google-site-verification=mhQXPDL6t29v0SBU3tM2gsf6ieXw2vbDeuweOWGfOg0 महिला दिन भाषण निबंध मराठी माहिती | mahila din bhashan nibandh marathi
Type Here to Get Search Results !

महिला दिन भाषण निबंध मराठी माहिती | mahila din bhashan nibandh marathi

 महिला दिन भाषण निबंध मराठी माहिती | mahila din bhashan nibandh marathi | 8 March women's day speech in marathi | जागतिक महिला दिन भाषण निबंध मराठी माहिती | jagtik mahila din bhashan nibandh marathi mahiti 

महिला दिन भाषण मराठी :- नमस्कार मित्रांनो आज, आपण येथे आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यासाठी जमलो आहोत - हा दिवस संपूर्ण इतिहासातील महिलांच्या उल्लेखनीय कामगिरीचा आणि आपल्या जगाला घडवण्यामागील त्यांच्या महत्त्वाच्या भूमिकेचा सन्मान करण्याचा आणि ओळखण्याचा दिवस आहे. हा दिवस आपल्याला स्त्री-पुरुष समानतेच्या दिशेने झालेल्या प्रगतीवर चिंतन करण्याची आणि अजूनही राहिलेली आव्हाने ओळखण्याची संधी देतो.

समान हक्कांसाठी महिलांनी त्यांच्या लढ्यात खूप लांब पल्ला गाठला आहे, पण संघर्ष अजून संपलेला नाही. मताधिकार चळवळीपासून ते #MeToo चळवळीपर्यंत, महिलांनी त्यांच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या प्रगतीच्या आड येणारे अडथळे मोडून काढण्यासाठी लढा सुरू ठेवला आहे. हे महत्त्वाचे आहे की आपण या दिवसाचा उपयोग केवळ महिला साजरे करण्यासाठीच नाही तर त्यांना पाठिंबा देण्यासाठी आणि सशक्त करण्यासाठी आपल्या वचनबद्धतेचे नूतनीकरण करण्यासाठी देखील केला पाहिजे.

महिला दिनाच्या निमित्ताने आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो अतिशय सुंदर सोपे असे महिला दिन भाषण मराठी माहिती. सर्वप्रथम तुम्हाला महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

महिला दिन भाषण मराठी | mahila din bhashan marathi | जागतिक महिला दिन भाषण मराठी 

ती आई आहे, ती ताई आहे,
ती मुलगी आहे, ती मैत्रिण आहे,
ती पत्नी आहे, ती सून आहे,
ती सासू आहे, ती आजी आहे,
पण याआधी ती एक स्त्री आहे,
जिचा आम्हांला अभिमान आहे.

सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थित माझ्या मित्र-मैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार.

आज ८ मार्च! जागतिक महिला दिन! प्रथम, सर्व महिला भगिनींना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! आजचा हा दिवस प्रत्येक महिलेसाठी सन्मानाचा आणि अभिमानाचा दिवस आहे. याच दिवशी १९०८ रोजी अमेरिकेतील स्त्री कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ तसेच स्त्रीशक्तीचा जागर करणे - साठी महिला दिवस जगभर आनंदाने साजरा केला जातो. महिला व पुरुषांमध्ये समानता निर्माण करणे, महिलांना त्यांच्या हक्काविषयी जागरूक करणे हे मोठे उद्दिष्ट महिला दिन साजरा करण्यामागे आहे.

आज स्त्रीचे कार्यक्षेत्र फक्त 'चूल व मूल' इतकेच मर्यादित राहिले नाही. आज प्रत्येक क्षेत्रात स्त्रीने आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थिती मध्येही तिने आपली सक्षमता सिद्ध केली आहे.

स्वराज्यनिर्मितीसाठी शिवरायांना घडवणाऱ्या राजमाता जिजाऊ, लहानग्याला पाठीशी बांधून रणांगणावर लढणाऱ्या बहादुर झाशीची राणी लक्ष्मीबाई, अलौकिक समाजकार्य करणाऱ्या अहिल्याबाई होळकर, महिलांना शिक्षणाची कवाडे उघडी करणाऱ्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, आकाशाला गवसणी घालणाऱ्या कल्पना चावला, पहिल्या महिला पोलिस अधिकारी किरण बेदी, भारताच्या प्रथम महिला पंतप्रधान इंदिरा गांधी, देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, गानसम्राज्ञी लता मंगेशकर, अनाथ दीनांची माय सिंधुताई सपकाळ आणि आजपर्यंत देशाच्या प्रगतीसाठी झटणारी प्रत्येक स्त्री या सर्वानी बिकट संघर्षातून आपली ओळख निर्माण केली आहे.

आज स्त्री पुरुषाच्या खांदाला खांदा लावून कार्य करीत आहे. स्वतःची ओळख निर्माण करीत आहे. सर्व क्षेत्रात प्रगतीपथाकडे वाटचाल करीत आहे.

अशा या स्त्रीशक्तीला माझा मानाचा मुजरा ! 
   नारी तू घे अशी उंच भरारी 
गर्व करेल तुझ्यावर दुनिया सारी.... 
 
         धन्यवाद! जय हिंद !



हे सुध्दा वाचा ⤵️



FAQ
Q.1) महिला दिन कधी साजरा केला जातो ?
Ans. महिला दिन ८ मार्च रोजी साजरा केला जातो.

Q.2) महिला दिन का साजरा केला जातो ?
Ans. १९०८ रोजी अमेरिकेतील स्त्री कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ तसेच स्त्रीशक्तीचा जागर करणे - साठी महिला दिवस जगभर आनंदाने साजरा केला जातो.

Q.3) महिला दिन साजरा करण्यामागील काय उद्देश आहे ?
Ans. महिला व पुरुषांमध्ये समानता निर्माण करणे, महिलांना त्यांच्या हक्काविषयी जागरूक करणे हे मोठे उद्दिष्ट महिला दिन साजरा करण्यामागे आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad