Type Here to Get Search Results !

संत ज्ञानेश्वर निबंध भाषण मराठी माहिती | sant dnyaneshwar essay in marathi

 संत ज्ञानेश्वर निबंध भाषण मराठी माहिती | sant dnyaneshwar essay in marathi | संत ज्ञानेश्वर माहिती मराठी pdf| sant Dnyaneshwar nibandh marathi pdf | संत ज्ञानेश्वर १० ओळी निबंध मराठी |10 line essay on sant Dnyaneshwar

संत ज्ञानेश्वर निबंध भाषण मराठी माहिती

संत ज्ञानेश्वर निबंध मराठी :- नमस्कार मित्रांनो आज आपण संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या विषयी निबंध, भाषण मराठी माहिती बघणार आहोत. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या विषयी १० ओळी निबंध मराठी देखील बघणार आहोत. संत ज्ञानेश्वर निबंध भाषण तुम्हाला तुमच्या शालेय जीवनात विविध प्रकारच्या स्पर्धासाठी नक्की उपयोगी पडेल. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या विषयीची खालील संपूर्ण माहिती तुम्ही शेवटपर्यंत वाचावी ही नम्र विनंती.

संत ज्ञानेश्वर निबंध भाषण मराठी | Sant Dnyaneshwar nibandh bhashan marathi

             वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे !
                पक्षी ही सुखरे आळवीती !!

संत ज्ञानेश्वर हे तेराव्या शतकातील अलौकिक प्रतिभा असणारे महान मराठी संत होते. त्यांचा जन्म ई.स. १२७५ मध्ये औरंगाबाद जिल्हयातील आपेगाव या गावी झाला. त्यांच्या आईचे नाव रुक्मिणीबाई व वडिलांचे नाव विठ्ठलपंत हे होते.

विठ्ठलपंत हे संन्यास घेऊन पुन्हा गृहस्थाश्रमात परतले होते. गृहस्थाश्रमात परतल्यानंतर त्यांना निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान व मुक्ताबाई ही चार मुले जन्मली होती. त्यावेळच्या समाजाने विठ्ठलपंत व त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचा अतोनात छळ केला. समाजाने त्यांना "संन्याशाची मुले' म्हणून वाळीत टाकले.

संत ज्ञानेश्वर हे ज्ञानाचे मूर्तिमंत प्रतिक होते. ते विठ्ठलाचे परमभक्त होते. ज्ञानेश्वरांनी लहानपणापासून लोकनिंदेकडे लक्ष न देता आध्यात्मिक प्रगती केली. त्यांनी वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी मराठीतील सर्वश्रेष्ठ ग्रंथ 'ज्ञानेश्वरी' ची रचना केली.

ज्ञानेश्वरी सर्व स्तरातील लोकांना भुरळ घालते. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून संस्कृत भाषेतील ज्ञान प्राकृत भाषेत आणले. ज्ञानेश्वरीतील सुमारे ९००० ओव्यातील भक्तीचा ओलावा व विचारांची संपन्नता अतुलनीय आहे.

ज्ञानसूर्य ज्ञानेश्वरांचा तत्वज्ञानातील सर्वश्रेष्ठ ग्रंथ अनुभवामृत किंवा अमृतानुभव हा स्वरचित ग्रंथ आहे. त्यातील ८०० ओव्या त्यांच्या प्रतिभेची खोली व्यक्त करतात. 'चांगदेव पासष्टी' या ग्रंथाद्वारे ज्ञानेश्वरांनी महान योगी चांगदेवाचे गर्वहरण करून त्यांना उपदेश दिला.

ज्ञानेश्वरांचा 'हरिपाठ' हा उत्कृष्ट नामस्मरणाचा नामपाठ आहे. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या शेवटच्या अध्यायात विश्व कल्याणासाठी प्रार्थना अर्थात 'पसायदान' लिहले.

संत ज्ञानेश्वर हे महाराष्ट्रातील एक थोर योगी, तत्त्वज्ञानी संतकवी होते. त्यांनी वयाच्या २१ व्या वर्षी इंद्रायणी नदीतीरी आळंदी येथे संजीवन समाधी घेतली. संत ज्ञानेश्वरांचे कार्य पाहून आजही मन अचंबित होते.



संत ज्ञानेश्वर १० ओळी निबंध मराठी | 10 line essay on Sant Dnyaneshwar nibandh marathi


१) संत ज्ञानेश्वर हे १३ शतकातील प्रसिद्ध  मराठी कवी आणि संत होते.

२) त्यांचा जन्म २२ ऑगस्ट १२७५ साली आपेगाव, पैठण येथे झाला.

३) त्यांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत आणि आईचे नाव रुक्मिणीबाई असे होते.

 ४) निवृत्तिनाथ हे थोरले बंधू व सोपानदेव मुक्ताबाई ही लहान भावंडे होती. 

५) ते भागवत संप्रदायाचे प्रवर्तक योगी व तत्वज्ञ होते.

६) वयाच्या १६ व्या वर्षी ज्ञानेश्वरी आणि अमृतानुभव यांची रचना केली. 

७) भावार्थदीपिका, अमृतानुभव, चांगदेपा- -सष्टी व हरिपाठ अभंग या त्यांच्या काव्यरचना आहेत.

८) समाज उध्दाराचे कार्य त्यांनी केले.

 ९) भारत सरकारने १९९७ साली ज्ञाने- 1-श्र्वरांचे रु ५/- चे पोस्टल स्टॅम्प प्रकाशित केले.

१०) संत ज्ञानेश्वरांनी १२९६ मध्ये आळंदी येथे संजीवनी समाधी घेतली.




हे सुध्दा वाचा ⤵️



FAQ
Q.1) संत ज्ञानेश्वर यांचा जन्म कधी झाला ?
Ans.संत ज्ञानेश्वर यांचा जन्म २२ ऑगस्ट १२७५ साली आपेगाव, पैठण येथे झाला.

Q.2) संत ज्ञानेश्वर यांच्या आई आणि वडीलांचे नाव काय होते ?
Ans. संत ज्ञानेश्वर यांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत आणि आईचे नाव रुक्मिणीबाई असे होते.

Q.3) संत ज्ञानेश्वरांनी समाधी कधी घेतली ?
Ans.संत ज्ञानेश्वरांनी १२९६ मध्ये आळंदी येथे संजीवनी समाधी घेतली.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad