Type Here to Get Search Results !

राजमाता जिजाऊ मराठी भाषण | Rajmata jijau marathi bhashan 2023

 राजमाता जिजाऊ मराठी भाषण | Rajmata jijau marathi bhashan 2023 | राजमाता जिजाऊ भाषण मराठी मध्ये | Rajmata jijau bhashan marathi madhe 


राजमाता जिजाऊ मराठी भाषण

राजमाता जिजाऊ मराठी भाषण :- नमस्कार मित्रांनो आज आपण राजमाता जिजाऊ जयंती निमित्त अतिशय सुंदर भाषण बघणार आहोत ते तुम्ही शेवटपर्यंत वाचावे ही नम्र विनंती.

राजमाता जिजाऊ मराठी भाषण | Rajmata jijau marathi bhashan 


मुजरा माझा माता जिजाऊंना, 
घडविले त्यांनी शूर शिवबांना, 
साक्षात होत्या त्या आई भवानी, 
जन्म घेतला त्यांच्या पोटी शिवबांनी... 

सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावरील मान्यवर, वंदनीय गुरुजनवर्ग तसेच येथे जमलेल्या माझ्या मित्र-मैत्रिणींनो,


माझे नाव योगेश आहे. मी इयत्ता सहावीत शिकते. आज मी तुम्हाला राजमाता जिजाऊंबद्दल काही शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती. राजमाता जिजाऊ यांचा जन्म १२ जानेवारी १५९८ रोजी बुलढाणा जिल्हयातील सिंदखेडराजा या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव लखुजी जाधव व आईचे नाव म्हाळसाबाई असे होते. त्यांच्या पतीचे नाव शहाजीराजे भोसले होते.

राजमाता जिजाऊ हया मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि प्रतापवीर संभाजी महाराज यांच्या माता होत्या. त्यांना आपण राष्ट्रमाता, जिजाऊ, जिजामाता, जिजाई, स्वराज्यजननी असेही म्हणतो. त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असतानाही पुण्याची जहागीर कुशलतेने सांभाळली. शिवरायांच्या मनात स्वराज्य संकल्पनेचे बी पेरले. बालवयापासून शिवरायांवर उत्तम संस्कार केले. शिवरायांचे आदर्श व्यक्तिमत्त्व घडवले.

राजमाता जिजाऊंनी शिवरायांना राजनीती शिकवली. समान न्याय देण्याची वृत्ती व अन्याय करणा-याला कठोरात कठोर शिक्षा देण्याचे धाडस दिले. शहाजीराजांची कैद व सुटका, अफजलखानचे संकट, आग्रा येथून सुटका, अशा अनेक प्रसंगात त्यांनी शिवरायांना खंबीरपणे मार्गदर्शन केले. शिवबा राजे मोठ्या मोहिमांवर गेले असता स्वत: राज्यकारभारावर लक्ष ठेवले.

राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज राजसिंहासनावर अधिष्ठित झालेला बघेपर्यंत लढत राहिल्या. अखेर शिवाजी महाराजांचा रायगडावर शिव- राज्याभिषेक झाल्यानंतर १२ दिवसांनी १७ जून १६७४ रोजी स्वतंत्र हिंदवी स्वराज्यात राजमाता जिजाऊंना शेवटचा श्वास घेतला. अशा या थोर राजमाता जिजाऊंना माझे कोटी कोटी प्रणाम !

राज्याभिषेक झाल्यानंतर १२ दिवसांनी १७ जून १६७४ रोजी स्वतंत्र हिंदवी स्वराज्यात राजमाता जिजाऊंना शेवटचा श्वास घेतला. अशा या थोर राजमाता जिजाऊंना माझे कोटी कोटी प्रणाम !

जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र !!

धन्यवाद ....



हे सुध्दा वाचा ⤵️

➡️ राजमाता जिजाऊ जयंती शुभेच्छा मराठी

➡️ मकरसंक्रांत माहिती मराठी 

➡️ राष्ट्रीय बालिका दिन 

➡️ स्वामी विवेकानंद भाषण मराठी 


FAQ

Q.1) राजमाता जिजाऊ यांचा जन्म कधी झाला ?

Ans. राजमाता जिजाऊ यांचा जन्म १२ जानेवारी १५९८ रोजी बुलढाणा जिल्हयातील सिंदखेडराजा या गावी झाला.

Q.2) राजमाता जिजाऊ यांच्या आईचे नाव काय होते ?

Ans. राजमाता जिजाऊ यांच्या वडिलांचे नाव लखुजी जाधव व आईचे नाव म्हाळसाबाई असे होते.

Q.3) राजमाता जिजाऊ ह्या कोण होत्या ?

Ans. राजमाता जिजाऊ हया मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि प्रतापवीर संभाजी महाराज यांच्या माता होत्या.









टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad