Type Here to Get Search Results !

मार्गशीर्ष गुरुवार उद्यापन कसे करावे | margashirsha guruvar udyapan vidhi

 मार्गशीर्ष गुरुवार उद्यापन कसे करावे | margashirsha guruvar udyapan vidhi



मार्गशीर्ष गुरुवार उद्यापन कसे करावे



मार्गशीर्ष गुरुवार व्रत उद्यापन |margashirsha guruvar vrat udyapan vidhi

    जय महालक्ष्मी घटमांडणी ही विशिष्ट विधी व पूजेच्या स्वरूपात केली जाते तसेच त्याचे विसर्जन उद्यापन करण्याची देखील विधी आहे. त्यामुळे तुमच्या घरी देखील यंदा महालक्ष्मी वैभव लक्ष्मीची पूजा मांडली असेल तर त्यात त्याचे उद्यापन करण्याची योग्य पद्धत मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे आणि हा शेवटी मी तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगणार आहे तुम्हाला माहीत नसते त्यामुळे माहिती शेवटपर्यंत वाचा.

श्रावन महीन्या इतकाच महत्त्वाचा आणि पवित्र हिंदू महिना म्हणजे मार्गशीष महिना या महिन्यांमध्ये महालक्ष्मी व्रत करण्याची प्रथा आहे. या वर्षातील 30 डिसेंबर रोजी शेवटचा गुरुवार साजरा केला जाणार आहे. आजच्या दिवशी मार्गशीष महिन्यातील शेवटचा गुरुवार असल्याने सुवासिनी महिला हळदी कुंकवाचा कार्यक्रम करून लक्ष्मिच्या स्वरूपातील  स्त्रीचा आदर करतात.

 चौथ्या गुरुवारी देखिल पुजेची व्यवस्थित मांडणी करून पूजा करावी. महालक्ष्मी व्रताची कथा वाचावी, संध्याकाळी देवीला नैवेद्य दाखवावा. संध्याकाळी शेजारी असलेल्या सुवासिनींना हळदीकुंकवासाठी आमंत्रित करावे. आपल्या घरी देवी आली असे समजून सुवासिनी बायकांचे स्वागत करावे. 

सुवासिनी बायकांना बसण्यासाठी आसन द्यावे, त्यांना देवीस्वरूप समजुन त्यांची पुजा करावी, त्यांना फळे द्यावी 
 त्यांना केळी एखादे फळ द्यावे, फुल, गजरा महालक्ष्मी व्रताची पुस्तक, एखादी भेटवस्तू द्यावी. त्यांची ओटी भरावी, भावपूर्ण नमस्कार करावा. यासोबतच उपवास असल्याने दूध किंवा त्या सुवासिनींना भोजन द्यावे. तुमची इच्छा असल्यास त्या दिवशी कन्यापूजन देखील तुम्ही करू शकता. शक्य झाल्यास ब्राह्मणाला शिधा,वस्त्र आणि दक्षिणा देऊन नमस्कार करावा.

 दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून शुचिर्भूत होऊन लक्ष्मी मातेची मनोभावे पूजा करतात. लक्ष्मी व्रताची कथा वाचावी, देवीची आरती करावी आणि आणि प्रार्थना किंवा क्षमा याचना करावी हे लक्ष्मी माते मी मनोभावे तुझी चार गुरुवार लक्ष्मी व्रत पूजन केले. तुझे वास्तव्य आणि कृपादृष्टी सदैव आमच्या कुटुंबावर रहावी अशी मनोभावे प्रार्थना करतात. 

हे व्रत करतांना माझ्या हातून काही कळत नकळत जरी एखादी चूक झाली असेल तर मला क्षमा कर व सदैव आमच्यावर तुझी कृपा राहूदे अशी प्रार्थना करा. त्यानंतर तीन वेळा आगमन पुनरागमन असे बोलून गटातील नारळ उचलून ठेवा दरम्यान गजरा , फुल केसांमध्ये माळावी, दुर्वा नारळ वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करावे. सुपारी, नारळ तुम्ही आहारात वापरू शकता किंवा कापड, हा तुम्ही गरजुंना दान करू शकता. काही जन नारळ लाल कपड्यात बांधून ठेवतात.
गटांमधील पाणी तुम्ही तुळशी वृंदावनात घालावे. हळदी कुंकू 
तुम्ही देवासाठी न वापरता स्वत:साठी वापरावे.






शेवटच्या मार्गशीर्ष गुरुवार व्रताचे पाच नियम 





हे सुध्दा वाचा ⤵️


FAQ
Q.1) मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार कधी आहे ?
Ans. मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार 30 डिसेंबर रोजी आहे.

Q.2) मार्गशीर्ष महिन्यातील उद्यापन करताना कोणती प्रार्थना करावी ?
Ans. हे व्रत करतांना माझ्या हातून काही कळत नकळत जरी एखादी चूक झाली असेल तर मला क्षमा कर व सदैव
आमच्यावर तुझी कृपादृष्टी राहूदे अशी प्रार्थना करावी.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad