Type Here to Get Search Results !

शिक्षक दिन सुत्रसंचालन मराठी | teachers day sutrasanchalan marathi

 शिक्षक दिन सुत्रसंचालन मराठी | teachers day sutrasanchalan marathi | 5 सप्टेबर सुत्रसंचालन मराठी | 5 suptember sutrasanchalan marathi | shikshak din sutrasanchalan marathi

शिक्षक दिन २०२२ :- आगतम स्वागतम सुस्वागतम मी शिक्षण विस्तार अधिकारी भाऊसाहेब सरक सर्व प्रथम आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो व आजच्या शिक्षक दिनाच्या कार्यक्रमास सुरवात करतो....

        गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः । 
     गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः ॥

भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा 5 सप्टेंबर हा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. डॉ. राधाकृष्णन हे एक आदर्श शिक्षक, तत्त्वज्ञ आणि भारताचे माजी राष्ट्रपती होते. त्यांचा जन्मदिवस हा शिक्षकांचा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो. शिक्षक हा भावी पिढीचा शिल्पकार असून त्यांच्याकडूनच आपल्याला ज्ञान व जगाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन मिळतो. आपले गुरु अर्थातच शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस.

अध्यक्ष निवड :

नाजूक पाकळ्या किती सुंदर असतात, रंगीत कळ्या रोजच उमलत असतात... नजरेत भरणारी सर्वच असतात, पण यात राहणारी तुमच्यासारखी माणसं, फारच कमी असतात आणि तुम्ही अध्यक्ष म्हणून लाभलात हे आमचं भाग्य......

आजच्या शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान श्री.... यानी स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो..... अनुमोदन : यानंतर सहकारी शिक्षक यांनी अध्यक्ष निवडीला अनुमोदन द्यावे.

कार्यक्रमाचे मार्गदर्शक :

अध्ययनरुपी संस्कार घेतल्यावर स्पर्धेच्या युगाची यशस्वी सुरुवात करण्यासाठी व अन्यायाचा प्रतिकार करण्याच बळ आपल्याला लाभण्यासाठी आपल्याकडून नेहमी सत्कर्म घडण्यासाठी जेष्ठांचे नेहमीच मार्गदर्शन हवे असते म्हणून आजच्या कार्यक्रमात ... हे मार्गदर्शक म्हणून स्थान स्विकारतील अशी मी त्यांना विनंती करतो.....

प्रमुख पाहुणे :

             असतो मा सद गमय... 
             तमसो मा ज्योतिर्गमय... 
             मृत्योर्मा अमृतं गमय ...

वाईटाकडून चांगल्याकडे, अंधारातून प्रकाशाकडे आणि मरणशिलतेतून अमरत्वाकडे नेणारे व कुशल नेतृत्व असलेले आजचे आपले प्रमुख पाहुणे श्री... हे स्थान स्विकारतील अशी मी त्यांना विनंती करतो.

कार्यक्रमाबद्दल माहिती :

शिक्षक हा समाज परिवर्तन करणारा एक प्रमुख घटक आहे. भविष्यातले विचारवंत, कलाकार, लेखक, तत्त्वज्ञ, पुढारी, डॉक्टर, इंजिनिअर, प्राध्यापक, शास्त्रज्ञ इ. तयार करण्याचे सामर्थ्य शिक्षकांमध्ये असते. ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला कुंभार आकार देऊन त्यापासून एखादी प्रतिकृती तयार करतो, अगदी त्याचप्रमाणे शिक्षक बालकांच्या कोऱ्या मनावर योग्य संस्कार करून त्यातून भविष्यातील जबाबदार नागरिक घडवीत असतात. आपल्या आई-वडिलांनंतर शिक्षक हे आपले अप्रत्यक्षरीत्या पालकच असतात. शिक्षक हे आपल्याला केवळ पुस्तकी ज्ञान शिकवित नाहीत तर आपण त्यांच्याकडून जगण्याची कला आत्मसात करतो.
              गुमनामी के अंधेरे मे था,
                पहचान बना दिया । 
               दुनिया के गम से मुझे, 
                अंजान बना दिया ।
               उनकी ऐसी कृपा हुई, 
               गुरु ने मुझे एक अच्छा 
                  इंसान बना दिया ।

सरस्वती पूजन : दिपप्रज्वलन -

गुरुवर के चरणों में रहकर हमने शिक्षा पाई है, गलत राह पर भटके जब हम, तो गुरुवरने राह दिखाई है, अज्ञानता को दूर करके ज्ञान की ज्योत जलाई है, चलो एक और ज्योत है.....

आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहूणे यांना मी विनंती करतो की, त्यानी सरस्वती पूजन व दिपप्रज्वलन करावे. (पुन्हा पाहूण्यांना मंचावर बसण्यास विनंती करणे.)

स्वागत :

आयुष्य जरी एक दिवसाचे काम त्याचे लाख मोलाचे, सुख दुःखात असतो सोबती, फुलांची ही थोर महती....
घेवू शिकवण आपण फुलांकडून, सुख दुःख वाटू सर्व मिळून आयुष्यात असेल आपल्याही सुगंध दृढ होतील ऋणाणुबंध..

आजच्या पाहुण्यांचं स्वागत करण आपल्यासाठी भाग्याचे आहे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री ..... यांचे स्वागत हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे श्री... यांचे स्वागत .....हे यांचे सकरतील अशी मी त्याना विनंती करतो स्वागत गीत - अतिथी देवो भवः म्हणून शब्द सुमनांनी स्वागत करण्यासाठी येत आहे. स्वागत गीत....

शिक्षकांचा सत्कार :

मान्यवरांचा स्वागत व सत्कार झाल्यानंतर सर्व शिक्षकांचा यथोचित सत्कार करण्यात यावा....

             सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे
            सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस
           सोनेरी दिवसांच्या सोनेरी शुभेच्छा
      केवळ माझ्या सोन्यासारख्या शिक्षकांना💐💐

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या अग्निपंख या जीवनीमध्ये त्यांनी डॉ. राधाकृष्णन यांच्या कार्याचा आणि विज्ञाननिष्ठ दृष्टिकोनाचा विस्तृत उल्लेख केला आहे. ते एक आदर्श शिक्षक होते. त्यांनी 40 वर्षे शिक्षक म्हणून ज्ञानदानाचे पवित्र कार्य करतानाच एक सुसंस्कारित पिढी घडवण्याचे काम केले. विद्यार्थ्यांना मूल्यधारीत शिक्षण देऊन सामाजिक स्तर उंचावण्या कामे त्यांचे योगदान अतुलनीय आहे. त्यांच्या याच कार्याचा सन्मान म्हणून या दिवशी शिक्षण क्षेत्रात विशेष आणि उल्लेखनीय काम करणाऱ्या शिक्षकांचा पुरस्कार देऊन गौरव केला जातो.

मान्यवरांचा परिचय :

सुर्य बोलत नाही... त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देत असतो. उत्तम कर्म करत रहा, लोकंच तुमचा परिचय देतील.. 
असेच सुर्याचे तेज असलेले व सदैव उत्तम कार्य करून आपल्यासाठी आदर्श निर्माण करणारे आपले मान्यवर आहेत. आज आपले भाग्य म्हणून आपल्याला हे मान्यवर म्हणून लाभले आहेत. म्हणून व्यासपीठावरील पाहुण्यांचा परिचय करून देणे आवश्यक आहे. त्यासाठी मी.. यांना आमंत्रीत करतो.

प्रास्ताविक :

गुरुजनांचा आशीर्वाद घेऊन, साथ द्यावी सर्वांनी मिळून..... आजच्या कार्यक्रमाचा उद्देश, जाणून घ्यावा प्रास्ताविकातून...

                  गुरुजनांचा आशीर्वाद घेऊन,
                  साथ द्यावी सर्वांनी मिळून..... 
                  आजच्या कार्यक्रमाचा उद्देश, 
                  जाणून घ्यावा प्रास्ताविकातून...

आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक .... हे सादर करतील अशी मी त्याना विनंती करतो.... प्रास्ताविक......

विद्यार्थी व शिक्षक भाषणे :-

शिक्षक म्हणजे विशाल वृक्षच असतो. ज्याच्या फांदी फांदीतून सळसळत असतात बेदरकारपणे ज्ञानाची पाने. त्याच्याच छायेखाली सौख्य लाभते अज्ञानाच्या उन्हात न्हावून निघालेल्या अस्फुट चितकारांना किंवा त्याच्याच रेषेखाली अधांतरी लटकलेली असतात कित्येक भावनांच्या डोहात भिजून नतमस्तक झालेली येवल्याशा चेहऱ्याची निरागस अक्षरे. शिक्षक नसतो कधीच बिचारा, तोच तर असतो सर्वस्वी बादशहा शाळेचा! त्याच्या स्वामित्वाने महत्व येते शाळेला. तोच तर असतो खरा संशोधक, शास्त्रज्ञ, नखशिखांत अंधार भरलेल्या चिमुकल्या गोळ्यातून सूर्याचे तेज बाहेर काढणारा.. तो समाज सुधारक, क्रांतिकारकही तोच. कित्येक चेतनांना पाठबळ असते त्याच्या समर्थ तत्त्वज्ञानाचे शिक्षकाला जपावी लागतात कुतूहलाच्या झाडाची पाने... जीवापाड आणि आकार द्यावा लागतो एका मुक्तपणे बागडणाया निराकार चैतन्याला... कधी स्वतःला विसरून बागडावही लागतं. जाणून घ्यावी लागतात बोल खोल काळजाच्या आत निर्गमपणे.. कधी अंधारही प्यावा लागतो बिन बोभाट पणे. तेव्हा कुठे चमकतात उजेडाची किरणे उद्दिष्टांच्या वाटेवर. त्याच्या सोबतीत असतेच ती खडूची धारदार तलवार आणि फळ्याची ढाल असते पाठीशी.. विश्वास ठेवा एक ना एक दिवस अंधार संपून उजेडाचे राज्य येईल आणि तेव्हा मात्र शिक्षक म्हणून त्याची प्रतिमा अधिक स्पष्ट दिसेल...

मुख्य मार्गदर्शकाचे मनोगत :

जर तुमचे विचार श्रेष्ठ असतील, तर तुमचे ह्रदय हे देखील कोणत्याही मंदिरापेक्षा कमी नाही! असेच श्रेष्ठ विचारसरणीचे श्री... हे आपले विचार व्यक्त करतिल अशी मी त्यांना विनंती करतो.. मंजिले मिले या ना मीले ये तो किस्मत की बात है, पर कोशीश भी ना करे, ये तो भाई गलत बात है.. म्हणून आपण आपले प्रयत्न सोडू नयेत.

प्रमुख पाहुण्यांचे मार्गदर्शन :

सातत्याने प्रयत्न करणे आणि आपल्या प्रकृतीला, स्वभावाला योग्य ती पद्धत निवडणे महत्वाचे असते. या दृष्टीने गुरुंचै मार्गदर्शन आवश्यक ठरते. म्हणून आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे आपले विचार व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करतो. प्रमुख पाहूणे... प्रत्येकाच्या मार्गदर्शनानंतर थोड बोलाव.

अध्यक्षीय भाषण :

कोणत्याही गोष्टीला यशस्वी करण्यासाठी चांगले नेतृत्व असणे गरजेचे आहे तसेच कोणत्याही कार्यक्रमातून ध्येयनिश्चिती साधायची असेल तरीही नेतृत्व महत्वाचे आहे म्हणून आजचा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कार्यक्रमाचे नेतृत्व म्हणजेच कार्यक्रमचे अध्यक्ष...

आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री....... यांना मी विनंती करतो, की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे...

आभार प्रदर्शन :

वा-याच्या झुळकेने मन सुखावते, झाडाच्या सावलीत मन विसावते. सुर्याच्या कोवळ्या किरणांनी प्रसन्न वाटतं...

तसेच आजच्या कार्यक्रमातील मान्यवरांच्या उपस्थितीने कार्यक्रम शोभा वाढली. म्हणून त्याच्या कृत्याची जाणिव असणं महत्वाचे व आभार प्रदर्शन हे त्या जाणिवेच शब्द रूप आहे. म्हणून आजच्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन... हे करतील अशी मी त्याना विनंती करतो......



हे सुध्दा वाचा ⤵️


FAQ
Q.1) शिक्षक दिन कधी साजरा केला जातो ?
Ans.भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा 5 सप्टेंबर हा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. 

Q.2) शिक्षक दिन का साजरा केला जातो ?
Ans. शिक्षक (गुरू) यांच्याप्रती आदर, सद्भावन आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शिक्षक दिन साजरा केला जातो.

Q.3) शिक्षक दिन कधी असतो ?
Ans. शिक्षक दिन 5 सप्टेंबर रोजी असतो.






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad