google-site-verification=mhQXPDL6t29v0SBU3tM2gsf6ieXw2vbDeuweOWGfOg0 पंडित जवाहरलाल नेहरू भाषण निबंध मराठी | pandit Jawaharlal Nehru speech marathi
Type Here to Get Search Results !

पंडित जवाहरलाल नेहरू भाषण निबंध मराठी | pandit Jawaharlal Nehru speech marathi

 पंडित जवाहरलाल नेहरू भाषण निबंध मराठी | pandit Jawaharlal Nehru speech essay in marathi | pandit Jawaharlal Nehru bhashan nibandh marathi pdf | pandit Jawaharlal Nehru 10 line speech in marathi

पंडित जवाहरलाल नेहरू जयंती :- नमस्कार मित्रांनो आज 14 नोव्हेंबर हा दिवस पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती म्हणजेच 'बालदिन' याबद्दलची माहिती बघणार आहोत. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त भाषण, निबंध मराठी माहिती आपण खालील लेखात बघणार आहोत. पंडित जवाहरलाल नेहरू भाषण निबंध तुम्ही शेवटपर्यंत वाचावा ही नम्र विनंती.

पंडीत जवाहरलाल नेहरू भाषण निबंध मराठी | pandit Jawaharlal Nehru bhashan nibandh marathi

                  चाचा नेहरू प्यारे थे,
             भारतमाता के राजदुलारे थे,
             देश के पहले प्रधानमंत्री थे,
                स्वतंत्रता के सेनानी थे!

जगाच्या पाठीवर फारच थोड्या नेत्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर सन्मान लाभला. त्यातीलच एक महान नेतृत्व म्हणजे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू होय.

पंडीत नेहरूंचा जन्म १४ नोव्हेंबर १८८९ रोजी झाला. ...त्यांना लहान मुलं फार आवडत. मुले त्यांना आदराने 'चाचा नेहरू' म्हणत. म्हणूनच त्यांचा जन्मदिन आज भारतभर 'बालदिन' म्हणून साजरा केला जातो.

बालपण अतिशय अलिशान श्रीमंतीत व शिक्षण पाश्चात्य वातावरणात होऊनही त्यांच्या निष्ठा मात्र सदैव भारतभूमीशी बांधील राहिल्या. गांधीजींच्या गांधीजींच्या विचारांचा त्यांच्यावर विलक्षण प्रभाव होता. म्हणूनच - त्यांनी गांधीजींचे नेतृत्व त्यांनी मान्य केले होते. देशाच्य स्वातंत्र्यासाठी गांधीजींनी केलेल्या सर्व चळवळींमध्ये नेहरू सक्रीय होते.

उत्तर प्रदेशातील किसान सभेचे अध्यक्ष असतांना ते ग्रामीण भागात फिरले. सामान्य माण- सांमध्ये सामान्य बनून राहिले. गरिबांच्या व्यथा त्यांनी उघड्या डोळ्यांनी पाहिल्या आणि देशाच दारिद्र्य दूर करून जनतेचा विकास करणे हेच आपले - परम कर्तव्य मानले.

१९४७ साली देशाच्या हाती असलेल्या स्वराज्याचे सुराज्यात रूपांतर करण्यासाठी भारताचा हा पहिला पंतप्रधान अवितपणे प्रयत्न करीत राहिला तब्बल सतरा वर्षे पंतप्रधान म्हणून भारताच्या पुनर्निर्माणाचा ध्यास त्यांनी घेतला.

देशाचे दारिद्र्य दूर करून जलद आर्थिक विकास साधण्यासाठी नियोजनाचा नवा मूलमंत्र त्यांनी देशाला दिला. पंचवार्षिक योजना ही त्यांचीच देणगी आहे, औदयोगिक, वैज्ञानिक व तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगतीचे बीजारोपण भारतभुमीवर करण्याचे महान कार्य नेहरूंनी केले.

राष्ट्रीय एकात्मता अबाधित राहून देशामध्ये धर्मनिरपेक्ष शासन प्रस्थापित व्हावे असा आग्रह नेहरूंनी सुरुवातीपासूनच धरला होता. एकूणच पारतंत्र्यातून मुक्त झाल्यानंतर भारताने फिनिक्स पक्षाप्रमाणे .जी उंच भरारी घेतली त्यामागे पंडीत नेहरूंचा महत्त्वाचा वाटा होता.

स्वतंत्र भारताची उभारणी करत असतानाच जगातील इतर राष्ट्रांनाही गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यासाठी शांतता, सामंजस्य, विचार-विनिमय या मार्गांचा अवलंब केला.नेहरूंनी संपूर्ण जगाला शांतीचा संदेश दिला. मानवाची -प्रतिष्ठा राखली जाऊन प्रत्येकजण भयमुक्त व स्वयंपूर्ण झाला पाहिजे म्हणून त्यांनी समाजवादाचाही पुरस्कार केला. दुसऱ्या महायुध्दानंतर जागतिक पातळीवर निर्माण झालेला असंतोष मिटविण्यासाठी त्यांनी अनेक वर्षे प्रयत्न सुरू केले. संपूर्ण जगाला त्यांनी शांततेचा संदेश दिला.

'पंचशील तत्त्वांसारखी' मौल्यवान देणगी नेहरूनी जगाला बहाल केली म्हणूनच जागतिक शांतिदूत म्हणून संपूर्ण जग त्यांना ओळखत होते.

जय हिंद, जय महाराष्ट्र !




पंडित जवाहरलाल नेहरू १० ओळी भाषण मराठी | pandit Jawaharlal Nehru 10 line speech in marathi

1) अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो...सर्वप्रथम सर्वांना बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

2) पंडित जवाहरलाल नेहरू यांना लहान मुले फार आवडत म्हणून त्यांचा जन्मदिन सर्वत्र 'बालदिन'
म्हणून साजरा करतात.

3) पं. नेहरू यांचा जन्म १४ नोव्हेंबर १८८९ रोजी अलाहाबाद येथे झाला.

4) त्यांच्या आईचे नाव स्वरूपाराणी व वडिलांचे नाव मोतीलाल नेहरू होते.

5) लहान मुले प्रेमाने त्यांना 'चाचा नेहरू म्हणून बोलावत असत.

6) ते म. गांधीजींना आपला आदर्श मानत असत. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होऊन ब्रिटीश शासनाविरुद्ध त्यांनी आवाज उठवला.

7) देशासाठी त्यांनी बऱ्याचदा तुरुंगवास भोगला होता पण त्यांनी हार मानली नाही.

8) अखेर पं. नेहरू यांच्यासारख्या नेत्यांमुळेच आपल्या देशाला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले.

9) स्वातंत्र्यानंतर आपल्या भारत देशाचे ते पहिले पंतप्रधान झाले. दि. २७ मे १९६४ रोजी त्यांचे निधन झाले.

10) पं. नेहरू यांचे विचार आपणास नेहमीच प्रेरणा देत राहतील. अशा या थोर नेत्यास माझे कोटी कोटी प्रणाम !


हे सुध्दा वाचा ⤵️



FAQ
Q.1) पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म कधी झाला ?
Ans. पंजाब जवाहरलाल नेहरू यांचा जन्म १४ नोव्हेंबर १८८९ रोजी अलाहाबाद येथे झाला.

Q.2) पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन बालदिन म्हणून का साजरा केला जातो ?
Ans.पंडित जवाहरलाल नेहरू यांना लहान मुले फार आवडत म्हणून त्यांचा जन्मदिन सर्वत्र 'बालदिन'
म्हणून साजरा करतात.

Q.3) पंडित जवाहरलाल नेहरू यांचे निधन कधी झाले ?
Ans. पंडित जवाहरलाल नेहरू यांचे दि. २७ मे १९६४ रोजी निधन झाले.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad