google-site-verification=mhQXPDL6t29v0SBU3tM2gsf6ieXw2vbDeuweOWGfOg0 संविधान दिन मराठी भाषण | Samvidhan din speech in marathi
Type Here to Get Search Results !

संविधान दिन मराठी भाषण | Samvidhan din speech in marathi

 संविधान दिन मराठी भाषण | Samvidhan din speech in marathi | Samvidhan din bhashan marathi pdf | संविधान दिन भाषण मराठी | 26 नोव्हेंबर संविधान दिन भाषण मराठी

संविधान दिन भाषण मराठी :- नमस्कार मित्रांनो आज आपण २६ नोव्हेंबर रोजी साजरा केला जाणारा दिवस म्हणजे संविधान दिन यानिमित्त आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत.
संविधान दिनाच्या निमित्ताने आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत संविधान दिन भाषण मराठी आणि हे भाषण तुम्ही शेवटपर्यंत वाचावे ही नम्र विनंती.

संविधान दिन मराठी भाषण | Samvidhan din speech in marathi

आदरणीय व्यासपीठ, व्यासपीठावरील मान्यवर, वंदनीय गुरुजनवर्ग व माझ्या लाडक्या मित्र-मैत्रिणीनों.....
सर्वप्रथम सर्वांना संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

दरवर्षी २६ नोव्हेंबर हा दिवस भारतात 'संविधान दिन' म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. भारताची राज्यघटना हे भारताचे संविधान आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली २९ ऑगस्ट १९४७ रोजी मसुदा समिती स्थापन केली गेली. अनेक बैठका व चर्चासत्रानंतर मसुदा समितीने सादर केलेला मसुदा २६ नोव्हेंबर १९४९ रोजी स्विकारला गेला. म्हणूनच, २६ नोव्हेंबर हा दिवस 'संविधान दिन' म्हणून साजरा केला जातो.

भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. हे संविधान सर्व भारतीयांना एकता, न्याय, समता व बंधुता या मूल्यांच्या आधारावर एकत्र जोडते. त्यातील मौलिक तत्त्वे, मुलभूत अधिकार व कर्तव्ये सर्व भारतीयांना संस्कारित करणारी आहेत.
मित्र हो, भारतीय संविधान हे जगातील सर्वोत्तम संविधानापैकी एक आहे. हे संविधान लिहण्यासाठी २ वर्षे ११ महिने व १८ दिवस इतका कालावधी लागला होता.

भारत सरकारने २६ नोव्हेंबर २०१५ मध्ये प्रथमच 'संविधान दिन' साजरा केला. संविधान दिनाचा उद्देश्य हा संविधानाबद्दल जनजागृती करणे व डॉ. बाबासाहेबांच्या विचारांचा प्रसार सर्वत्र करणे हा आहे. चला तर मग आपण सर्वांनी एकजुटीने आपले हक्क, कर्तव्य व जबाबदाऱ्या उत्तमरीत्या पार पाडूया.

            शेवटी मला म्हणावेसे वाटते की,
                     नको राजेशाही,
                     नको ठोकशाही,
                 संविधानाने दिली आम्हां,
                     महान लोकशाही....
                      महान लोकशाही

         जय भीम, जय भारत !! धन्यवाद !



हे सुध्दा वाचा ⤵️



FAQ
Q.1) संविधान दिन कधी साजरा केला जातो ?
Ans. संविधान दिन २६ नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो.

Q.2) संविधानाचे शिल्पकार कोण होते ?
Ans. संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर हे होते.

Q.3) भारताचे संविधान लिहिन्यासाठी किती वेळ लागला होता ?
Ans. भारताचे संविधान लिहण्यासाठी २ वर्षे ११ महिने व १८ दिवस इतका कालावधी लागला होता.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad