google-site-verification=mhQXPDL6t29v0SBU3tM2gsf6ieXw2vbDeuweOWGfOg0 महापरिनिर्वाण दिन भाषण मराठी माहिती | mahaparinirvan din bhashan marathi
Type Here to Get Search Results !

महापरिनिर्वाण दिन भाषण मराठी माहिती | mahaparinirvan din bhashan marathi

 महापरिनिर्वाण दिन भाषण मराठी माहिती | mahaparinirvan din bhashan marathi | 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिन भाषण मराठी माहिती | 6 December mahaparinirvan din bhashan marathi pdf | डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन भाषण मराठी 

महापरिनिर्वाण दिन भाषण मराठी :- नमस्कार मित्रांनो आज आपण 6 डिसेंबर रोजी साजरा केला जाणारा दिवस म्हणजे महापरिनिर्वाण दिन याबद्दलची माहिती बघणार आहोत. 6 डिसेंबर म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथीचा दिवस (महापरिनिर्वाण दिन) सर्व भीमसैनिक मुंबई येथे चैत्यभूमीला भेट देण्यासाठी जातात. महापरिनिर्वाण दिनानिमित्त आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत महापरिनिर्वाण दिन भाषण मराठी,ते तुम्ही शेवटपर्यंत वाचावे ही नम्र विनंती.

महापरिनिर्वाण दिन भाषण मराठी माहिती | mahaparinirvan din bhashan marathi pdf

                 मोजता येत नाही उंची, 
                बाबासाहेबांच्या कार्याची, 
                त्यांनी जगाला शिकवली,
                   भाषा माणुसकीची....

आदरणीय व्यासपीठ, व्यासपीठावरील मान्यवर, वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे उपस्थित माझ्या मैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार !

आज ६ डिसेंबर ! हा दिवस आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 'महापरिनिर्वाण दिन' म्हणून साजरा करीत आहोत. महापरिनिर्वाण हे बौद्ध धर्माचे तत्व व ध्येय आहे. बौद्ध धर्मानुसार, जो निर्वाण प्राप्त करतो तो सांसारिक वासना, जीवनातील वेदना तसेच जीवनचक्रातून मुक्त होतो.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अनेक वर्षे बौद्ध धर्माचा अभ्यास केला होता. त्यांनी आपल्या असंख्य अनुयायांसह सन १९५६ मध्ये बौद्ध धर्माचा स्विकार केला होता. त्यांच्या महान विचार व कार्यामुळे त्यांची पुण्य- तिथी 'महापरिनिर्वाण दिन' म्हणून साजरी केली जाते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव डॉ. भिमराव रामजी आंबेडकर है होते. त्यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी मध्यप्रदेशातील महू या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी व आईचे नाव भीमाबाई हे होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर लहान- पणापासून खूप हुशार व महत्त्वाकांक्षी विचारांचे होते. त्यांना शालेय वयात 'अस्पृश्य' म्हणून अपमान सहन करावा लागला पण ते मुळीच खचले नाहीत. त्यांनी खूप कष्टातून आपले उच्च शिक्षण पूर्ण केले.

त्यांनी अस्पृश्य व दीनदलितांचा उध्दार केला. उपेक्षितांच्या जीवनात अस्मितेची ज्योत पेटवली. स्वत: च्या अलौकिक बुध्दीचा वापर समाजासाठी केला. त्यांनी आपल्या बांधवांना 'शिका, संघटित व्हा व संघर्ष करा' असा मोलाचा संदेश दिला. गोरगरीब, दीनदलितांच्या न्याय व हक्कांसाठी अनेक आंदोलने व सत्याग्रहे केली.

डॉ. बाबासाहेबांचा भारतीय राज्यघटना लिहण्यात सिंहाचा वाटा आहे. त्यांना "भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार' असे म्हणतात.

डॉ. बाबासाहेबांचे कार्य कोणालाही शब्दात मांडता येणार नाही. असा अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा महामानव, युगप्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकर ६ डिसेंबर १९५६ रोजी काळाच्या पडद्याआड गेले. सारा देश हळहळला. दादरच्या चैत्यभूमीवर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आजही लाखो अनुयायी ६ डिसेंबरला चैत्यभूमी. स भेट देतात व डॉ. बाबासाहेबांना श्रध्दांजली वाहतात.

अशा या महामानवास माझे कोटी कोटी प्रणाम !
                     धन्यवाद !
जय हिंद, जय भारत, जय भीम!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर १० ओळी भाषण मराठी | 10 line speech on docter babasaheb Ambedkar in marathi

                   तू जीवन दिधले.
                    मातीला गंधाचे...
                दलितांच्या दीपा तुला, 
               प्रणाम अवघ्या विश्वाचे!

१. अध्यक्ष, महाशय, पूज्य गुरुजन वर्ग व येथे जमलेल्या माझ्या मित्र- मैत्रिणींनो,

२. आज ६ डिसेंबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी आपण 'महापरिनिर्वाण दिन' म्हणून साजरी करीत आहोत.

३. यानिमित्त मी आपणास जे चार शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांत- पणे ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती.

४. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक महान कायदेतज्ञ, समाजसुधारक राजकीय नेते होते.

५. त्यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ मध्ये मध्यप्रदेशातील महू या गावी झाला.

६. त्यांचे पूर्ण नाव भिमराव रामजी आंबेडकर हे होते.

७. शालेय शिक्षण घेताना 'अस्पृश्य' म्हणून' त्यांना मानहानी स्विकारावी लागली,पण ते मुळीच खचले नाहीत...

८. त्यांनी गोरगरीब, दीनदलित समाजाच्या न्याय व हक्कासाठी अनेक आंदोलने व सत्याग्रहे केली .

९. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत..

१०. त्यांनी ६ डिसेंबर १९५६ रोजी या जगाचा शेवटचा निरोप घेतला.

अशा या महामानवास माझे कोटी कोटी प्रणाम !
                  धन्यवाद !
जय हिंद, जय भारत, जय भीम!



हे सुध्दा वाचा ⤵️



FAQ
Q.1) महापरिनिर्वाण दिन कधी साजरा केला जातो ?
Ans. महापरिनिर्वाण दिन 6 डिसेंबर रोजी साजरा केला जातो.

Q.2) भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोणाला म्हणतात ?
Ans. डॉ. बाबासाहेबांचा भारतीय राज्यघटना लिहण्यात सिंहाचा वाटा आहे. त्यांना "भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार' असे म्हणतात.

Q.3) डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा मृत्यू कधी झाला ?
Ans. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी ६ डिसेंबर १९५६ रोजी या जगाचा शेवटचा निरोप घेतला.






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad