुत्री पांढरा (white)
27 सप्टेंबर 2022 दुसरी माता ब्रम्हचारिणी लाल (Red)
28 सप्टेंबर 2022 तीसरी माता चंद्रघंटा निळा (Blue)
29 सप्टेंबर 2022 चौथी माता कुष्मांडा पिवळा (Yellow)
30 सप्टेंबर 2022 पाचवी देवी स्कंदमाता हिरवा (Green)
01 सप्टेंबर 2022 सहावी माता कात्यायनी राखाडी (Gray)
02 सप्टेंबर 2022 सातवी माता कालरात्री नारंगी (Orange)
03 सप्टेंबर 2022 आठवी माता महागौरी मोरपंखी (peacock green)
04 सप्टेंबर 2022 नववी माता सिद्धीदात्री गुलाबी (Pink)


नवरात्रीचा Day One/पहिला दिवस :-

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पर्वतराज हिमालयाची कन्या देवी शैलपुत्री' ची पूजा केली जाते. दुर्गा मातेच्या नऊ रूपांपैकी हे पहिले रूप मानले जाते.
पहिली माळ (घटस्थापना) दि. २६/सप्टेंबर/२०२२ शुभ रंग : पांढरा (white)
नैवेद्य : शुद्ध (साजूक तूप देवीला पांढऱ्या रंगाची सुवासिक फुले वाहावी.

नवरात्रीचा Day Two/दुसरा दिवस :-

नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी आई 'ब्रम्हचारिणीची पूजा केली जाते. ब्रम्हचारिणीचा अर्थ होतो तपाचे आचरण करणारी.
दुसरी माळ (Second Day)- २७ / सप्टेंबर / २०२२
शुभ रंग : लाल (red)
नैवेद्य: साखर, देवीला हिरव्या रंगाच्या फुलांची/पानांची माळ घालू शकता.

नवरात्रीचा Day Three/तिसरा दिवस :-

नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी आईचे तिसरे रुप म्हणजे देवी 'चंद्रघंटा'ची पूजा केली जाते. 
तिसरी माळ : दि. २८/ सप्टेंबर / २०२२ 
शुभ रंग : निळा (blue)
नैवेद्य : दूध किंवा दूधापासून तयार केलेली मिठाई किंवा खीरीचा नैवेद्य ठेवावा. 'कमळ किंवा शंखपुष्पीची फूलं अर्पण करावे.

नवरात्रीचा Day Four/चौथा दिवस :-

नवरात्रीच्या चौथ्या दिवशी दुर्गा मातेचे चौथे रुप म्हणजे आई 'कुष्मांडा'ची पूजा केली जाते. 
चौथी माळ : २९ / सप्टेंबर/२०२२ 
शुभ रंगः पिवळा (yellow)
नैवेद्य :  मालपोह्याचा/गोड भजी (गुलगुले) चा नैवेद्य ठेवावा. पूजेसाठी पिवळ्या रंगाची फूल अर्पण करावी.

नवरात्रीचा Day Five/पाचवा दिवस :-

नवरात्रीच्या पाचव्या दिवशी आई दुर्गेच्या 'स्कंदमाता' रुपाची पूजा केली जाते. दुर्गा आईचे पाचवे रुप मोक्ष आणि प्रत्येक सुख प्रदान करते.
पाचवी माळ : ३०/सप्टेंबर/ २०२२ 
शुभ रंग : हिरवा (green)
या दिवशी आईच्या पूजेसाठी पिवळ्या रंगाची फूलं अर्पण करावी. आईला केळीचा नैवेद्य ठेवावा. यामुळे उत्तम आरोग्याची प्राप्ती होते.

नवरात्रीचा Day Six/सहावा दिवस :-

नवरात्रीच्या सहाव्या दिवशी दुर्गा मातेच्या सहाव्या रुपाचे म्हणजेच आई कात्यायनी' ची पूजा केली जाते. सहावी माळ : दि. १ / ऑक्टोबर/ २०२२ 
शुभ रंग : राखाडी 
लाल आणि पिवळ्या रंगाची फूलं आईला अर्पण करावी. यादिवशी आईला मधाचा नैवेद्य ठेवावा.
 यामुळे भक्तांच्या आकर्षण शक्तीमध्ये वृद्धी होते.

नवरात्रीचा Day Seven/सातवा दिवस :-

नवरात्रीच्या सातव्या दिवसामध्ये आई कालरात्रीची पूजा केली जाते. आईचे हे रुप खूपच शक्तीशाली मानले जाते. 
सातवी माळ : दि. २/ऑक्टोबर/२०२२ 
शुभ रंग: नारंगी 
निळ्या रंगाची फूलं अर्पण करावी. यादिवशी आईला गुळाचा नैवेद्य ठेवावा. यामुळे जीवनात असलेल्या संकटापासून मुक्ती मिळते.

नवरात्रीचा Day Eight/आठवा दिवस :-

नवरात्रीच्या आठव्या दिवशी आई 'महागौरीची पूजा केली जाते. बरीच लोकं या दिवशी कन्या पूजन देखील करतात. 
आठवी माळ : दि. ३/ऑक्टोबर/२०२२ 
शुभ रंग : मोरपंखी / peacock green 
पूजा करताना लाल, गुलाबी आणि मोरपंखी रंगाची फूल अर्पण करावी. यादिवशी आईला नारळाचा नैवेद्य ठेवावा यामुळे भक्ताची मनोकामना पूर्ण होते.

नवरात्रीचा Day Nine/नववा दिवस :-

नवरात्रीच्या नवव्या दिवशी आई 'सिद्धीदात्री' ची पूजा केली जाते. यादिवशी कन्या पूजन देखील केले जाते.
शास्त्रानुसार आईचे हे रुप सिद्धी प्रदान करणारे आहे. नववी माळ: महानवमी दि. ४ ऑक्टोबर / २०२२ 
शुभ रंग: गुलाबी 
या दिवशी आईला जास्वंदीची फूलं अर्पण करावी. यादिवशी आईला तीळ किंवा तीळापासून तयार केलेल्या पदार्थांचा नैवेद्य ठेवावा. यामुळे चांगले परिणाम होतात.


नवरात्र समाप्ती : विजयादशमी (दसरा) चांगल्या चा वाईटावर विजय..
घट हलवणे,देवीची आरती करून नारळ फोडणे. नैवेद्य दाखवणे, (पुरणपोळी/खीर पुरी) उपवास सोडणे. शेतकऱ्यांनी शेती अवजारांची पूजा करणे घराला वाहनांना झेंडूच्या माळा घाला. एकमेकांना आपट्याची पाने द्या. साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त वाहन खरेदी सोने खरेदी शुभ योग.विद्यार्थ्यांनी पाटीपूजन करावे.

दिं. 5 ऑक्टोबर 2022
शुभ दसरा
विजयादशमी (दसरा)
देवीची तळी आठवणीने भरावी.


हे सुध्दा वाचा ⤵️


FAQ
Q.1) नवरात्र उत्सव कधीपासून सुरू होत आहे ?
Ans. नवरात्र उत्सव 26 सप्टेंबर 2022 पासून सुरू होत आहे.

Q.2) नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कोणाची पुजा केली जाते ?
Ans. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पर्वतराज हिमालयाची कन्या देवी शैलपुत्री' ची पूजा केली जाते. 

Q.3) विजयादशमी (दसरा) कधी आहे ?
Ans. विजयादशमी (दसरा) 05 ऑक्टोंबर 2022 रोजी आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad