Type Here to Get Search Results !

मकरसंक्रांत माहिती मराठी 2022 | Makar Sankranti Information In Marathi

 मकरसंक्रांत माहिती मराठी 2022 | Makar Sankranti Information In Marathi | मकरसंक्रांत निबंध मराठी


नमस्कार मित्रांनो आज आपण मकरसंक्रांत या सणाबद्दल माहिती आणि निबंध बघणार आहोत.

अनुक्रमणिका (toc)



वरील संपूर्ण माहिती माहिती आपल्याला पुढे पहायला मिळेल.


मकरसंक्रांत माहिती मराठी 2022 | Makar Sankranti Information In Marathi

मकरसंक्रांतीबद्दलची सर्व माहिती खाली पहायला मिळेल..

2022 यावर्षीची मकरसंक्रांत कधी आहे ?

मकरसंक्रांत 14 जानेवारी 2022 वार शुक्रवार यादिवशी आहे

मकरसंक्रांत : भारतीय संस्कृती मधील सणांमध्ये संक्रतीलाही महत्व आहे. पौराणिक कथेनुसार मकरसंक्रांत या दिवशी विष्णूंनी पृथ्वी लोकात असुरांचा नाश केला व असुरांवर भगवान विष्णूंनी विजय मिळवला आणि हा विजय मिळाल्याने मकरसंक्रांत हा सण साजरा केला जातो.

 मकरसंक्रांतीच्या आधी दिवस लहान व रात्र मोठी असते. मकरसंक्रांत या दिवशी दोन्हीही समान वेळ असते मकरसंक्रांत नंतर दिवस मोठा होत जातो व रात्र लहान होऊ लागते. मकरसंक्रांतीच्या दिवशी सूर्य धनू राशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करतो.

मकरसंक्रांतीचा पुण्यकाल 2022

दुपारी 2.29 सुरू होत आहे व संध्याकाळी सूर्यास्त पर्यंत आहे.

 

मकरसंक्रांतीच्या दिवशी काय करावे ?

यादिवशी तिळाचे विशेष महत्त्व असते यादिवशी अंघोळीच्या पाण्यात तीळ घालून अंघोळ करतात. तिळाचे उटणे लावतात होम मध्ये तीळ घालतात. तिलतर्पण, तिलभक्षण व तीळ दान केले जातात.

 यावर्षीच्या संक्रांतीची माहिती यावर्षी संक्रांतीचे वाहन वाघ आहे व उपवाहन घोडा आहे. वस्त्र पिवळ्या रंगाचे घातलेले आहे. हातात गदा आहे व फूल आहे कुमारिका आहे. संक्रातीच्या काळात अन्नदान, वस्त्र दान करावे. तीलदानाचे विशेष महत्त्व आहे.

मकरसंक्रांत हा सण कुठे कुठे व कसा साजरा केला जातो ?

महाराष्ट्रात हा सण मकरसंक्रांत म्हणून साजरा केला जातो महाराष्ट्रासह हा सण आसाम, गुजरात व राजस्थान मध्ये उत्तरायान म्हणून तर तामिळनाडू मध्ये पोंगल म्हणून व बिहार व कर्नाटकात संक्रांती म्हणून साजरा केला जातो. पंजाबमध्ये व जम्मू काश्मीर मध्ये लोहडी म्हणून साजरा केला जातो.



मकरसंक्रांत निबंध मराठी | मकरसंक्रांत 2022 माहिती | makar sankranti  nibandh in marathi


मकर संक्रांती मकरसंक्रांत हा मराठी पोष महिन्यात तसेच १४ जानेवारी रोजी येणारा सण आहे. दक्षिण भारतात हा सण पोंगल नावाने ओळखला जातो. या दिवशी सूर्याचा धनू राशीतून मकर राशीत प्रवेश होतो म्हणूनच या सणाला मकर संक्रांत असे म्हटले जाते.

महाराष्ट्रात हा सण तीन दिवस साजरा केला जातो. या तीन दिवसांची नावे भोगी, संक्रांत व किक्रांत अशी आहेत. भोगीच्या दिवशी विविध फळ - भाज्या, शेंगभाज्या व तीळाची मिश्र भाजी, तीळ लावलेली बाजरीची भाकरी बनवली जाते. संक्रातीच्या दिवशी गुळाची पोळी व तीळ आणि गुळाचे लाडू बनवले जातात.

 'तिळगुळ घ्या आणि गोड बोला' असे म्हणत एकमेकांना तिळगुळ वाटला जातो. म्हणूनच संक्रांत हा नात्यांमधील गोडवा वाढवणारा सण मानला जातो. विवाहित स्त्रिया या सणानिमित्त हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित करतात. एकमेकींना वाण वाटून शुभेच्छा देतात.

महाराष्ट्रात काही ठिकाणी पाच वर्षापर्यंतच्या बालकांचे बारेन्हाण केले जाते. चुरमुरे, बोरे, हरभरे, उसाचे तुकडे,
हलवा यांचे मिश्रण लहान मुलांच्या डोक्यावर घातले जाते. हे सर्व पदार्थ मुलांच्या आरोग्यासाठी हितकारक आहेत. संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवण्याची देखील प्रथा आहे. अशाप्रकारे हा सण मोठ्या आनंदात साजरा केला जातो.


 हे सुध्दा वाचा ⤵️









FAQ
Q.1) 2022 यावर्षीची मकरसंक्रांत कधी आहे ?
Ans. 2022 यावर्षीची मकरसंक्रांत 14 जानेवारी 2022 वार शुक्रवार यादिवशी आहे.

Q.2) मकरसंक्रांतीच्या दिवशी काय करावे ?
Ans.मकरसंक्रांतीच्या दिवशी तिळाचे विशेष महत्त्व असते यादिवशी अंघोळीच्या पाण्यात तीळ घालून अंघोळ करतात. तिळाचे उटणे लावतात होम मध्ये तीळ घालतात. तिलतर्पण, तिलभक्षण व तीळ दान केले जातात.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad