Type Here to Get Search Results !

राज्य शासनाची शेतकऱ्यांसाठी पशुपालन योजना 2021-22 | state government pashupalan yojana 2021-22

राज्य शासनाची शेतकऱ्यांसाठी पशुपालन योजना 2021-22 | state government pashupalan yojana 2021-22




अनुक्रमणिका (toc)


राज्य सरकारची शेतकऱ्यांसाठी पशुपालन योजना  


नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी पशुपालन योजना सुरू केली आहे त्याबद्दलची माहिती बघणार आहोत.

राज्याच्या ग्रामीण भागातील सुशिक्षीत व बेरोजगार युवकांसह पशुपालक व शेतकऱ्यांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करुन देण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने विविध योजना व उपक्रम सुरू केले आहेत - अशी माहिती पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकासमंत्री सुनील केदार यांनी दिली आहे.

शेतकरी बांधवांना राज्यस्तरीय योजना आणि जिल्हास्तरीय योजना अशा दोन योजनांचा लाभ घेता येणार आहे. या दोन्ही योजनांमध्ये 

राज्यस्तरीय योजना
  • गाई/म्हशींची वाटप करणे.
  •  शेळी/मेंढी वाटप करणे.
  •  1000 मांसल कुक्कुट पक्षी संगोपनाद्वारे कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करणे.
जिल्हास्तरीय योजना
  • गाई/म्हशींची वाटप करणे.
  •  शेळी/मेंढी वाटप करणे.
  • तिरंगा गट वाटप करणे.
  • एकदिवसीय सुधारीत पक्षांच्या पिल्लांचे गट वाटप करणे.

राज्य सरकारची शेतकऱ्यांसाठी पशुपालन योजना - पहा शेतकऱ्यांना कसा होईल फायदा 





दुधाळ गाई, म्हशीसाठी योजना माहिती

या योजनेअंतर्गत दोन दुधाळ गाई किंवा म्हशीचे वाटप करण्यात येणार आहे. 
संकरीत गाय - एच.एफ / जर्सी 
म्हैस - मुऱ्हा / जाफरबदी 
देशी गाय - गीर,साहिवाल, रेड सिंधी, राठी, थारपारकर देवनी, लाल कंधारी, गवळाऊ व डांगी.

टीप: सदरील योजना ही या आर्थिक वर्षात मुंबई, मुंबई उपनगरे तसेच दुग्धोत्पादनामध्ये स्वयंपूर्ण असलेले पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर व अहमदनगर ह्या जिल्हया अंतर्गत राबवली जाणार नाही.
 सदरिल योजनेमध्ये महिलांना जास्त प्राधान्य देण्यात येणार आहे.

लाभार्थी निवडीचे निकष प्राधान्यक्रम ( उतरत्या क्रमाने)

  • दारिद्रय रेषेखालील लाभार्थी.
  •  महिला बचत गट (अ.क्र. २ ते ३ मधील)
  • अल्प भूधारक (१ हेक्टर ते २ हेक्टर पर्यंतचे भूधारक)
  • सुशिक्षित बेरोजगार (रोजगार व स्वयंरोगार केंद्रात नोंद असलेले).

एका गटाची प्रकल्प किंमत

संकरित गाई / म्हशी चा गट प्रति गाय / म्हैस रु. ४०,०००/- प्रमाणे दोन गाय/म्हैस ८०,००० रुपये प्रकल्प किंमत असते आणि त्यात ५.७५ टक्के (अधिक १०.०३ टक्के सेवाकर)  दराने ३ वर्षाचा विमा ५०६१ रुपये येवढा असतो. हे सर्व मिळून एका गटाची एकुण किंमत ८५०६१ तेवढी होते.

एकूण गटाचे किंमतीनुसार शासकीय अनुदान व स्वहिस्सा मर्यादा खालीलप्रमाणे असेल
  •  शासकीय अनुदान 
     अनुसूचीत जाती ७५ टक्के - ६३,७९६ रुपये

  • स्वहिस्सा अनुसूचीत 
     जाती २५ टक्के - २१२६५.३३ रुपये

  • शासकीय अनुदान 
      सर्वसाधारण ५० टक्के - ४२,५३१ रुपये

  • स्वहिस्सा सर्वसाधारण ५० टक्के - ४२,५३१ रुपये


 गाय म्हैस अनुदान शासन निर्णय  

                                    

शेळी मेंढी पालन शासन निर्णय


 कुक्कुटपालन व्यवसाय शासन निर्णय




निवड कशापद्धतीने होणार ? 

 
या योजनांसाठी ऑनलाईन पद्धतीने लाभार्थी निवड प्रक्रिया सन 2021-22 या वर्षात राबविली जाणार आहे 

▪️ तसेच पशुपालकांना डेअरी, पोल्ट्री किंवा शेळीपालन यापैकी ज्या बाबींमध्ये अर्ज करायचा आहे, त्याची निवड करण्याची सुविधा देखील उपलब्ध करुन देण्यात आली आहे.


पशूपालन योजनेचा अर्ज कुठं करायचा ?

 शेतकऱ्यांना ah.mahabms.com या संकेतस्थळावर अर्ज करता येईल तसेच मोबाईलमध्ये  AH-MAHABMS नावाचे अप्लिकेशन घेऊन अर्ज करता येईल.  

AH-MAHABMS App डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा . 

 तसेच 4 ते 18 डिसेंबर 2021 दरम्यान शेतकऱ्यांना अर्ज करता येणार आहे 

राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी - पशुपालन योजना सुरू झाली आहे, हि माहिती प्रत्येक शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाची आहे , आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा 

पशूपालन योजनेच्या अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे

  •  फोटो ओळखपत्राची सत्यप्रत (अनिवार्य)
  •  सातबारा (अनिवार्य) 
  •  ८ अ उतारा (अनिवार्य)
  • अपत्य दाखला (अनिवार्य) / स्वघोषणा पत्र
  • आधारकार्ड (अनिवार्य)
  • ७-१२ मध्ये लाभार्थी चे नाव नसल्यास कुटुंबाचे संमती पत्र, अथवा दुसऱ्यांची जमीन भाडे तत्वावर करारनामा (अनिवार्य)
  • अनुसूचीत जाती/जमाती असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत (असल्यास अनिवार्य)
  • रहिवासी प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य)
  • दारिद्र्य रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य)
  • बँक खाते पासबुक सत्यपत्र (असल्यास अनिवार्य)
  • रेशनकार्ड / कुटुंब प्रमाणपत्र (एकाच कुटूंबातील एकच व्यक्तीला लाभ घेता येईल.) (असल्यास अनिवार्य)
  • दिव्यांग असल्यास दाखला (असल्यास अनिवार्य)
  • बचत गट सदस्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र किंवा बचत गटाच्या १३) बँक खात्याच्या पासबुकाची पहिल्या पानाची साक्षांकित प्रत
  •  वय जन्मतारखेचा पुरावा सत्यप्रत
  • शैक्षणिक पात्रतेचा दाखला.
  •  रोजगार, स्वयंरोजगार कार्यालयाचे नाव नोंदणीकार्डची सत्यप्रत
  • प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित प्रत
सर्व योजनांच्या कागदपत्रांसोबत बंधपत्र जोडावे लागणार आहे.

है सुद्धा वाचा⤵️

FAQ
Q.1) पशुपालन योजनांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे ?
Ans.पशुपालन योजनांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 डिसेंबर 2021 ही आहे.

Q.2) पशुपालन योजनांसाठी अर्ज कुठे करायचा ?
Ans.शेतकऱ्यांना ah.mahabms.com या संकेतस्थळावर अर्ज करता येईल तसेच मोबाईलमध्ये  AH-MAHABMS नावाचे अप्लिकेशन घेऊन अर्ज करता येईल.  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad