Type Here to Get Search Results !

जेजुरी खंडोबा लाईव्ह दर्शन 2021 | jejuri Khandoba live darshan 2021

 जेजुरी खंडोबा लाईव्ह दर्शन 2021 | jejuri Khandoba live darshan 2021|Khandoba live darshan


जेजुरी खंडोबा लाईव्ह दर्शन 2021



''यळकोट यळकोट जय मल्हार,सदानंदाचा उधो उधो''
 मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणजेच जेजुरीचा खंडेराया. तुमच्यापैकी अनेक जन वर्षात एकदातरी जेजुरी गडाला भेट देत असाल. तर आज आपण त्याच गडाबद्दलची माहिती बघणार आहोत.

खंडोबा लाईव्ह दर्शन(toc)

जेजुरी खंडोबा लाईव्ह दर्शन माहीती

  जेजुरीच्या खंडेरायाबद्दल वेगवेगळ्या प्रकारच्या कथा सांगितल्या जातात. महाराष्ट्रात खंडोबा आणि कर्नाटकात मल्हार या नावाने ओळखला जाणारा हा देव  महाराष्ट्र व कर्नाटकाच्या सांस्कृतिक अनुबंधाचे प्रतिक म्हणून ओळखले जाते. खंडोबाचे संस्कृत भाषेमधे नाव मल्हारी मार्तंड भैरव असे आहे.

जेजुरी गडावर जाताना नंदी महाराजाचे दर्शन घ्यावे लागते. त्यानंतर समोरच जेजुरी गडाचे मुख्य द्वार पहायला मिळते. पंढरपूरचा विठोबा, कोल्हापूरचा ज्योतीबा आणि जेजुरीचा खंडोबा म्हणजेच संपूर्ण महाराष्ट्राच आराध्य दैवत.

जेजुरी खंडोबाचे लाईव्ह दर्शन पाहण्यासाठी येथे क्लिक करा

भंडाऱ्याच्या पिवळ्याधम्मक रंगाने उजळून निघालेल्या जेजुरगडाचा परिसर 'सोन्याची जेजुरी' म्हणून ओळखला जातो. त्यामुळे कुणी दिवटी-बुधली घेऊन देवाला ओवाळण्यासाठी आलेले असतात, तर कोणी वाघ्या

खंडेरायाचा जयघोष

  येळकोट येळकोट जयमल्हार, सदानंदाचा उधो उधो, खंडोबाच्या नावानं चांगभलं, अशाप्रकारे जयघोषाची आरोळी आणि सोबत उधळलं जाणारं भंडार-खोबरं हे चित्र दिसल, की लोक देव खंडोबा, मल्हारी, म्हाळसाकांताची आराधना सुरू आहे, हे आपल्याला लक्षात येत.

 मल्हारी-म्हाळसा देवांची अनेक स्थान असले तरी पंढरपूरचा विठोबा, कोल्हापूरचा जोतिबा आणि जेजुरीचा खंडोबा, हीच ओळख सर्व भक्तांच्या मनात रुजली आहे.

हे सुध्दा वाचा⤵️

खंडोबाच्या जेजुरी मंदिराची माहिती 

खंडोबाच्या जेजुरी गडावर चढतांना कडेपठाराच्या डोंगराच्या पायथ्याला वाहनतळ आहे. तेथून पायऱ्यांना पार करून आपण कडे पठारावरील मंदिराच्या मूळ प्रांगणात पोहोचतो जेजुरीच्या तुलनेत मंदिर लहान आहे‌ तरी पण आकर्षक आहे.  मंदिराच्या बाहेर नंदी आहे तर पुढे कासव आहे. जेजुरीप्रमाणे या मंदिराचे देखिल सोपा, सभामंडप आणि गाभारा असे तीन भाग आहेत.

खंडोबा मंदिराच्या गाभाऱ्याच्या पश्चिम भिंतीतल्या देवळीत खंडोबाची आसन ग्रहण केलेली मूर्ती आहे. बैठकीच्या डाव्या आणि उजव्या बाजूला मणि आणि मल्ल यांची मुंडकी आहेत. 

मूर्तीच्या हातात खड्ग, त्रिशूळ, डमरू आणि परळ अशी अस्त्रे आहेत तर, देवळीसमोरील जमिनीवर दोन स्वयंभू, खडबडीत व अनियमित आकाराची खंडोबा व म्हाळसा यांची लिंग आहेत. त्याव्यतीरिक्त खंडोबा व म्हाळसा आणि बाणाईच्या उभ्या मूर्तीही आहेत.

मार्गशीर्ष महिन्यात असणारे चपाषष्ठी उत्सव, सोमवती अमावस्या, चैत्र, माघ आणि पौष पौर्णिमा, नवरात्र आणि दसरा, हे सण जेजुरीसह कडेपठारावर देखील साजरे केले जातात. 

 जेजुरी गडावरील पालखी सोमवती अमावस्येला कन्हा नदीच्या तीरावर स्नानासाठी जाते. तर तसेच दसऱ्याच्या रात्री जेजुरी आणि कडेपठारावरील देवांच्या पालखींची मधल्या दरीमध्ये देवभेट होते.

खंडोबाची कडेपठाराची पालखी ऐन मध्यरात्री कड्यावर विसावा घेते तर जेजुरीची पालखी खालच्या बाजूला असते व  तेथे, आरशातून देवभेट होते आणि पुन्हा पहाटेपर्यंत दोन्ही पालख्या मूळ स्थानी पोहोचतात.

 वर्षभर या दोन्ही गडांवर तिन वेळा पूजा-विधी होतात. पहाटे 5 वाजता पूजा, दुपारी 12.30 वाजता धूप आरती आणि रात्री 9 वाजता आरती केल्या जातात. श्रावण महिन्यात अभिषेक सांगण्यासाठी मोठी गर्दी पहायला मिळते.

खंडेरायाचे मुळ ठिकाण कोठे आहे (खंडेरायाचे लाईव्ह दर्शन)

जेजुरी गडाच्या पाठीमागे उंच डोंगरावर असलेलं कडेपठार हे खंडोबाचे मूळ स्थान आहे. जेजुरीला जाणाऱ्या सर्व भक्तांनी खंडोबाचे हे मूळ ठिकाण नक्की पाहावे. जेजुरीपेक्षा कडेपठारावर पोहोचण्यासाठीची वाट थोडी कठीण असली तरी देवाच्या मुळ स्थानाचे दर्शन सर्व भक्तांना सुखकारक असेल, यात काही शंका नाही.

 जेजुरी आणि कडेपठारावर नेहमीच दर्शनासाठी गर्दी बघायला मिळते तसेच  सणासुदीला, चंपाषष्ठी अथवा सोमवती अमावस्येला जेजुरीला होणाऱ्या लाखोंच्या गर्दीपेक्षा कडे पठारावरील देवाच्या मुळ ठीकानाचे निवांत दर्शन होत असल्याने तेथे जाणाऱ्या भक्तांची संख्या भरपूर असते.

जेजुरी खंडोबा विषयी पौराणिक कथा

मणि आणि मल्ल या दोन दैत्यांनी पृथ्वीतलावर उच्छाद मांडला होता आणि सर्व सामान्य जनतेसह ऋषी-मुनींना देखील त्यांनी त्रास द्यायला सुरुवात केली. 

त्यामुळे सर्व जणतेनी आणि ऋषी-मुनींनी मिळून महादेवाची आराधना केली. सर्व जनतेला आणि योगी-मुनींना वाचविण्यासाठी महादेवाने खंडोबाचा अवतार धारण केला आणि या दैत्यांचा संहार केला अशी कथा प्रचलित आहे.

      खंडोबाचे रूप घेतलेल्या शंकराने दैत्यांचा संहार करण्यासाठी हातात खड्ग नावाची तलावार घेतली आणि कडेपठारावर दैत्यांचा वध केला म्हणून खंडोबा हे नाव पडले.
तसेच म्हाळसेचा कांत म्हणून म्हाळसाकांत आणि मल्लाचे हरण केले म्हणून मल्हारी, अशी नावे प्रचलित आहेत. 

 जेजुरी गडाचे ऐतिहासिक महत्व

खंडेरायाच्या जेजुरी हा गड सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये घनदाट जंगलात आहे. तसेच ही भूमी तपोभूमी म्हणून दक्षिण मध्ये मणि आणि मल्ल राक्षसाच्या छळाला कंटाळून विस्थापित झालेल्या ऋषींनी लव आश्रमात आश्रय घेतला व आणि मल्ल राक्षसांचे छळापासून मुक्त करण्याची शंकरांना विनवणी केली.

महादेवाने या भूमीवर मार्तंड भैरवाचा अवतार धारण केला आणि ही भुमी पवित्र झाली. मणि आणि मल्लाच्या वधानंतर मार्तंड भैरवानी येथेच आपली राजधानी वसवली आणि ही भूमी जयाद्री म्हणून प्रसिद्ध पावली. 

मार्तंड भैरवाचे अवतार कार्य संपल्यानंतर राजधानी ठिकाणी मार्तंड भैरवाचे मंदिर उभे राहिले. मंदिराचे व्यवस्थेसाठी दाने इनामे दिली गेली आणि जयाद्रीची जेजुरी नगरी वसली. 

येथे अमाप भाविक भक्तांनी मंदिराची अनेक कामे केली व भव्य मंदिर उभे राहिले. गडावरील मंदिराचे गर्भगृहाचे बाहेरच्या बाजूला असेलेल्या यक्षमूर्ती खाली मात्र एक भक्त आपली नाममुद्रा सोडून गेला. इ.स. 1246 चा हा येथील ज्ञात असलेला पहिला शिलालेख आहे.

इ.स. 1511 मधेच चैतन्य महाप्रभू नामक बंगाली संताने जेजुरीस भेट दिल्याचे वर्णन आहे. या वर्णनात येथे मुरुळीची संख्या मोठी होती व महाप्रभूनी त्यांचे प्रबोधन केल्याचा उल्लेख आहे. एक बंगाली महापुरुष जेजुरीस भेट देतो. यावरून याकाळी जेजुरी क्षेत्र म्हणून प्रसिद्ध होते.

FAQ
Q.1) शंभर महादेवाने मार्तड भोरवाचा अवतार कां घेतला ?
Ans. मणि आणि मल्ल या दोन दैत्यांचा संहार करण्यासाठी शंकर महादेवाने मार्तड भोरवाचा अवतार घेतला.

Q.2) खंडेरायाचे मुळ स्थान कोठे आहे ?
Ans.जेजुरी गडाच्या पाठीमागे उंच डोंगरावर असलेलं कडेपठार हे खंडोबाचे मूळ स्थान आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad