Type Here to Get Search Results !

pm किसान योजना; लवकरच जमा होणार 10 वा हफ्ता | pm kisan yojana 2021

pm किसान योजना ; लवकरच जमा होणार 10 वा हफ्ता | pm kisan yojana 2021


pm किसान योजना


नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण pm किसान योजनेचा 10 वा हफ्ता कधी येणार आहे आणि त्या हफ्त्यामध्ये कीती पैसे येणार याबद्दलची माहिती आपण बघणार आहोत.

Pm किसान योजना (toc)

pm किसान योजना 2021

15 डिसेंबरला शेतकऱ्यांच्या खात्यात 4,000 रुपये येणार

pm किसान सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत 10 व्या हप्त्याची रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. 

जर शेतकरी pm किसान योजनेच्या दहाव्या हप्त्याची वाट पाहत असतील, तर 15 डिसेंबरला दहाव्या हप्त्याचे 2,000 रुपये खात्यात जमा होणार आहेत. त्यामुळे सरकार pm किसान सन्मान निधी योजनेंतर्गत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर दहाव्या हप्त्यातील 2,000 रूपये ट्रान्सफर होतील. 

मागच्या वर्षी 25 डिसेंबरला केंद्र सरकारने pm किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पैसे हस्तांतरित केले होते. आजपर्यंत केंद्र सरकारने pm किसान योजनेअंतर्गत देशातील 11.37 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये 1.58 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम थेट हस्तांतरित केली आहे.

 pm किसान योजनेच्या कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार ४ हजार रुपये  

pm किसान योजनेच्या 9 व्या हप्त्याचा लाभ अद्याप ज्या शेतकऱ्यांना मिळालेला नाही त्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हप्त्यांचे पैसे एकत्रच येणार आहेत. 

pm किसान योजनेअंतर्गत सर्व शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 हजार रुपये मिळतात आणि ते हफ्ते 2000 च्या तीन टप्प्यांत येत असतात.   

ज्या शेतकऱ्यांनी 30 सप्टेंबरपूर्वी नोंदणी केली आहे फक्त त्याच शेतकरी बांधवांच्या खात्यात 4000 रूपये जमा होणार आहेत.

pm किसान योजनेच्या यादीत तुमचं नाव कसं चेक करणार हे आपण पुढे बघणार आहोत. जर तुम्ही पीएम किसान योजनेसाठी नोंदणी केली असेल, तर तुमचे नाव या योजनेच्या लाभार्थ्यांच्या यादीत आहे की नाही हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. 

हे सुध्दा वाचा⤵️

pm किसान योजनेच्या यादीत तुमचे नाव तपासा

खालील steps follow करा 

1. सर्वात प्रथम तुम्हाला PM किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइट म्हणजे   https://pmkisan.gov.in/ ला भेट द्यावी लागेल. 

2. या वेबसाईटच्या होमपेजवर तुम्हाला Farmers Corner चा पर्याय दिसेल.

3.  Farmer Corner च्या खालच्या बाजूला तुम्हाला लाभार्थी यादी पर्याय दिसेल त्यावर तुम्हाला क्लिक करावे लागेल. 

4. त्यानंतर तुमच्यासमोर Beneficiaries list under pm kisan असे नविन पेज उघडेल त्यात तुम्हाला  राज्य, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक आणि गाव निवडावे लागेल. 

5. त्यानंतर तुम्हाला Get Report वर क्लिक केली की तुमच्यासमोर तुमच्या गावातील सर्व लाभार्थ्यांची नावे आलेली दिसतील.


FAQ
Q.1) pm किसान योजनेचा 10 वा हफ्ता कधी पडणार
आहे ?
Ans. pm किसान योजनेचा 10 वा हफ्ता 15 डिसेंबरला पडणार आहे.

Q.2) pm किसान योजनेअंतर्गत दरवर्षी किती रूपये शेतकऱ्यांना मिळतात ?
Ans.pm किसान योजनेअंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांना 6000 रूपये मिळतात.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad