Type Here to Get Search Results !

माझा आवडता ऋतू पावसाळा निबंध मराठी | my favourite season essay in Marathi

 माझा आवडता ऋतू पावसाळा निबंध मराठी | my favourite season essay in Marathi | rainy season essay in Marathi| माझा आवडता ऋतू पावसाळा निबंध इन मराठी| माझा आवडता ऋतू पावसाळा याविषयावर निबंध मराठी

माझा आवडता ऋतू पावसाळा निबंध मराठी:- उन्हाळा ऋतू संपल्यानंतर पावसाळा हा येतो. पावसाळ्यामध्ये पाऊस पडल्याने हवा प्रसन्न बनते, सगळीकडे हिरवेगार गवतदिसते. झाडांना नवी लकाकी येते. पाना-फुलांना अधिक तजेलदारपणा येतो.

पावसाळ्यामध्ये कधीतरी रिमझिम पाऊस पडतो तर कधी तो धो धो कोसळतो. जिकडे पहावे तिकडे पाणीच पाणी दिसते. नद्या-नाले ओसंडून वाहतात. विहीरी- तलाव पाण्याने पूर्ण भरतात. डोंगरावरून धबधबे कोसळतात. है दृश्य पहायला खूप छान वाटते.

पावसाळ्यामध्ये पुरेसा पाऊस पडल्याने शेतकरी सुखावतो, शेतीच्या कामांना वेग येतो. हा ऋतु शेतकऱ्याला वरदान ठरतो. लहान मुलांना पावसात भिजायला फार आवडते. मोरसुध्दा आकाशात काळे ढग दिसताच नृत्य करायला सुरूवात करतो. पशू-पक्ष्यांनाही पावसाळा फार आवडती.

पावसाळ्यात काही साथीचे रोगही पसरण्याची भीती असते, पण पुरेशी काळजी घेतल्यास हा धोका टळू शकतो. अनेक लेखक, कवींनी पावसावर सुंदर कथा, लेख, कविता लिहल्या आहेत.

असा हा पावसाळा ऋतू लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांना नवा जोम, उत्साह, आनंद देती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad