google-site-verification=mhQXPDL6t29v0SBU3tM2gsf6ieXw2vbDeuweOWGfOg0 माझा आवडता सण दिवाळी निबंध मराठी | maza avdta san diwali nibandh marathi
Type Here to Get Search Results !

माझा आवडता सण दिवाळी निबंध मराठी | maza avdta san diwali nibandh marathi

 माझा आवडता सण दिवाळी निबंध मराठी |  maza avdta san diwali nibandh marathi | Essay on my favorite festival diwali 2022 | माझा आवडता सण दिवाळी १० ओळी निबंध मराठी | 10 line essay on my favorite festival diwali 

दिवाळी २०२२ :- नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या सर्वांचा आवडता सण म्हणजे दिवाळी २०२२ याविषयी माहिती बघणार आहोत. 

माझा आवडता सण दिवाळी निबंध मराठी

सर्वप्रथम तुम्हाला व तुमच्या परिवारातील सदस्यांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. दिवाळीनिमित्त आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत "माझा आवडता सण दिवाळी निबंध मराठी" दिवाळी निबंध तुम्हाला तुमच्या शालेय जीवनात विविध प्रकारच्या स्पर्धासाठी, निबंध लेखनासाठी उपयोगी पडेल.

माझा आवडता सण दिवाळी निबंध मराठी |  maza avdta san diwali nibandh marathi

माझा आवडता सण दिवाळी :-

दिवाळी हा माझा आवडता सण आहे. दिवाळी या सणाला 'दिपावली असेही म्हणतात. दरवर्षी हा सण ऑक्टोंबर किंवा नोव्हेंबर महिन्यात साजरा केला जातो.
दिवाळी हा सण पाच दिवसांचा असतो. दिवाळीचे धनत्रयोदशी नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलि प्रतिपदा व भाऊबीज असे पाच दिवस असतात. दिवाळीच्या मुख्य दिवशी आम्ही माता लक्ष्मीचे पूजन करतो. त्याचबरोबर घरातील पैसा व संपत्तीचे पूजन करतो.

दिवाळीला आम्ही पहाटे लवकर उठतो. सुगंधी उटणे लावून स्नान करतो. घरातील सर्वजण नवीन कपडे परिधान करतो. अंगणात सुंदर रांगोळी काढतो. संध्याकारी काळी घरावर आकाशकंदिल लावतो.घरात अंगणात सर्वत्र दिवे लावतो.घर दिव्यांनी उजळून निघते. गावात सर्वत्र दिव्यांची रोषणाई केली जाते.

दिवाळीला सर्वत्र उत्साहाचे व आनंदाचे वातावरण असते. घरोघरी लाइ, चकल्या, करंज्या, चिवडा असे विविध फराळाचे पदार्थ बनवले जातात. मी माझ्या मित्रांना व पाहुण्यांना फराळाला बोलावतो. सगळेजण एकत्र फराळ करतो. एकमेकांना फराळाचे पदार्थ आणि
भेटवस्तू देतो.

या सणाला शाळेला सुट्टी असते. मी माझ्या घराजवळ लाल म किल्ला तयार करतो. या किल्ल्यावर शिवाजी महाराज व माळ मावळ्यांच्या सुंदर मूर्ती ठेवतो.
दिवाळी हा सण आम्हांला प्रेम व बंधुभावाची शिकवण देतो. मी या सणाची दरवर्षी खूप आतुरतेने वाट पाहतो.


माझा आवडता सण दिवाळी १० ओळी निबंध मराठी | 10 line essay on my favorite festival diwali 

माझा आवडता सण दिवाळी :-

१) माझा आवडता सण दिवाळी आहे.

२) दिवाळीला 'दिपावली' असेही म्हणतात.

३) आपण हा सण ऑक्टोंबर किंवा नोव्हेंबर महिन्यात साजरा करतो.

(४) दिवाळी हा प्रकाशाचा सण आहे...

५) दिवाळीला दिवे, पणत्या, मेणबत्त्या, आकाशकंदिल इ. घरोघरी लावले जातात.

६) या दिवशी आम्ही लवकर उठून सुगंधित उटणे लावून स्नान करतो.

७) या सणाला घराबाहेर सुंदर
रांगोळी काढली जाते.

८) दिवाळीला मी व माझे मित्र सुंदर किल्ला तयार करतो.

९) घरी लाडू, करंज्या, चकल्या, चिवडा, शंकरपाळ्या इ. फराळाचे पदार्थ बनवले जातात.

१०) असा हा दिवाळी सण मला खूप खूप आवडतो.


हे सुध्दा वाचा ⤵️

FAQ
Q.1) दिवाळी २०२२ कधी आहे ?
Ans. दिवाळी २४ ऑक्टोंबर पासून सुरू होत आहे.

Q.2) दिवाळी हा सण आपण कोणत्या महिन्यात साजरा करतो ?
Ans. दिवाळी हा सण ऑक्टोंबर किंवा नोव्हेंबर महिन्यात साजरा करतो.

Q.3) माझा आवडता सण दिवाळी निबंध मराठी कसा लिहावा ?
Ans. माझा आवडता सण दिवाळी निबंध मराठी बघण्यासाठी खालील वेबसाईटला नक्की भेट द्या 👇


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad