Type Here to Get Search Results !

हनुमान जयंती माहिती मराठी २०२३ | hanuman jayanti information in marathi

 हनुमान जयंती माहिती मराठी २०२३ | hanuman jayanti information in marathi |  हनुमान जयंती २०२३ मराठी माहिती | hanuman jayanti 2023 marathi mahiti | हनुमान जयंती संपूर्ण माहिती मराठी मध्ये | हनुमान जयंती ची माहिती मराठी |  hanuman jayanti marathi mahiti 

हनुमान जयंती २०२३ :- नमस्कार मित्रांनो आज आपण प्रभु श्रीरामाचे परम भक्त हनुमान यांच्या जयंतीनिमित्त माहिती बघणार आहोत.
        महाराष्ट्रात चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी होते. या दिवशी हनुमानाच्या देवळात पहाटेपासूनच कीर्तनाला सुरुवात होते. सूर्योदयाला हनुमानाचा जन्म होतो, त्या वेळी कीर्तन संपते आणि सर्वांना प्रसाद वाटला जातो. महाराष्ट्रात शनिवार, तर उर्वरित भारतात शनिवार आणि मंगळवार हे मारुतीचे वार मानले जातात.

🔶 एखाद्या व्यक्तीला अनिष्ट शक्तीचा त्रास असल्यास -

१. त्रास दूर करण्यासाठी हनुमान जयंतीला त्या व्यक्तीवरून नारळ उतरवावा आणि त्यानंतर तो हनुमानाच्या देवळात फोडावा.

२. व्यक्तीवरून नारळ उतरवल्याने व्यक्तीतील अनिष्ट शक्ती नारळात येते.

३. असा नारळ हनुमानाच्या देवळात फोडल्यावर त्यातून बाहेर पडणारी अनिष्ट शक्ती हनुमानाच्या सामर्थ्याने नष्ट होते.

🔶 हनुमानाची मंदिरात किंवा घरात पूजा कशी करावी ?

१. वाममुखी म्हणजे डावीकडे तोंड असलेल्या मारुति किंवा दासमारुतीची पूजा सामान्य लोकांनी करावी.

२. मारुतिपूजनाच्या पूर्वी स्वतःला अनामिकेने (करंगळी जवळील बोट) शेंदूर लावावा.

३. हनुमानाला शेंदूर, रुईची पाने आणि फुले, तसेच तिळाचे तेल जरूर अर्पण करावे.

४. मारुतीला फुले वाहताना ती ५ किंवा ५ च्या पटीत म्हणजेच ५,१०,१५,२० अशी वाहावीत.

५. हनुमानाला केवडा, चमेली आणि अंबर या गंधांच्या उदबत्त्या जास्त प्रिय असतात.

६. उदबत्ती नेहमी उजव्या हाताची हनुमान जयंती तर्जनी, म्हणजे अंगठ्याजवळील बोट आणि अंगठा यात धरून घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने तीन वेळा ओवाळावी.

७. हनुमानाला नारळ अर्पण करण्यापूर्वी हनुमानाच्या मूर्तीसमोर हातात धरावा. हातात धरलेल्या नारळाची शेंडी मूर्तीकडे असावी. त्यानंतर नारळ फोडून त्याचा अर्धा भाग देवाला तर अर्धा आपल्यासाठी ठेवावा.

८. हनुमानाच्या देवळात दर्शन हनुमान जयंती घेतल्यानंतर पाच प्रदक्षिणा घालाव्यात. प्रत्येक प्रदक्षिणेनंतर हनुमानाला नमस्कार करून मगच पुढची प्रदक्षिणा घालावी.

९. अधिक संख्येत प्रदक्षिणा घालायच्या असल्यास, त्या शक्यतो किमान प्रदक्षिणेच्या संख्येच्या पटीत, म्हणजे दहा, पंधरा, वीस अशा घालाव्यात.


🔶 शनीची साडेसाती तसेच कोणत्याही हनुमान जयंती प्रकारची बाधा, आजारपण, कुणी काही केलेलं असेल तर त्यातून मुक्त होण्यासाठी मारुतीची पूजा करतात.

१. त्यासाठी एका वाटीत तेल घ्यायचे. त्यात चौदा काळे उडीद टाकून त्या तेलात स्वतःचा तोंडवळा पहायचा. मग ते तेल मारुतीला वाहायचे.

२. एखादी रुग्ण व्यक्ती जरी मारुतीच्या देवळात जाऊ शकत नसली, तरीही याच पद्धतीने तिला मारुतीची पूजा करता येते. तेलात तोंडवळ्याचे प्रतिबिंब पडते, तेव्हा वाईट शक्तीचेही प्रतिबिंब पडते.

३. ते तेल मारुतीला वाहिल्यावर  त्यातील वाईट शक्तीचा नाश होतो.

४. शनिवारी तेल विकू नये; कारण ज्या शक्तीच्या त्रासापासून सुटका करून घेण्यासाठी एखादा माणूस मारुतीला तेल अर्पण करत असेल, ती शक्ती तेल विकणाऱ्याला त्रास देण्याची शक्यता असते.

५. आपण सुद्धा मारुतीच्या
हनुमान जयंती देवळाबाहेर बसलेल्याकडून तेल विकत न घेता तेल घरून नेऊन अर्पण करावे.

६. बाधित व्यक्तीला मारुतिस्तोत्र म्हणण्यास सांगावे किंवा हनुमनाचा नामजप करायला सांगावा.


🔶 हनुमान जयंतीच्या दिवशी मारूतीस्रोताचे पठण करण्याचे फायदे :-

हनुमान जयंती या दिवशी मारुतीचा  'श्री हनुमते नमः' 'श्री हनुमते नमः' 'श्री हनुमते नमः' हा जप अधिकाधिक करावा. बजरंगबली प्रसन्न होतात.
हनुमान जयंतीला अनेक जन मारुतिस्तोत्राचे पठण करतात. याचे अनेक फायदे आहेत.

१. समर्थ रामदासस्वामींचा १३ कोटी  रामनामाचा जप पूर्ण झाल्यावर मारुति त्यांच्यासमोर प्रगट झाला आणि त्या दर्शनानंतर स्वामींनी मारुतिस्तोत्र (भीमरूपीस्तोत्र) रचले.

२. हे स्तोत्र पठण करणाऱ्याला  धनधान्य, पशूधन, संतती, संपत्ति या साऱ्याचा आणि उत्तम रूपविद्यादीकांचा लाभ होतो.

३. या स्तोत्राच्या पठणाने भूत, पिशाच, समंध आदी वाईट शक्तीची बाधा; सगळे रोग, व्याधी नष्ट होतात.

४. तसेच सारी चिंता, दुःख दूर होऊन आनंदाची प्राप्ती होते.

पूजा संपन्न होतं असताना प्रभू श्रीराम आणि मारुतीरायांची आरती नक्की करावी. हनुमानाची यथाशक्ति पंचोपचारे किंवा षोडशोपचारे पूजा करावी. आपल्या भागात पूजेची जी पद्धती प्रचलित आहे, तिचे अनुकरण करणे श्रेयस्कर ठरते.




हे सुध्दा वाचा ⤵️


FAQ
Q.1) हनुमान जयंती २०२३ कधी आहे ?
Ans. हनुमान जयंती ६ एप्रिल २०२३, वार गुरूवार रोजी आहे.

Q.2) हनुमान जयंती कधी साजरी केली जाते ?
Ans. चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.

Q.3) हनुमान जयंतीच्या दिवशी काय करावे ?
Ans. हनुमान जयंती च्या दिवशी मारुतीचा  'श्री हनुमते नमः' 'श्री हनुमते नमः' 'श्री हनुमते नमः' हा जप अधिकाधिक करावा. बजरंगबली प्रसन्न होतात.
हनुमान जयंतीला अनेक जन मारुतिस्तोत्राचे पठण करतात.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad