Type Here to Get Search Results !

छत्रपती शिवाजी महाराज जयंती भाषण मराठी | Shivaji Maharaj jayanti speech 2024

 छत्रपती शिवाजी महाराज जयंती भाषण मराठी | Shivaji Maharaj jayanti speech 2024 | शिवाजी महाराज भाषण मराठी| छत्रपती शिवाजी महाराज भाषण मराठी| छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त भाषण मराठी| chatrapati shivaji maharaj jayanti speech in marathi


छत्रपती शिवाजी महाराज जयंती भाषण मराठी


छत्रपती शिवाजी महाराज जयंती भाषण :- नमस्कार मित्रहो आज आपण १९ फेब्रुवारी म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने अतिशय सुंदर भाषण बघणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला भाषण करण्यासाठी हे उत्तम आहे तरी तुम्ही खालील लेखात दिलेले भाषण शेवटपर्यंत वाचावे ही नम्र विनंती.


छत्रपती शिवाजी महाराज भाषण मराठी | शिवाजी महाराज भाषण मराठी| shivaji maharaj speech in marathi 


      आले किती गेले किती,
          उडून गेले भरारा ....
संपला नाही आणि संपणारही नाही,
      माझ्या शिवबाचा दरारा ....


सर्वप्रथम रयतेचा राजा, आदर्श शासनकर्ता आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा !


सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावरील मान्यवर, वंदनीय गुरुजनवर्ग तसेच येथे उपस्थित सर्व शिवभक्त रसिकहो, अवघ्या मूठभर मावळ्यांना सोबत घेऊन ज्यांनी आभाळभर शौर्य गाजवले, असे राजे छत्रपती शिवाजी महाराज.... त्यांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या आईचे नाव जिजामाता आणि वडीलांचे नाव शहाजी राजे भोसले असे होते.


माता जिजाऊंनी शिवबांवर उत्तम, संस्कार केले. शिवबांचे व्यक्तिमत्व आदर्श घडवले, जिजाऊंचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या १५व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्यस्थापनेची प्रतिज्ञा केली आणि पुढे ती सत्यात उतरवली. तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले. गनिमी कावा आणि बळकट इच्छाशक्तीच्या जोरावर अनेक किल्ले जिंकले.


छत्रपती शिवाजी महाराजांनी तानाजी, सूर्याजी, जिवा महाला असे जीवाला जीव देणारे मावळे जमवले. त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग आजही आपल्या अंगावर शहारे आणतात. जसे - स्वराज्यस्थापनेची प्रतिज्ञा, स्वराज्याचे तोरण, गड आला पण सिंह गेला, अफजलखानचा पराभव, आग्र्या- हुन सुटका, शाहिस्तेखानची फजिती इत्यादी.


छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले संपूर्ण आयुष्य प्रजेच्या कल्याणासाठी वाहिले. त्यांनी प्रजेवर अन्याय-अत्याचार करणा-याचा चोख बंदोबस्त केला. शेतक-याच्या गवताच्या काडीलाही धक्का लागू नये म्हणून ते झटले. त्यांनी सर्वधर्मांना समान न्याय दिला. त्यांनी स्त्रियांचा आदर केला. नेहमी भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ मानले.


मित्र हो, श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य आणि विचार शब्दांत मांडणे अशक्य आहे. म्हणून मला म्हणावेसे वाटते की-


शब्द ही पडतील अपुरे
अशी शिवरायांची कीर्ती,
राजा शोभून दिसे जगती,
असा तो शिवछत्रपती .....


राजे असंख्य झाले, आजवर या जगती,
पण शिवबासमान मात्र कुणी न जाहला,
गर्व ज्याचा असे या महाराष्ट्राला,
एकची तो राजा शिवछत्रपती,
श्री शिवछत्रपती......


दुर्देवाने, ३ एप्रिल १६८० रोजी छत्रपती शिवाजी महाराज अनंतात विलीन झाले. जगाला स्फूर्ती देणाऱ्या या महान आणि आदर्श राजेंना माझे कोटी कोटी प्रणाम !

जय छत्रपती शिवाजी राजे,
जय जिजाऊ,
जय महाराष्ट्र !
  धन्यवाद !



हे सुध्दा वाचा ⤵️

➡️ शिवाजी महाराज भाषण निबंध मराठी 

➡️ शिवजयंती शुभेच्छा संदेश मराठी 

➡️ संभाजी महाराज राज्याभिषेक सोहळा माहिती 

➡️ राजमाता जिजाऊ भाषण निबंध मराठी 

➡️ इ.१० वी प्रश्नपत्रिका संच 

➡️ इ.१२ वी प्रश्नपत्रिका संच 



FAQ

Q.1) छत्रपती शिवाजी महाराज जयंती कधी साजरी केली जाते ?

Ans. छत्रपती शिवाजी महाराज जयंती १९ फेब्रुवारी रोजी साजरी केली जाते.


Q.2) छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कधी झाला ?

Ans. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला.


Q.3) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आईचे नाव काय होते ?

Ans. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आईचे नाव जिजामाता होते.


Q.4) छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुर्ण नाव काय होते ?

Ans. छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुर्ण नाव शिवाजी शहाजी भोसले असे होते.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad