Type Here to Get Search Results !

२६ जानेवारी प्रजासत्ताक दिन भाषण मराठी | 26 January republic day speech marathi

 २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन भाषण मराठी | 26 January republic day speech marathi | प्रजासत्ताक दिन भाषण मराठी pdf | 26 January bhashan marathi pdf | prajasattak din bhashan marathi pdf | 26 January speech marathi 

26 जानेवारी प्रजासत्ताक दिन 2022 :- नमस्कार मित्रांनो आज आपण सर्वांचा आवडता दिवस म्हणजे २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन, यानिमित्त भाषण मराठी बघणार आहोत. २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन हा संपूर्ण देशात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो, या दिवशी संपूर्ण देशातील शाळांमध्ये विविध कार्यक्रम आयोजित केले जातात व सकाळी लवकर झेंडावंदन कार्यक्रम आयोजित करून घोषणा देत भव्य अशी प्रभातफेरी काढली जाते. २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त खालील लेखात दिलेली माहिती तुम्ही शेवटपर्यंत वाचावी ही नम्र विनंती.

२६ जानेवारी प्रजासत्ताक दिन भाषण मराठी | 26 January republic day speech in marathi 

              उत्सव तीन रंगाचा,
               आभाळी आज सजला,
              नतमस्तक मी त्या सर्वांचा, 
             ज्यांनी भारत देश घडवला.. ...

सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावरील मान्यवर, वंदनीय गुरुजनवर्ग व येथे उपस्थित माझ्या देशबांधवानो,आज २६ जानेवारी ! आपल्या भारताचा प्रजासत्ताक दिन! यांनिमित्त प्रथम तुम्हां सर्वांना 'भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!'
मित्र हो, २६ जानेवारी हा आपला एक महत्त्वाचा राष्ट्रीय सण आहे. हा दिवस प्रत्येक भारतीयासाठी आनंद- उत्साहाचा आणि अभिमानाचा दिवस आहे.

आपला भारत देश १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला. पण स्वातंत्र्यानंतर खऱ्या अर्थाने आपल्या देशाचा राज्यकारभार २६ जानेवारी १९५० सुरळीतपणे सुरू झाला.'
या दिवशी आपल्या भारताचे संविधान अमलात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच देशाच्या संविधान सभेने २ वर्षे, ११ महिने १८ दिवस अथक परिश्रम घेवून भारताचे समृद्ध संविधान तयार केलें. भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे.

भारतीय संविधानाने आपल्याला कोणत्याही भेदभावाशिवाय समान हक्क आणि अधिकार दिले आहेत. हे संविधान स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय व एकता या तत्त्वांवर आधारीत आहे. देशात संविधान लागू झाल्यानंतर खरी लोकशाही नांदू लागली.

आपल्या भारताला स्वतंत्र आणि प्रजासत्ताक करण्यासाठी अनेक थोर क्रांतीकारकांनी प्राणांचे बलिदान दिले आहे. आज त्या सर्व शूर वीरांना आपण सलाम करूया. त्याच्यांमुळे आज आपण भारतात मुक्त खास घेत आहोत.
धन्य धन्य ते भारतीय संविधान। धन्य धन्य ते महान परमपूज्य,भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर धन्य धन्य ते शूर भारतीय देशभक्तं,क्रांतीकारक आणि वीर जवान...!तुम्हा सर्वांना आज प्रजासत्ताक दिनी माझे कोटी कोटी प्रणाम !
धन्यवाद !
      बोला- भारत माता की जय! 
               वंदे मातरम !




२६ जानेवारी भाषण फक्त ५ ओळींचे सुंदर भाषण | 26 January 5 line speech in marathi


१) नमस्कार,माझे नाव ..... आहे आणि मी इयत्ता ...... मध्ये शिकतो.

२) आज २६ जानेवारी आपल्या भारताचा प्रजासत्ताक दिन आहे.

३) २६ जानेवारी १९५० रोजी भारतात संविधान लागू झाले.

४) डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे जनक आहेत.

५) २६ जानेवारी हा आपला राष्ट्रीय सण आहे व आपण यादिवशी झेंडावंदन करतो.

सर्वांना २६ जानेवारीच्या / प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा !
धन्यवाद !
बोला- भारत माता की जय !
वंदे मातरम् !



हे सुध्दा वाचा ⤵️



FAQ
Q.1) प्रजासत्ताक दिन कधी साजरा केला जातो ?
Ans. प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी रोजी साजरा केला जातो.

Q.2) भारतात संविधान कधीपासून लागू झाले ?
Ans. २६ जानेवारी १९५० रोजी भारतात संविधान लागू झाले.

Q.3) भारतीय संविधानाचे जनक कोण आहेत ?
Ans. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे जनक आहेत.

Q.4) भारताचे संविधान तयार करण्यासाठी किती कालावधी लागला ?
Ans. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच देशाच्या संविधान सभेने २ वर्षे, ११ महिने १८ दिवस अथक परिश्रम घेवून भारताचे समृद्ध संविधान तयार केलें. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad