google-site-verification=mhQXPDL6t29v0SBU3tM2gsf6ieXw2vbDeuweOWGfOg0 संत तुकाराम निबंध भाषण मराठी माहिती | Sant Tukaram essay in marathi
Type Here to Get Search Results !

संत तुकाराम निबंध भाषण मराठी माहिती | Sant Tukaram essay in marathi

 संत तुकाराम निबंध भाषण मराठी माहिती | Sant Tukaram essay in marathi pdf | संत तुकाराम मराठी माहिती pdf| sant Tukaram nibandh marathi pdf | संत तुकाराम १० ओळी निबंध मराठी | 10 line essay on sant tukaram

संत तुकाराम निबंध भाषण मराठी माहिती

संत तुकाराम निबंध मराठी :- नमस्कार मित्रांनो आज आपण संत तुकाराम यांच्या विषयी निबंध, भाषण मराठी माहिती बघणार आहोत. संत तुकाराम यांच्या विषयी १० ओळी निबंध मराठी देखील बघणार आहोत. संत तुकाराम निबंध भाषण तुम्हाला तुमच्या शालेय जीवनात विविध प्रकारच्या स्पर्धासाठी नक्की उपयोगी पडेल. संत तुकाराम महाराज यांच्या विषयीची खालील संपूर्ण माहिती तुम्ही शेवटपर्यंत वाचावी ही नम्र विनंती.

संत तुकाराम निबंध भाषण मराठी | sant tukaram essay in marathi

          असाध्य ते साध्य करिता सायास !
             कारण अभ्यास तुका म्हणे !!
अशा प्रकारचे एकापेक्षा एक नितांतसुंदर अभंग महान संत तुकाराम महाराजांनी रचले.

संत तुकाराम हे इ.स. सतराव्या शतकातील थोर वारकरी संत होते. संत तुकारामांचा जन्म पुणे जिल्ह्यातील देहू या गावी झाला.

त्यांच्या आईचे नाव कनकाई व वडिलांचे नाव बोल्होबा असे होते. संत तुकाराम यांचे पूर्ण नाव तुकाराम बोल्होबा आंबिले हे होते. त्यांच्या घराण्यात पंढरीची वारी करण्याची पूर्वापार प्रथा होती. त्यांना सावजी हा मोठा भाऊ तर कान्होबा हा धाकटा भाऊ होता.
तुकाराम महाराजांना संसार असूनही ते परमार्था_ कडे वळले.

तुकारामांना वारकरी जगद्गुरू म्हणून ओळखतात. महाराष्ट्राचे आराध्य दैवत, रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज तुकोबांना गुरु मानत. संत बहिणाबाई ही तुकारामांची शिष्या होती.संत तुकारामांनी तुकाराम गाथा लिहली, तिच्यामध्ये पाच हजारांवर अभंग आहेत.

पंढरपूरचे विठ्ठल हे त्यांचे आराध्य दैवत होते. त्यांनी विठ्ठलावर तसेच समाजावर अनेक उपदेशपर अभंग, कीर्तने रचली.

लहानपण देगा देवा | मुंगी साखरेचा रवा | 
                       तसेच
नाही निर्मळ जीवन | काय करील साबण |

अशी अनेक अभंगे त्यांच्या कुशाग्र बुद्धि- मत्तेचे दयोतक आहेत. त्यांच्या अभंगातील गोडवा अतुलनीय आहे. त्यांच्या अभंगाना स्वतःचा बाज, आगळे सौदर्यं आहे. त्यातील शब्द प्रत्येकाच्या मनाला भुरळ घालतात. वार करी संप्रदायाची एक अखंड परंपरा त्यांनी निर्माण केली.

सतराव्या शतकात सामाजिक प्रबोधनाची प्रभावी मुहूर्तमेढ संत तुकाराम महाराजांनी रोवली. त्या काळी समाजातील अंधश्रध्दा दूर करून समाजाला अचूक, योग्य दिशा देण्याचे महत्वपूर्ण, महान कार्य तुकोबांनी केले .स्वतःच्या सुखापेक्षा तुकोबांनी जगाच्या कल्याणाकडे सदैव लक्ष दिले.

फाल्गुन वद्य द्वितीयेला तुकारामांचे सदेह वैकुंठ-गमन झाले असे मानले जाते. हा दिवस 'तुकाराम बीज' म्हणून ओळखला जातो. तुकाराम महाराजांच्या जीवनपटा- वर अनेक पुस्तके, मालिका, चित्रपट प्रसिध्द झाले आहेत.

आजही मराठी भाषेत सुप्रसिद्ध असलेल्या अनेक म्हणी, वाक्प्रचार, शब्दप्रयोग आपण तुकारामांच्या गाथेतूनच घेतलेल्या आहेत. आजच्या समाजाला संत तुकारामांचे अभंग नवी दिशा देतात.
आज आपण विज्ञान-तंत्रज्ञानात खूप प्रगती केली तरी प्रत्येकाला अनेक कौटुंबिक, सामा- जिक, भावनिक समस्या भेडसावतात.

त्या सर्वांवर तुकोबांच्या अभंगातून नक्की मार्ग सापडेल. नाहीतर आपली अवस्था तुझे आहे तुजपाशी, परि तू जागा चुक- लासी अशी होईल. आपल्या देशात संत तुकाराम महाराज जन्मास आले हे प्रत्येक भारतीयाचे अहोभाग्यच म्हणावे लागेल.


संत तुकाराम १० ओळी निबंध मराठी | 10 line essay on sant tukaram

1) संत तुकाराम हे इ. स. सतराव्या शतकातील संत, वारकरी-कवी होते.

 2) त्यांचा जन्म 1608 साली देहू या गावात वसंत पंचमीला झाला.

3) तुकारामांना वारकरी जगद्गुरू म्हणून ओळखतात.

4) 'तुकारामांची गाथा' या साहित्यरचनेत पाच हजारांवर अभंग आहेत.

5) सतराव्या शतकात सामाजिक प्रबोधनाची मुहूर्तमेढ रोवणारे सुधारक संत म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो.

6) तुकाराम महाराज वास्तववादी आणि निर्मिड होते.

7)सामाजिक दाभिकपणावर रोख ठोक टीका करणारे संत होते.

8) जे का रंजले गांजले । त्यासी म्हणे जो आपुले !' हा अभंग विशेष प्रसिद्ध आहे.

9) आपल्या साहित्यातून व किर्तनातून लोकांना मार्गदर्शन करण्याचे काम त्यांनी केले.

10) 19 मार्च 1650 साली देहू येथे त्यांचे निधन झाले.




हे सुध्दा वाचा ⤵️


FAQ
Q.1) संत तुकाराम यांचा जन्म कधी झाला ?
Ans. संत तुकाराम यांचा जन्म 1608 साली देहू या गावात वसंत पंचमीला झाला.

Q.2) तुकाराम बीज म्हणून कोणता दिवस ओळखला जातो ?
Ans. फाल्गुन वद्य द्वितीयेला तुकारामांचे सदेह वैकुंठ-गमन झाले असे मानले जाते. हा दिवस 'तुकाराम बीज' म्हणून ओळखला जातो. 

Q.3) संत तुकाराम यांचे निधन कधी झाले ?
Ans. 19 मार्च 1650 साली देहू येथे त्यांचे निधन झाले.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad