Type Here to Get Search Results !

प्रजासत्ताक दिन भाषण मराठी २०२४ | Republic day speech in marathi 2024

प्रजासत्ताक दिन भाषण मराठी २०२४ | Republic day speech in marathi 2024 | 26 जानेवारी भाषण मराठी २०२४ | 26 January speech in marathi pdf | prajasattak din bhashan marathi 

प्रजासत्ताक दिन भाषण मराठी २०२४

प्रजासत्ताक दिन भाषण मराठी :- नमस्कार मित्रांनो आज आपण २६ जानेवारी रोजी सर्वत्र साजरा होणारा दिवस म्हणजेच प्रजासत्ताक दिन याविषयी अतिशय सुंदर निबंध बघणार आहोत.


प्रजासत्ताक दिन भाषण मराठी २०२४ | republic day speech in marathi

'अनेकांनी केला सर्वस्वाचा त्याग

    दिले देशासाठी बलिदान

  वंदन त्यांनी करूनिया आज

  गाऊ भारत मातेचे गुणगान.'


सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावरील मान्यवर, वंदनीय गुरुजनवर्ग व उपस्थित तमाम देशबांधवानों, प्रथम सर्वांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !


मित्र हो, आज २६ जानेवारी. आपण भारताचा ७५ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत. आपला भारत १५ ऑगस्ट १९४७ रोजी इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. यानंतर भारताचा राज्यकारभार सुरळीतपणे चालावा म्हणून २६ जानेवारी १९५० रोजी देशात संविधानाची अंमलबजावणी करण्यात आली. या दिवसापासून देशात राज्यघटना लागू झाली.


भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. संविधाना- मुळे आपल्याला शिक्षणाचा अधिकार, मतदान करण्याचा अधिकार, भाषण करण्याचा अधिकार, विचार अभिव्यक्ती करण्याचा अधिकार इ. अधिकार प्राप्त झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणतात. २६ जानेवारी १९५० पासून देशात लोकशाही खऱ्या अर्थाने नांदू लागली.


उत्सव तीन रंगांचा, 

आभाळी आज सजला, 

नतमस्तक मी त्या सर्वांचा, 

ज्यांनी भारत देश घडवला.....


२६ जानेवारी हा भारताचा एक राष्ट्रीय सण आहे. हा सण आपल्याला प्रजासत्ताकाचे महत्त्व पटवून देतो. आपण देशाचे चांगले नागरिक होण्यासाठग इतरांच्या हक्कांचा आणि स्वातंत्र्यांचा आदर करण्याची शिकवण हा दिवस देतो. प्रत्येकाला सन्मानाने व आदराने वागवले जाईल अशा समाजासाठी प्रयत्न करणे हे आपले कर्तव्य आहे.


प्रजासत्ताक दिन आपल्याला देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या देशभक्तांची, अतुल्य पराक्रम गाजवणा-या शूर वीरांची आणि त्यांच्या बलिदानाची आठवण करून देतो. आज आपण विचार केला पाहिजे की, आपण स्वातंत्र्यानंतर काय गमावले आणि काय मिळवले ? आपण सर्वांनी देशाची एकता व अखंडता यांचे सदैव रक्षण केले पाहिजे. देशहितासाठी झटले पाहिजे.


धन्यवाद ! जय हिंद, जय भारत !




हे सुध्दा वाचा ⤵️



FAQ
Q.1) प्रजासत्ताक दिन कधी आहे ?
Ans. प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी रोजी आहे.

Q.2) आपण प्रजासत्ताक दिन का साजरा करतो ?
Ans. आपला भारत १५ ऑगस्ट १९४७ रोजी इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. यानंतर भारताचा राज्यकारभार सुरळीतपणे चालावा म्हणून २६ जानेवारी १९५० रोजी देशात संविधानाची अंमलबजावणी करण्यात आली.

Q.3) प्रजासत्ताक दिनाचे वर्ष कोणते ?
Ans. प्रजासत्ताक दिनाचे वर्ष 75 वेळ आहे.

Q.4) भारतात संविधानाची कधी करण्यात आली ?
Ans. भारताचा राज्यकारभार सुरळीतपणे चालावा म्हणून २६ जानेवारी १९५० रोजी देशात संविधानाची अंमलबजावणी करण्यात आली. 













टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad