Type Here to Get Search Results !

दत्त जयंती मराठी माहिती pdf | Datt Jayanti Information In Marathi

 दत्त जयंती मराठी माहिती pdf | Datt Jayanti Information In Marathi | Datt Jayanti marathi mahiti | 7 December Datt Jayanti marathi mahiti | श्री दत्त जन्माची कथा मराठी | shi Datt janmachi katha marathi

दत्त जयंती २०२२ :- भगवान श्री दत्तात्रेयजींची जयंती दरवषी मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला साजरी केली जाते. यावर्षी श्री दत्तात्रेय जयंती 7 डिसेंबर 2022 रोजी बुधवारी आहे. महाराष्ट्रात दत्त जयंती मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. भगवान दत्तात्रेय है समधर्मी देवता आहेत आणि त्यांना त्रिमूर्ती म्हणजेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश अवतार मानले जाते.

दत्त जयंती माहिती pdf | दत्त जयंती माहिती मराठी | श्री दत्तजयंती माहिती | श्री दत्तजयंती माहिती मराठी

श्रीगुरूदेव दत्त है नाथ संप्रदायातील आद्यगुरु मानले जातात. मार्गशीर्ष महिन्यात पौणिमेला दत्ताचा जन्म झाला. म्हणून यादिवशी सर्व जागृत दत्तक्षेत्रात तसेच सर्व दत्तमंदिरांमध्ये दत्तजयंती मोठ्या भक्तिभावाने साजरी केली जाते. दत्तात्रय हा शब्द दत्त व 'आत्रेय यापासून बनला आहे. आपण ब्रह्म निर्गुण व मुक्त असल्याची जाणीव ज्याला आहे तो दत्त अत्रेय म्हणजे अत्री ऋषीचा मुलगा. श्रीदत्त जन्माच्या विविध आख्यायिका सांगितल्या जातात. श्रीदत्त हे माता अनुसूया व महर्षी अत्री यांचे पुत्र आहेत. अत्रीॠषींनी पुत्रप्राप्तीसाठी घोर तपश्चर्या केली. त्यांच्या तपास संतुष्ट होऊन ब्रह्मा-विष्णु-महेश यांनी हवा तो वर माग असे अत्री ऋषीना सांगितले. 

अत्रीऋषींनी तिघांनाही विनंती केली की आपण पुत्र म्हणून माझ्या पत्नीच्या उदरी जन्म घ्यावा. तिन्ही देवांनी त्यांची विनंती मान्य केली आणि ते अत्रिऋषी व अनुसूयेचे पुत्र झाले. त्याचबरोबर शुभात्रेयी नावाची कन्या देखील अत्रीऋषींना प्राप्त झाली. हिंदू संस्कृतीत ब्रह्मा, विष्णू आणि महेश त्रिदेवांचे स्थान सर्वोच्चपटी आहे. या तिन्ही देवांचे अंश म्हणजेच श्री गुरुदेव दत्त दत्तजयंतीला मनोभावे दत्तव्रत व पुजा केल्यास भक्तांचे सर्वमनोरथ पूर्ण होतात अशी मान्यता आहे. दत्तजयंती उत्सवापूर्वी सात दिवस गुरुचरित्राचे पठण केले जाते यालाच गुरुचरित्रसप्ताह म्हणून ओळखले जाते. यादिवशी दत्तमंदिरामध्ये भजन, कीर्तन, प्रवचन इत्यादी कार्यक्रम आयोजीत केले जातात. दत्तगुरूंची पूजा व आरती करून सुंठवडयाचा प्रसाद वाटप करतात. 

श्री दत्त जन्माची कथा मराठी | shri Datt janmachi katha marathi

श्री दत्त जन्माची कथा :- एकदा अत्री ऋषींनी पुत्रप्राप्तीसाठी ऋक्ष कुलपर्वतावर घोर तपश्चर्या केली. त्यांच्या तपाने सारे त्रिभुवन पोळून निघाले. अत्री ऋषींच्या या प्रखर तपाने संतुष्ट होऊन ब्रम्हा-विष्णू-महेश हे तिन्ही देव प्रकट झाले. त्यांनी अत्री ऋषींना तपाचे कारण विचारले.

अत्री ऋषींनी त्यांना विनवले की, आपण माझ्या उदरी पुत्ररूपाने जन्म घ्यावा.

तिन्ही देवांनी त्यांची विनंती. मान्य केली. देवत्रयींच्या आशीर्वादाने अनुक्रमे ब्रम्हापासून सोम म्हणजे चंद्र, विष्णुपासून दत्त आणि शिवापासून दुर्वास असे तीन पुत्र अनुसयेच्या उदरी जन्मास आले.

यावरून श्रीदत्त हे अत्री ऋषी व माता अनुसया यांचे पुत्र तसेच भगवान विष्णूचे अवतार होते, असा बोध होतो.




दत्त जयंती पूजा पद्धत किंवा जन्म साजरा करण्याची पद्धत :-

या उत्सवापूर्वी सात दिवस गुरुचरित्राचे पारायण करण्याचा प्रघात आहे. याला गुरुचरित्र सप्ताह असे म्हणतात. दत्त जयंती या दिवशी काही ठिकाणी दत्तयाग केला जातो. ज्यात पवमान पंचसूक्ताच्या आवृत्त्या (जप) आणि त्याच्या दशांशाने किंवा तृतीयांशाने घृत (तूप) आणि तीळ यांनी हवन करतात.

असे मानले जाते की दत्तात्रेय देव गंगा स्नानासाठी येतात, म्हणून गंगेच्या काठावर दत्ता पादुकाची पूजा केली जाते. दत्तपूजनाच्या पूर्वी उपासकाने अनामिकेने
विष्णूप्रमाणे उभे दोन रेषांचे गंध लावावे.
दत्ताला सात किंवा सातच्या पटीत जाई आणि निशिगंध हे फुलं वाहावे. फुलांचे देठ देवाकडे करून ती वहावीत.
चंदन, केवडा, चमेली, जाई आणि अंबर या उदबत्तीने दनाला ओवाळावे.


हे सुध्दा वाचा ⤵️



FAQ
Q.1) दत्त जयंती 2022 कधी आहे ?
Ans. दत्त जयंती 7 डिसेंबर 2022 बुधवार रोजी आहे.

Q.2) श्री दत्तात्रेय हे कोणाचे अवतार मानले जातात ?
Ans.भगवान दत्तात्रेय है समधर्मी देवता आहेत आणि त्यांना त्रिमूर्ती म्हणजेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश अवतार मानले जाते.

 Q.3) श्री दत्ताचा जन्म कधी झाला ?
Ans.मार्गशीर्ष महिन्यात पौणिमेला दत्ताचा जन्म झाला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad