Type Here to Get Search Results !

मासिक पाळी मध्ये | गर्भवती असाल तर | स्तनपान करणाऱ्या महिलांनी कोरोना (corona vaccine ) लस घ्यावी का?

मासिक पाळी मध्ये | गर्भवती असाल तर | स्तनपान करणाऱ्या महिलांनी कोरोना (corona ) लस घ्यावी का?


मासिक पाळीत कोरोना लस घ्यावी का



 नमस्कार मैत्रिणींनो गर्भवती महिलांनी कोरोना लस घ्यावी का ? मासिक पाळी मध्ये कोरोना लस घ्यावी का ? स्तनपान करणाऱ्या महिलांनी लस घ्यावी का?  कोविड होऊन गेल्यानंतर महिलांनी लस घ्यावी का ? घ्यायची तर किती दिवसांनी लस घ्यावी ? तसेच लस घ्यायची झाली तर कोणती लस घ्यावी ? असे एक ना अनेक प्रश्न महिलांना पडलेले आहेत . लस घेतल्यानंतर महिलांनी कोणती काळजी घ्यावी याची सविस्तर माहिती बघणार आहोत माहिती काळजीपूर्वक वाचा.

आपण काय काय वाचणार बघा(toc)

मासिक पाळी मध्ये कोरोना लस घ्यावी की नाही ? 

मैत्रिणींनो आपल्याला माहीतच आहे मासिक पाळीच्या त्या पाच दिवसांमध्ये आपण जास्त थकून जातो त्याचे कारण हे की आपला होणारा रक्तस्त्राव त्यामुळे आपण जास्त थकून जातो आपल्याला अशक्तपणा येतो हे सर्वांनाच माहीत आहे आणि त्यातच आपण लस घेतली आणि लस घेतल्यामुळे येणारा थकवा आणि मासिक पाळी चा थकवा दोन्ही एकत्र येऊन आपण जास्त गळून जाऊ याची संभावना असते त्यामुळे मासिक पाळीच्या अगोदर पाच दिवस आणि मासिक पाळी नंतर पाच दिवस शक्यतो लस घ्यावी . परंतु डब्ल्यू एच ओ ने सुद्धां सांगितले आहे की मासिक पाळी मध्ये सुद्धा आपण लस घेतली तरीही त्याचा काहीही परिणाम आपल्या शरीरावर होणार नाही , त्यामुळे लस मासिक पाळी मध्येही स्त्रिया घेऊ शकतात .

स्तनपान करणाऱ्या महिलांनी लस घ्यावी का?

 मैत्रिणींनो  सर्व स्तनपान करणाऱ्या महिलांना नेहमीच प्रश्न पडतो की आपण आपल्या छोट्या बाळाला स्तनपान करत असतो आणि आपण लस घेतली आणि आपल्याला काही त्रास झाला तर आपल्या बाळांना सुद्धा तोच त्रास जाणवेल अशी भीती आपल्यामध्ये निर्माण होते परंतु डब्ल्यू एच ओ सुद्धा आता सांगितले आहे की स्तनपान करणाऱ्या महिलांनी सुद्धा कोरूना लस घ्यावी कोरोना लस घेतल्यामुळे आपल्या शरीरात तयार होणाऱ्या अँटीबॉडीज या आपल्या बाळाला सुद्धा दुधा मार्फत बाळाला पर्यंत पोहोचू शकता त्यामुळे न घाबरता स्तनपान करणाऱ्या महिलांनी लस घ्यावी.

गर्भवती स्त्रियांनी कोरोना लस घ्यावी का ?

मैत्रिणींनो तुम्ही जर गर्भवती असाल आणि अजूनही लस घेतली नसेल तर तुम्हाला लस घ्यावी की नाही घ्यावी हा प्रश्न नक्कीच पडला असेल परंतु डब्ल्यू एच ओ च्या नवीन गाईडलाईन नुसार जरी तुम्ही गर्भवती असाल तरी तुम्हाला कोरोना लस घ्यायला जमेल, लसीमुळे आपल्या गर्भधारणेवर कुठलाही परिणाम होणार नाही हे स्पष्ट केले आहे त्यामुळे कुठलेही शंका न बाळगता लस घ्यावी.

महिलांनी कोरोना होऊन गेल्यानंतर किती दिवसांनी लस घ्यावी ?

मैत्रिणींनो जर तुम्हाला कोरोना होऊन गेला असेल तर डब्ल्यू एच ओ च्या गाईडलाईन नुसार तीन महिन्यानंतर आपल्याला कोरोना वरील लस घ्यायची आहे कारण कोरोना होऊन बरा झाला असेल तर आपल्या शरीरात अगोदरच कोरोना विषाणू विरुद्ध लढण्याच्या अँटीबॉडीज तयार झालेल्या असतात आणि त्या साधारणतः तीन महिन्यापर्यंत टिकू शकतात त्यामुळे जर आपल्याला कोरोना होऊन गेला असेल तर शक्यतो तीन महिन्यानंतरच कोरोना वरील लस घ्यावी

सर्वात शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न म्हणजे 

महिलांनी कोणतीही लस घ्यावी कोव्हॅक्सींन (Covaccin) की कोव्हिशील्ड (Covishield)?

मैत्रिणींनो कोव्हॅक्सींन (Covaccin) की कोव्हिशील्ड (Covishield) दोन्ही लस भारतामध्ये तयार झालेले आहेत आणि दोन्ही लसींची सुरक्षितता आता सिद्ध झालेली आहे त्यामुळे दोन्हीपैकी कोणतीही एक लस आपण घ्यावी. दोन्ही लस्सी बद्दल थोडक्यात माहीती बघूया कोव्हॅक्सींन (Covaccin) ही लस घेतल्यानंतर आपल्याला थकवा अशक्तपणा कमी येतो त्यामुळे जर आपण अगोदरच अशक्त असाल किंवा आपल्याला कुठलातरी आजार झालेला असेल तर आपण ही कोव्हॅक्सींन (Covaccin)लस घ्यावी आणि जर आपल्याला कुठलाही आजार झालेला नसेल आपण सशक्त असाल तर आपण कोव्हिशील्ड (Covishield) ही लस घ्यावी या लसीमुळे आपल्याला थोडा जास्त अशक्तपणा थकवा आणि ताप आल्यासारखा वाटतो परंतु ही लस सुरक्षित आहे .

मैत्रिणींनो माहिती कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करुन नक्की सांगा आणि माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद.

हे सुद्धा वाचा - 

🆕 लहान मुलांना कोरोना पासून कसे वाचवावे | मुलांना कोरोना झाल्यास काय करावे ?

➡️  मासिक पाळीत किंवा गर्भवती महिलांनी व स्तनपान करणाऱ्या महिलांनी कोणती लस घ्यावी

➡️ राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त मराठी अप्रतिम भाषण

➡️ जागतिक लोकसंख्या दिन मराठी भाषण निबंध


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad